Thursday, August 14, 2025

मुलुंडमध्ये शनिवारी १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद

मुलुंडमध्ये शनिवारी १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद
मुंबई : मुलुंड (पश्चिम) वीणा नगर येथील योगी हिल मार्गावरील प्रस्‍तावित विकास नियोजन रस्‍त्‍यावरील ६०० मिलीमीटर व्‍यासाच्‍या जलवाहिनी जोडणीचे काम प्रस्‍तावित आहे. शनिवार १९ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री १० या बारा तासांच्‍या कालावधीत जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामामुळे टी विभागातील मुलुंड (पश्चिम) येथील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

‘टी’ विभागातील पाणीपुरवठा खंडित होणाऱ्या परिसरांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे –

मुलुंड (पश्चिम) येथील मलबार हिल मार्ग, स्‍वप्‍ननगरी, वीणा नगर, मॉडेल टाऊन मार्ग, योगी हिल मार्ग, घाटीपाडा, बी. आर. मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ७ ते दुपारी १)

(१९ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद)

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठा बंद असण्याचा अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्‍हणून ३ ते ४ दिवस पाणी गाळून व उकळून वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >