पुणे शहरातील पाणीपुरवठा १७ जुलैला बंद
पुणे : पर्वती पाणीपुरवठा केंद्रासह चांदणी चौक, वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिनीच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (१७ जुलै) कोथरुड, कर्वेनगरसह शहरातील मध्यवर्ती पेठा, तसेच सहकारनगर, कात्रज भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (१८ जुलैला) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणारा भाग – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टर गेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, डेक्कन, शिवाजीनगर, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीम परिसर, घोरपडे पेठ, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, सॅलसबरी पार्क, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कोंढवा खुर्द, साईबाबानगर या भागात पाणीपुरवठा बंद असणारा आहे.