काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी बंद
मुंबई : मुलुंड वीणा नगर येथील योगी हिल मार्गावरील प्रस्तावित विकास नियोजन रस्त्यावरील ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहेत. शनिवारी १९ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री १० या बारा तासांच्या कालावधीत जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतलेजाणार आहे. या कामामुळे टी विभागातील मुलुंड येथील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या मुलुंड परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद असण्याचा अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ३ ते ४ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
मुलुंडमधील या भागात कमी पाणीपुरवठा
मुलुंड (पश्चिम) येथील मलबार हिल मार्ग, स्वप्ननगरी, वीणा नगर, मॉडेल टाऊन मार्ग, योगी हिल मार्ग, घाटीपाडा, बी. आर. मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७ ते दुपारी १) (दि. १९ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद).