मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळी पुन्हा घसरण झाली आहे. प्रामुख्याने भारतीय बाजारातील युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यांचा परिणाम दिसला. आज अस्थिरतेचे लोण कायम असून दिवसभरात घसरणीची लक्षणे दिसत आहे. सकाळी सत्र उघड्यावरच सेन्सेक्स १२६.३६ अंकाने घसरला असून निफ्टी ५० निर्देशांक ४३.१५ अंकांने घसरण झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ९५.८९ अंकांनी वाढ दिसत असून बँक निफ्टीतही ३४.९२ अंकांची भर पडली. सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२०%,०.०९% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप निर्देशांकात कुठलाही बदल सकाळच्या सत्रात दिसला नाही,स्मॉलकॅपमध्ये मात्र ०.०८% अंकांने घसरण झाली आहे. आज विशेषतः भारतीय अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) यामध्ये ०.१७% वाढ झाल्याने घसरणीचा धोका स्पष्ट होत आहे.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Nifty Sectoral Indices) सकाळी क्षेत्रीय निर्देशांकात मात्र अधिक समभागात घसरणीचे चित्र कायम दिसत आहे. मिडिया (१.१५%), पीएसयु बँक (०.५२%), रिअल्टी (०.१२%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.१३%), मिडस्मॉल फायनांशि यल सर्व्हिसेस (०.३१%) समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक घसरण ऑटो (१.०%), मेटल (०.६२%), फार्मा (०.१६%), कंज्यूमर प्रोडक्ट ड्युरेबल्स (०.१९%), तेल व गॅस (०.२०%) समभागात घसरण झाली.काल एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिटनंतर पत्र कारांशी वॉशिंग्टन येथे ट्रम्प यांनी फार्मा क्षेत्रात भारतासह इतर देशांवर २००% कर लावण्याची धमकी दिली. याखेरीज हे आयटी क्षेत्रातील तसेच सेमीकंडक्टर क्षेत्राला लागू होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवल्याने आशिया बाजारातील वातावरण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे रशियावरही सातत्याने मोठ्या टेरिफची घोषणा केल्याने बाजारातील कमोडिटी व्यापारावरही त्याचा परिणाम होत आहे.
अमेरिकेचे काल ग्राहक किंमत निर्देशांक आकडेवारी जाहीर झाली. अपेक्षेपेक्षा महागाईत वाढ झाल्याचा फटकाही गुंतवणूकदारांना बसला. विशेषतः आशियाई बाजारात या घडामोडींचा परिणाम अधिक झाला. आज १७ कंपन्याचे तिमाही निकाल जाहीर होत अ सल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसह भारतीय गुंतवणूकदार सुद्धा दिवसभरात बाजारात सावधगिरीने पाऊल टाकू शकतात. सातत्याने सोन्याच्या व चांदीच्या दरात वाढ होऊन रूपयात घसरण होत आहे. अंतिमतः भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असली तरी या अनेक मुद्यांचा एकत्रित परिणाम निर्देशांकातील घसरणीमुळे स्पष्ट होतो. आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण होत असल्याने काल मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये राखलेली सपोर्ट लेवल आज ढासळू शकते असा अंदाज आहे. मिडकॅपमध्ये होणारी झीज बँक निर्देशांक (Bank Index) यामध्ये होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ नेटवर्क १८ मिडिया (११.७४%), मेट्रोपोलिस हेल्थकेअर (५.९१%),तानला प्लॅटफॉर्म (३.८९%), गोदरेज इंडस्ट्रीज (२.८६%), डिक्सन टेक्नॉलॉजी (२.४५%), आनंद राठी वेल्थ (२.४३%), स्टार हेल्थ इन्शुरन्स (२.२५%), वन ९७ (२. १८%), पतांजली फूड (२.१७%), बीएसई (१.३४%), आयसीआयसीआय लोंबार्ड (१.४८%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (१.४८%), स्विगी (१.२५%), अदानी पोर्टस (१.११%),एव्हेन्यू सुपरमार्ट (०.९९%), एचडीएफसी बँक (०.६०%), एसबीआय लाईफ इन्शुरन्स (०.५५%) समभागात झाली.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक घसरण जेपी पॉवर वेचंर (३.५९%), ओला इलेक्ट्रिक (२.६५%), अंबर एंटरप्राईजेस (२.४२%), श्रीराम फायनान्स (२.३३%), जस्ट डायल (२.०२%), गार्डन रीच (१.६८%), सिमेन्स (१.६३%), वोडाफोन आयडिया (१.३१%), टाटा स्टील (१.०६%), वेदांता (०.८६%), आयसीआयसीआय प्रोड्यूंशिअल (२.१६%), मदर्सन (१.४६%), होंडाई मोटर्स (१.०४%), इटर्नल (०.९०%), कोटक महिंद्रा बँक (०.६४%), हिंदाल्को (०.६२%) समभागात झाली आहे.
बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना चॉईस इक्विटी ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेडचे टेक्निकल रिसर्च विश्लेषक आकाश शाह म्हणाले,' गिफ्ट निफ्टीने दर्शविल्याप्रमाणे, भारतीय बेंचमार्क निर्देशांक आज नकारात्मक पातळीवर उघडतील अशी अपेक्षा आहे, जे निफ्टी ५० मध्ये सुमारे ९४ अंकांची किरकोळ घसरण दर्शवते. मागील सत्रात सावध बंद झाल्यानंतर बाजारातील भावना किंचित अनिश्चित राहिल्या आहेत. निफ्टी ५० मध्ये २५००० पातळीच्या महत्त्वपूर्ण समर्थन क्षेत्राची पुन्हा चाचणी घेतल्यानंतर तीक्ष्ण पुनरुज्जी वन दिसून आले, जे नवीन तेजीच्या गतीचे संकेत देते. निर्देशांक २५२५० पातळीच्या वर बंद झाला आणि आता २०-दिवसांच्या EMA (Exponential Moving Average EMA)जवळ आहे, जे टिकून राहिल्यास तेजीचा ट्रेंड सुरू राहण्याची पुष्टी करू शकते. या व्यतिरिक्त, समर्थनाजवळ तेजीचा 'मॉर्निंग स्टार' पॅटर्न तयार होणे सकारात्मक दृष्टिकोनाला वजन देते. जर गती कायम राहिली तर निर्देशांक २५४०० -२५६०० आणि संभाव्यतः २६००० च्या प्रतिकार पातळीकडे जाऊ शकतो. दीर्घकाळ पोझिशन्स धारण करणा ऱ्या व्यापाऱ्यांनी या अल्पकालीन वाढीच्या लक्ष्यांसाठी लक्ष्य ठेवताना २५००० पातळीवर कठोर स्टॉप-लॉस राखला पाहिजे.
बँक निफ्टीनेही ताकद दाखवली, ५७००० च्या महत्त्वपूर्ण पातळीच्या वर बंद झाला आणि मॉर्निंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार केला. ५७२०० च्या वर सततची हालचाल नजीकच्या काळात ५८,००० आणि ५८७०० च्या दिशेने वाढण्याचे दार उघडू शकते. २० दिव सांचा EMA अतिरिक्त आधार म्हणून काम करत आहे, जो सकारात्मक गतीला आणखी बळकटी देतो. ५६७०० आणि ५६४०० वर तात्काळ आधार दिसत आहे, (तेजीची रचना टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे स्तर) जोपर्यंत हे आधार क्षेत्र अबा धित राहतील तोपर्यंत व्यापक कल तेजीत राहील. संस्थात्मक आघाडीवर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) त्यांचा दोन दिवसांचा विक्रीचा सिलसिला थांबवला, १५ जुलै रोजी १२० कोटींच्या खरेदीसह निव्वळ खरेदीदार बनले. दरम्यान, देशांतर्गत संस्था त्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) सलग सातव्या सत्रात त्यांची खरेदीचा सिलसिला वाढवला, त्याच दिवशी १,५५५ कोटींची गुंतवणूक केली.
अनिश्चितता आणि वाढीव अस्थिरतेमुळे चिन्हांकित सध्याचे वातावरण पाहता, व्यापाऱ्यांना सावधगिरी बाळगून 'थांबा आणि पहा ' (Wait and Watch Perspective) दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला दिला जातो, विशेषतः लीव्हरेज्ड पोझिशन्ससह. रॅलीजवर आंशि क नफा बुक करणे आणि कडक ट्रेलिंग स्टॉप-लॉस वापरणे शिफारसित आहे. निफ्टी २५२५० च्या वर टिकला तरच नवीन लॉन्ग पोझिशन्सचा विचार केला जाऊ शकतो. एकंदरीत, भावना सावधपणे तेजीत असताना, व्यापाऱ्यांनी प्रमुख तांत्रिक स्तरांवर आणि वि कसित होत असलेल्या जागतिक संकेतांवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले की,' गेल्या दोन महिन्यांपासून बाजार एका अरुंद श्रेणीत चढउतार करत आहे. निफ्टी २५५०० च्या प लीकडे असले ल्या श्रेणीच्या वरच्या बँडच्या वर ब्रेकआउटला सकारात्मक ट्रिगर्सची आवश्यकता आहे. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे असे ट्रिगर येऊ शकते ज्यामध्ये भारतावर सुमारे २० टक्के कर लावण्यात आला आहे. जर असे झाले तर ते बाजारात सतत तेजी आणू शकेल का? असंभवनीय आहे. बाजारात सतत तेजी आणण्यासाठी कमाईच्या आधाराची आवश्यकता आहे. मजबूत कमाईच्या आधाराची आणि कमाईच्या वाढीची दृश्यमानता येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. बाजारातील दोन मोठे विभाग - आयटी सेवा आणि उपभोग (IT servics and Consumption), विशेषतः एफएमसीजी - मंद कमाईशी झुंजत आहेत. एफएमसीजीमध्ये कमाईच्या पुनर्प्राप्तीचे हिरवे अंकुर (Green Shoots of earning) आहेत परंतु आयटी सेवा संघर्ष करत आहेत. याचा अर्थ असा की आर्थिक वर्ष २६ साठी कमाईची वाढ फक्त १० टक्के असेल. सध्या बाजारासमोर असलेले हे सर्वात मोठे आव्हान आहे. म्हणूनच, गुंतवणूकदार स्टॉक-स्पेसिफिक असू शकतात, अशा स्टॉकवर लक्ष केंद्रित करू शकतात जिथे वाढीची शक्यता आणि कमाईची दृश्यमानता उज्ज्वल आहे.'
जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य बाजार रणनीतीकार आनंद जेम्स म्हणाले की,'अपेक्षित रेषांवर, काल २५२२० वर पोहोचल्यानंतर रिकव्हरी पुश कमी झाला. आपण त्याचवर थेट वाढ होण्याची वाट पाहू आणि २५४२० वर खेळू. तोपर्यंत, २५१२० किं वा २५०९० वर लक्ष्य ठेवून बाजूच्या हालचालींची अपेक्षा करू. २५०३० च्या खाली थेट घसरण ही मंदीचा इशारा असेल, परंतु आज २४९२० पातळीच्या खाली घसरण देखील कमी अपेक्षित आहे.'
एकूणच बाजारातील हालचाल पाहता सीपीआय आकडे जाहीर झाल्यानंतर आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार काय कल देतील यावर बाजारातील दबावात आणखी नुकसान होते की नाही ते अंतिम सत्रित पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.