मुंबई : स्मार्टफोन निर्माती कंपनी विवो ने भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन –विवो एक्स २०० एफई ५जी आणि विवो एक्स फोल्ड ५– अधिकृतपणे लाँच केले आहेत. दोन्ही डिव्हाईस आकर्षक डिझाइन, शक्तिशाली प्रोसेसर, प्रगत कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह सादर करण्यात आले आहेत. एक्स फोल्ड ५ भारतात लाँच; दमदार कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्ससह सादरीकरण हा विवो चा प्रीमियम फोल्डेबल फोन असून एक्स २०० एफई एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप पर्याय आहे.
विवो एक्स २०० एफई ५जी : कॅमेरा-केंद्रित फ्लॅगशिप
विवो एक्स २०० एफई हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये आणि तीन आकर्षक रंगांमध्ये अॅंबर येलो, लक्स ग्रे आणि फ्रॉस्ट ब्लू सादर करण्यात आला आहे. यामध्ये 6.31-इंचाचा झाईस मास्टर कलर एमोलेड डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000निट्स ब्राइटनेससह येतो.
हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9300+ या अत्याधुनिक चिपसेटवर कार्यरत असून 16GB पर्यंत RAM आणि 512GB स्टोरेजचा पर्याय देतो. कॅमेरासाठी 50 मेगापिक्सेलमुख्य लेन्स, 50 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेलचा एएफ फ्रंट कॅमेरा आहे.
फोनमध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी असून 90W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय IP68 आणि IP69 प्रमाणपत्रामुळे हा फोन पाण्यापासून व धुळीपासून सुरक्षित आहे.
किंमत
₹54,999 (12GB RAM + 256GB)
₹59,999 (16GB RAM + 512GB)
फोन 23 जुलैपासून फ्लिपकार्ट, विवो ई-स्टोअर आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर विक्रीस उपलब्ध असेल.
लाँच ऑफर्स
नो-कॉस्ट EMI ₹3,055 पासून
10% कॅशबॅक (एसबीआय, एचडीएफसी, आयडीएफसी फर्स्ट, डीबीएस, एचएसबीसी आणि यस बँक कार्ड्सवर)
एक्सचेंज बोनस, 1 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी
विवो टीडब्ल्यूएस 3e फक्त ₹1,499 मध्ये
विवो एक्स फोल्ड ५ : प्रीमियम फोल्डेबल अनुभव
विवो एक्स फोल्ड ५ हा विवो चा प्रगत फोल्डेबल स्मार्टफोन असून तो केवळ 4.3मिमी जाडीचा आहे आणि वजन फक्त 217 ग्रॅम आहे. यामध्ये 6.53-इंचाचा ओएलईडी कव्हर डिस्प्ले आणि 8.03-इंचाचा फोल्डेबल 2K+ एलटीपीओ डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500निट्स ब्राइटनेस देतात.
हा फोल्डेबल फोन स्नॅपड्रॅगन ८ जन 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 16GB RAM LPDDR5X आणि 512GB UFS 4.1स्टोरेज मिळते. कॅमेरा विभागात 50 मेगापिक्सेल चा मुख्य सेन्सर (सोनी आयएमएक्स 921), 50 मेगापिक्सेलअल्ट्रा-वाइड (सॅमसंग जेएन 1) आणि 50 मेगापिक्सेल झाईस टेलीफोटो (सोनी आयएमएक्स 882, 3x ऑप्टिकल झूम) आहे.
फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी असून AI-आधारित फीचर्ससह स्मार्ट कॉल असिस्टंट, एआय मीटिंग नोट्स यासारखे पर्याय मिळतात.
किंमत: ₹1,49,999 (प्रभावी किंमत ₹1,34,999 – बँक ऑफर्सनुसार)
विक्री सुरू: 30 जुलैपासून
प्री-ऑर्डर: सध्या सुरु आहे
नवीन टेकनॉलॉजी प्रेमींसाठी पर्वणी
विवो एक्स २०० एफई ५जी आणि एक्स फोल्ड ५ हे स्मार्टफोन नवीन तंत्रज्ञान, स्टाईल आणि परफॉर्मन्स यांचा मिलाफ असून ग्राहकांना प्रीमियम अनुभव देण्यास सज्ज आहेत. फोल्डेबल सेगमेंटमध्ये विवो ची ही नवी एन्ट्री सॅमसंगला थेट स्पर्धा देणारी ठरणार आहे.