दिव्यांग शाळेतील गैरप्रकारांवर तातडीची कारवाई; प्रशासकाची नेमणूक – दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई : मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुलामुलींच्या निवासी शाळेमधील गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करण्यात आली असून या शाळेवर प्रशासक नेमण्यात आले असल्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत सांगितले.


सदस्य संदीप जोशी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिव्यांग कल्याण मंत्री सावे बोलत होते.


याबाबत प्रशासक नियुक्तीला स्थगिती मिळाली नाही, तर पुढील तीन वर्षांसाठी प्रशासक नेमण्याचा विचार केला जाईल असे सांगून मंत्री सावे म्हणाले की, शासनाकडे अहवाल सादर करून योग्य ती शिस्तभंग कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संस्थाचालकाने बंदुकीचा धाक दाखवल्याचा प्रकार घडला असेल तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून बंदुकीचा परवाना रद्द करण्यात येईल, असेही मंत्री सावे यांनी सांगितले.


दिव्यांग आयुक्ताविरोधात आलेल्या तक्रारींची चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यासह निलंबनाची प्रक्रिया सुरू केली जाईल. दिव्यांगांच्या शाळेत झालेल्या प्रकारांना राज्य शासनाने गंभीरतेने घेतले असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री सावे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे

मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘हाय-टेक’ कॅप्टन; प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि मच्छीमारांच्या जीवनमानातील सुधारणेसाठी प्रयत्न

मुंबई (सुहास शेलार) : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक आणि धडाकेबाज शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नितेश

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि