क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ सकाळप्रमाणेच मिडिया (१.३१%), तसेच पीएसयु बँक (१.८१%), रिअल्टी (०.५०%), एफएमसीजी (०.४५%), आयटी (०.६३%) समभागात झाली. सर्वाधिक घसरण मेटल (०.५४%),फार्मा (०.३२%), हेल्थकेअर (०.३४%),फाय नांशियल सर्व्हिसेस एक्स बँक (०.४१%) समभागात झाली. विशेषतः युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक राष्ट्रांवर फार्मा कंपन्या आयातीवर १००% पेक्षा अधिक टेरिफ लावण्याचे संकेत दिल्यानंतर फार्मा समभागात घसरण कायम राहिली.मेटलची परिस्थितीही कायम राहिली. युएसने वेगवेगळ्या धातूंच्या आयातीवरही मोठ्या टेरिफ रेसिप्रोकल लावल्याने त्याचा फटका आशियाई बाजारात दिवसभरात दिसला. डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी,'अमेरिकेला भारताला पूर्ण व्यापार प्रवेश मिळण्याच्या जवळ आहे. त्यांनी सांगितले की पूर्वी अमेरिकन व्यवसायांना भारतासह अनेक देशांमध्ये फार कमी किंवा अजिबात प्रवेश नव्हता. परंतु आता अमेरिकेने लादलेल्या शुल्कामुळे ते देश त्यांच्या बाजारपेठा खुल्या करत आहेत. त्यांनी असेही सांगितले की अमेरिकेने इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो, ज्यांना प्रबोवो सुबियांतो म्हणूनही ओळखले जाते, यांच्याशी चर्चा केल्यानंतर इंडोनेशियाशी व्यापार करार केला आहे.' असे म्हटले आहे.
मागील आठवड्यातील इंडोनेशियावर लावलेला ३१% टेरिफ ट्रम्प यांनी बदलत १९% कर इंडोनेशियासाठी घोषित केला. याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की,'या कराराचा एक भाग म्हणून, इंडोनेशियाने १५ अब्ज डॉलर्सची अमेरिकन ऊर्जा आणि ४.५ अब्ज डॉलर्सची अमेरिकन कृषी उत्पादने खरेदी करण्याचे वचन दिले आहे.' असे म्हटले, ज्यातून ही टेरिफची पुनः आकारणी केली गेली आहे. आज ठळक घटना म्हणजे पीएसयु बँकेचे शेअर्स जवळपास दोन टक्क्यांपर्यंत वाढले आहे कारण सरकारने सरकारी बँकां मध्ये विदेशी गुंतवणूक स्विकारू शकते अशी बातमी एका अहवालातून प्रसिद्ध झाल्याने बँकाचे शेअर्स झळकले ज्याचा मोठा फायदा बँक निर्देशांकातील रॅलीत झाला. याशिवाय जीएसटी काऊन्सिलतर्फे संभावित शेतकी उत्पादनांवर जीएसटी दरात कपात कर ण्याची संभावना असल्याने महिंद्रा अँड महिंद्रासारख्या शेअर्समध्येही २% वाढ झाली. चांगल्या तिमाहीतील निकालानंतर नेटवर्क १८ शेअर्समध्ये १२% वाढ झाली. याशिवाय मिडिया समभागातील वाढ कायम राहिल्याने बाजारातील निर्देशांक वधारण्यास एकप्रकारे मदत झाली. सकाळच्या मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये सुरु असलेली घसरण संध्याकाळपर्यंत वाढीत बदलल्याने बाजारातील चित्र बदलण्यास गुंतवणूकदारांना हातभार लागला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील युएस टेरिफचा दबाव आज आशियाई बाजारात दिसून आला असून युरोपियन व युएस बाजारात त्याचा संमिश्र कौल दिसला आहे. काल अमेरिकेने आपले ग्राहक किंमत निर्देशांकाची आकडेवारी जाहीर केली त्यानुसार अपेक्षेहून अधिक महागाई वाढल्याने युएस मधील आर्थिक स्थिती मजबूत नसल्याचे स्पष्ट झाले होते. परिणामी होत असलेले नुकसान टेरिफ करातून वसूल करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाचे व फेडरल रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्ष जेरोमी पॉवेल यांच्यातील व्याजदराबाबत मतभेद दिवसेंदिवस टोकाला जात आहेत. पुढील हालचालींचा अभ्यास करूनच फेड पुढील हालचाल सप्टेंबरमध्ये घेईल असे फेडरल बँकेने सांगितल्यानंतर बँकेवर व्याजदर कपात करण्यासाठी ट्रम्प दबाव टाकत आहे. अंतिमतः यातून बाजाराती ल गुंतवणूकदाराचे प्रश्नचिन्ह कायम आहे. अंतिमतः त्याचा फटका भारतातील क्षेत्रीय विशेष समभागात आगामी काळात होऊ शकतो.
आज भारतीय शेअर बाजारातील बीएसई (BSE) मध्ये ४२१८ समभागांपैकी २३३८ समभागात वाढ झाली असून १७१८ समभागात नुकसान झाले. एनएसई (NSE) मध्ये ३०१८ समभागापैकी १६६० समभागात वाढ झाली असून १२६९ समभागात नुकसान झाले आ हे. विशेषतः एनएसईत ९६ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत ज्यांचा फायदा निफ्टीत झाला. चिंताजनक बाब म्हणजे युएससह परदेशी शेअर बाजारात काल घसरण होऊनही बहुतेक आशियाई बाजार ग्रीन झोनमध्ये उघडले गेले. जूनमधील म हागाईच्या अपेक्षेपेक्षा अधिक आकडेवारी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार शुल्कावरील अस्थिरतेचे लोण पसरल्याने वॉल स्ट्रीटवरील नकारात्मक सत्रानंतर अमेरिकन स्टॉक इंडेक्स फ्युचर्समध्ये घसरण दिसून आली होती.
आशियाई बाजारातील संध्याकाळपर्यंत घसरणीचे संकेत अधिक मिळाले होते. बहुतांश बाजारात घसरण झाली असली तरी काही बाजारात वाढही झाली आहे. उदाहरणार्थ गिफ्ट निफ्टी (०.०४%), निकेयी २२५ (०.०४%), हेंगसेंग (०.३०%), कोसपी (०.९१%), शांघाई कंपोझिट (०.०३%) बाजारात घसरण झाली तर वाढ आशियातील तैवान वेटेड (०.९०%), जकार्ता कंपोझिट (०.७२%), स्ट्रेट टाईम्स (०.३०%) बाजारात वाढ झाली. युरोपियन बाजारातील बाजारात मात्र संध्याकाळपर्यंत वाढ झाली. एफटीएसई (०.१९%), सीएसी (०.०४%), डीएएक्स (०.२७%) बाजारात वाढ झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.०८%), नासडाक (०.१८%) समभागात वाढ झाली असून केवळ एस अँड पी ५०० (०.४०%) बाजारात घसरण झाली आहे.
कमोडिटी बाजारातही अस्थिरतेचे चित्र कायम होते. सकाळी घसरत असलेले सोने पुन्हा दुपारी निर्देशांकाने जोर पकडल्याने महाग झाले आहे. मुबलक पुरवठा व घटलेली मागणी यामुळे सोन्याच्या दरात स्थिरता येत होती. मात्र अखेरीस पुन्हा एकदा धातूंवरील टेरिफचा प्रश्नांवर सोन्याने जोर पकडला. संध्याकाळपर्यंत सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.२१% वाढ झाली होती. चांदीच्या दरातही सकाळी स्थिरतेचे वातावरण असताना दरात घसरण झाली असली तरी पुन्हा संध्याकाळपर्यंत ०.०५% वाढ झाली आहे.
जगभरातील कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही वेगळी परिस्थिती नाही. सतत चढउतार होत असलेल्या कच्च्या तेलाच्या (Crude Oil) निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.८६% घसरण झाली आहे. प्रामुख्याने भूराजकीय परिस्थितीतून तेलाच्या किमती परावर्तित होत असताना वाढीव मुबलक साठा वाढलेले उत्पादन त्यातुलनेत कमी मागणी यामुळे घसरण होत आहे. नुकतेच भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी तेलाच्या निर्देशांकात जागतिक अस्थिरतेतही स्थिर असल्याचे विधान केले होते. त्यामुळे भारताकडेही मुबलक साठा असल्याचे स्पष्टीकरण देत भारतीय गुंतवणूकदारांनाही दिलासा मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर संध्याकाळपर्यंत तेलाच्या WTI Future निर्देशांकात ०.८६% व Brent Future निर्देशांकात ०.४६% घसरण झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ नेटवर्क १८ मिडिया (१३.३४%), पतांजली फूड (६.६%), मेट्रोपॉलिस हेल्थकेअर (५.७८%), सम्मान कॅपिटल (४.०३%), किर्लोस्कर ऑईल (३.३१%), एलआयसी हाउसिंग फायनान्स (२.९२%), आयडीबीआय बँक (२.५४%), वारी एनर्जी (२.१५%), बँक ऑफ बडोदा (१.९५%), एसबीआय (१.८७%), अदानी टोटल गॅस (१.८८%), एनटीपीसी ग्रीन (१.७२%),टाटा पॉवर (२.६७%), पंजाब नॅशनल बँक (२.४३%), वरूण बेवरेज (२.१९%), विप्रो (२.१०%), इन्फोसिस (१.४१%), एलआयसी (LIC ०.८१%), एचडीएफसी बँक (०.०४%), रिलायन्स इंडस्ट्रीज (०.०१%) समभागात झाली.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण मात्र न्यूलँड लॅब्स (६.११%), ओला इलेक्ट्रिक (४.४७%), जेपी पॉवर वेचंर (३.०१%), अंबर एंटरप्राईजेस (३.०५%), सिमेन्स (१.९६%), आयसीआयसीआय लाईफ इन्शुरन्स (२.८४%), श्रीराम फायनान्स (२.३५%), आयसीआय सीआय लोंबार्ड (१.५९%), मदर्सन (१.१७%), टाटा स्टील (१.०५%), जिओ फायनाशिंयल सर्व्हिसेस (०.५१%), जेएसडब्लू स्टील (०.५०%), हिंदुस्थान युनिलिव्हर (०.३७%), ओएनजीसी (०.३४%), पॉवर फायनान्स (०.३२%) समभागात झाली आहे.
बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमध्ये, भारतीय शेअर बाजारांनी सावधगिरीने सत्राची सुरुवात केली. निफ्टी २५१९६ वर खाली उघडला,नंतर २५१२१ च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर घसरला आणि नंतर स्थिरावण्यापूर्वी २५२५५ च्या उच्चांकावर पोहोचला. क्षेत्रीयदृष्ट्या, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, मीडिया, माहिती तंत्रज्ञान, रिअल्टी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये ताकद दिसून आली, तर धातू, आरोग्यसेवा आणि फार्मा समभागांमध्ये कमकुवतपणा कायम राहिला.
डेरिव्हेटिव्ह्जच्या बाबतीत, आयसीआयसीआय लोम्बार्ड (ICICIGI),पतंजली फूड्स,अंबर एंटरप्रायझेस, बायोकॉन आणि टोरेंट पॉवर सारख्या समभागांमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आला. निफ्टी निर्देशांकासाठी, कॉल साईडवर सर्वाधिक ओप न इंटरेस्ट २५३०० आणि २५५०० स्ट्राईक किमतींवर केंद्रित आहे, जे या स्तरांवर संभाव्य प्रतिकार दर्शवते. पुट साईडवर, जास्तीत जास्त ओपन इंटरेस्ट २५२०० आणि २५१०० स्ट्राईकवर दिसून येतो, जे तात्काळ समर्थन क्षेत्र दर्शवते. पुट-कॉल गुणोत्तर (Put call ration PCR) सध्या ०.८४ आहे.'
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांनी श्रेणीबद्ध किंमत क्रिया दर्शविली आणि तेजीचे सलग दुसरे सत्र किरकोळ हिरव्या रंगात संपले. निफ्टी मंदावलेल्या नोटवर उघडला परंतु खाल च्या पातळीवर खरेदीचा रस दिसून आला, ज्यामुळे दिवसाच्या नीचांकी पातळीपासून पुनर्प्राप्ती झाली आणि माफक वाढ झाली, ज्यामुळे सतत परदेशी आवक (FII Inflow) कमी अस्थिरता आणि आयटी काउंटरमधील मजबूतीमुळे मदत झाली. निर्देशांक १६ अंकांनी किंवा ०.०६% ने वाढून २५२१२.०५ वर स्थिर झाला. व्यापक बाजारपेठांनी बेंचमार्कच्या मार्गाचे प्रतिबिंब दाखवले, निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक एका अरुंद बँडमध्ये चढत राहिले आणि नंतर किरकोळ वाढीसह समाप्त झाले. क्षेत्रीयदृष्ट्या, धातू निर्देशांक दबावाखाली होता, ०.५% घसरला, तर रिअल्टी, ऑटो, FMCG, IT, PSU बँका आणि मीडियाने ०.५% ते १.३ % च्या श्रेणीत वाढ नोंदवली. जागतिक दर विकासाभोवती असलेल्या अनिश्चिततेमुळे बाजारातील सहभागी सावध राहिले.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निर्देशांकाने डोजी कॅंडलस्टिक पॅटर्न (Dozy Candle Pattern) तयार केला आहे ज्यामध्ये दोन्ही दिशेने सावल्या आहेत ज्यामुळे स्टॉक विशिष्टकृती दरम्यान एकत्री करणाचे संकेत मिळतात.उल्लेखनीय म्हणजे निर्देशांकाने मागील ११ सत्रांच्या रॅलीच्या (२४४७३ वरून २५६६९) फक्त ५०% मागे घेण्यासाठी १३ सत्रे घेतली आहेत. ही उथळ सुधारणा रचनात्मक आणि सकारात्मक किंमत रचना दर्शवते. गेल्या दोन सत्रांचे उच्चांक २५२५५ च्या आसपास सारखेच आहेत जे २० दिवसांच्या EMA (Exponential Moving Average EMA)शी देखील जुळतात. यापेक्षावर गेल्यास येत्या आठवड्यात २५५००-२५६०० पातळींकडे आणखी वरची वाटचाल होईल. २५२५५-प्रतिरोधक क्षेत्राचे निर्णा यक पणे उल्लंघन करण्यात अयशस्वी झाल्यास आगामी सत्रांमध्ये २५०००-२५२५० श्रेणीत एकत्रीकरण टप्पा येऊ शकतो. २४९००-२५१०० बँडवर महत्त्वाचा आधार पेग केला आहे, या मागणी क्षेत्राच्या खाली सतत ब्रेकडाउन सखोल सुधारात्मक हालचालीसाठी दार उघडू शकते.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'बँक निफ्टीने डोजी कॅन्डल तयार केले आहे, ज्यामध्ये दोन्ही दिशांना सावल्या आहेत आणि स्टॉक विशिष्ट कृती दरम्यान एकत्रीकरणाचे संकेत देत आहेत. पीएसयू बँकिंग स्टॉक्सने चांगली कामगिरी केली. गेल्या नऊ सत्रांमध्ये अपेक्षित रेषांवर निर्देशांक ५६५००-५७६०० च्या श्रेणीत एकत्रित होताना दिसत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक हाच विस्तार करेल आणि या श्रेणीच्या पलीकडे गेल्यास निर्दे शांकातील पुढील दिशात्मक हालचालीचे संकेत मिळतील. प्रमुख अल्पकालीन समर्थन (Support Level) ५६०००-५५५०० क्षेत्रावर ठेवले जे ५०-दिवसांच्या EMA आणि प्रमुख रिट्रेसमेंट पातळीचे संगम (Consolidation) दर्शवते. व्यापक कल सकारात्मक राह तो आणि सध्याचे एकत्रीकरण खरेदीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'भारताचा समष्टिगत आर्थिक दृष्टिकोन (Macroeconomic Outlook) मजबूत आहे, महागाई कमी होणे, व्याजदर क मी होणे, निरोगी मान्सून आणि तेलाच्या किमती कमी होणे यामुळे त्याला पाठिंबा मिळाला आहे. सलग आठ महिन्यांत महागाईत घट झाल्याने बाजाराला चालना मिळाली आहे. तथापि, प्रीमियम मूल्य असलेल्या शेअर बाजारात कमाईत वाढ होणे आवश्यक अस ल्याने, तिमाही निकाल (Q1FY26) कॉर्पोरेट कमाईचे मूल्यांकन करण्यासाठी आलेल्या मदतीच्या रॅलीमध्ये गुंतवणूकदार आशावाद आणि सावधगिरीचे मिश्रण दाखवत आहेत. याव्यतिरिक्त, तांब्यावर ५०% शुल्काची घोषणा झाल्यामुळे ठळक झालेल्या टॅरिफ चिंतेमुळे आणि चिकट महागाईमुळे जवळच्या काळात यूएस फेड दर कपात करण्याच्या आशा धुसर होत असताना जागतिक भावना संमिश्र आहे, ज्यामुळे बाजारातील अनिश्चितता वाढते.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,'निफ्टीला २५२६० च्या महत्त्वाच्या पातळीवर प्रतिकाराचा सामना करावा लागत आहे, जो २५६६९ वरून अलिकडच्या घसरणीचा ३८ .२०% फिबोनाची रिट्रेसमेंट आहे, जो उच्च पातळीवर गुंतवणूकदारांमध्ये अनिर्णय दर्शवितो. दैनिक चार्टवर, निर्देशांक ५०-दिवसांच्या मूव्हिंग सरासरी (५० DMA Daily Moving Average) वर टिकून आहे, जो अल्पकालीन सकारात्मक ट्रेंड दर्शवितो. जोपर्यंत तो बंद आधारावर २५,००० च्या वर राहील तोपर्यंत भावना तेजीत राहण्याची शक्यता आहे, 'बाय ऑन डिप्स' धोरण अनुकूल दिसत आहे. वरच्या बाजूस, २५२६० च्या वर निर्णायक हालचाल २५५०० आणि त्याहून अधिकच्या दिशेने रॅलीला चालना देऊ शकते.'
आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालींचा आढावा घेताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' कालच्या किरकोळ घसरणीनंतर सोन्याच्या किमतीत सकारात्मक सुधारणा दिसून आली, ज्याला सुरक्षित आश्र य मागणीचा पाठिंबा होता, जरी यूएस सीपीआय डेटा २.७% वर होता, ज्यामुळे डॉलर निर्देशांक उंचावला आणि काही काळासाठी सोन्यावर दबाव आला. महागाईतील वाढीमुळे फेडकडून तात्काळ दर कपातीची अपेक्षा कमी झाली आहे, ज्यामुळे डॉलरला मदत झाली आहे. तथापि, जोखीम भावना सावध राहिल्याने आज सोने पुन्हा ०.२५% वाढून ९७४५० वर परतले. पुढील आठवड्यात, पीपीआय आणि बेरोजगारी दाव्यांसह अमेरिकेतील प्रमुख डेटा पुढील हालचालींना मार्गदर्शन करेल. सोने ९६५००- ९८५०० पातळीच्या श्रेणीत अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींचा आढावा घेताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले,'डॉलरने ९८.५० च्या वर स्थिरावल्याने रुपया ०.१० रुपयांनी कमकुवत होऊन ८५.९५ वर ०.१२% खाली आला. २.४% च्या तुलनेत २.७% वर अपेक्षेपेक्षा जास्त असलेल्या यूएस सीपीआय वाचनामुळे डॉलर निर्देशांक मजबूत झाला. पुढे जाऊन, पीपीआय आणि सुरुवातीच्या बेरोजगार दाव्यांसह प्रमुख यूएस डेटामुळे रुपया अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे. चलन ८५.४५ ते ८६.२५ च्या श्रेणीत व्यापार होण्याची शक्यता आहे.'
यामुळेच उद्याच्या बाजारातदेखील मजबूत फंडांमेंटल जागतिक अस्थिरतेवर हावी होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान उद्या क्षेत्रीय विशेष निर्देशांकातील कामगिरी राखेल का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरू शकते.