मेट्रो-२ ए, मेट्रो-७ या मार्गिकांवर दररोज २१ अतिरिक्त मेट्रो फेऱ्या

वाढत्या प्रवासी संख्येमुळे मेट्रो फेऱ्यांमध्ये वाढ


दोन्ही मेट्रो मार्गिकांवर दररोज एकूण ३०५ फेऱ्या


मुंबई : मुंबईतील प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका २ए आणि ७ वरील फेऱ्या वाढवण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला. ८ जुलै, २०२५ रोजी महामुंबई मेट्रोने एका दिवसात ३ लाखांहून अधिक विक्रमी प्रवासीसंख्येचा आकडा गाठला. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या प्रवासी संख्या हे मेट्रो नेटवर्कवर प्रवाशांचा असलेल्या विश्वासाचे द्योतक आहे. प्रवाशांची वाढ होण्याचा सकारात्मक कल लक्षात घेत एमएमआरडीएने महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) या आपल्या कार्यान्वयन संस्थेच्या माध्यमातून २ए आणि ७ या मार्गिकांवरील दैनंदिन फेऱ्यांची संख्या २८४ वरून ३०५ इतकी वाढवत २१ अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या आहेत. या वाढीव फेऱ्यांसाठी तीन नवीन ट्रेन तैनात करण्यात आल्या असून, यामुळे एकूण कार्यरत ट्रेनची संख्या २१ वरून २४ इतकी झाली आहे.


या बदलांमध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गर्दीच्या वेळांमध्ये मेट्रो येण्याचा वेळ आता ६ मिनिटे ३५ सेकंदांवरून ५ मिनिटे ५० सेकंदांवर आणण्यात आला आहे. यामुळे फलाटांवरील गर्दी कमी होणार असून प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे. गर्दीच्या वेळा नसताना फेऱ्यांच्या वारंवारतेमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या फेऱ्या पूर्वीप्रमाणे ९ मिनिटे ३० सेकंदांच्या अंतरानेच सुरू राहतील, जेणेकरून ऊर्जाबचत आणि संचालनात संतुलन राखता येईल.


गेल्या आठवड्यात यशस्वीपणे पार पडलेल्या प्रायोगिक चाचणीच्या आधारे फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतरच्या गर्दीच्या वेळेत या निर्णयाची परिणामकारकता स्पष्टपणे दिसून आली आहे. ँफेऱ्यांमध्ये वाढ हा केवळ संख्यात्मक विस्तार नसून प्रवासी सेवेच्या दर्जामधील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या वाढलेल्या फेऱ्या हे एमएमएमओसीएलच्या वाढत जाण्याऱ्या प्रवासी संख्येच्या आधारित नियोजनशैलीचे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्रतीक आहे.




“शहरातील नागरिक प्रवासासाठीच मेट्रोलाच पसंती देत आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून त्याहून एक पाऊल पुढे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. अतिरिक्त गाड्या तैनात करणे आणि वाढवलेली सेवा वारंवारता हे शहरी प्रवास अधिक जलद, कार्यक्षम आणि वाढत्या गरजांनुसार त्यात बदल करण्याच्या आमच्या उद्दिष्टांचे द्योतक आहे. कनेक्टेड, सक्षम मुंबई घडविण्याच्या आमच्या उद्दिष्टांशी हे पाऊल सुसंगत आहे."
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


"मुंबई मेट्रो ही शहरातील विविध स्तरातील लोकसंख्येच्या दैनंदिन आयुष्यातील एक विश्वासार्ह जीवनवाहिनी झाली आहे. जेव्हा इतर वाहतूक साधनांमध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हाही मेट्रोने सातत्याने सेवा सुरू ठेवून आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. फेऱ्यांमध्ये करण्यात आलेली वाढ हा लोककेंद्री निर्णय आहे. "
- एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, एमएमआरडीएचे अध्यक्ष


Comments
Add Comment

Mega Block News: रविवारी माटुंगा - मुलुंड अप व डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई:  मध्य रेल्वे, मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी विभागांवर रविवार, ०७.०९.२०२५

अरुण गवळीमुळे बदलणार दक्षिण मुंबईतील राजकीय समीकरणे!

मुंबई : एकवेळ मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातले मोठ नाव असलेला गँगस्टर अरुण गवळी बुधवारी दगडी चाळीतील त्याच्या घरी

‘त्या’जाहिरातीनंतर वाद; यामागे 'गजवा-ए-हिंद' : भाजपचा आरोप

हलाल लाइफस्टाइल टाऊनशिपची जाहिरात विकासकाने हटवली नेरळ : नेरळ येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत हलाल

नवी मुंबईत सिडकोकडून २२ हजार घरांची जम्बो लॉटरी

मुंबई : म्हाडाप्रमाणे औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) कार्य करते. नवी मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर

Maratha Reservation: मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण मिळावं, मुधोजीराजे भोसलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मराठा आंदोलनात ट्विस्ट मुंबई: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha-OBC Reservation)

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात