अशी दिसते टेस्ला वाय कार, व्हिडीओ व्हायरल

  60


मुंबई : बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीत आघाडीवर असलेली बहुराष्ट्रीय कंपनी टेस्ला आता भारतात आली आहे. टेस्ला कंपनीने त्यांची भारतातील पहिली शोरूम मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसीमध्ये सुरू केली आहे. या शोरूमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवार १५ जुलै २०२५ रोजी उद्घाटन झाले. कंपनीने या शोरूमद्वारे टेस्ला वाय कारची विक्री सुरू केली आहे.


टेस्ला वाय कार ही मीडियम रेंज लक्झरी कार आहे. शोरूमच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी टेस्ला वाय कारचे मॉडेल दाखवण्यात आले.


टेक्ला वाय कारची प्रमुख वैशिष्ट्ये :


लांबी ४७९० मिमी.


रुंदी १९२० मिमी.


उंची १६२४ मिमी.


व्हीलबेस २८९० मिमी.


बूट स्पेस ८५४ लिटर


वजन १९९७ किलो


टेक्ला वाय कारची किंमत : भारतात टेक्ला वाय कारची ऑन रोड किंमत ६१ लाख सात हजार १९० रुपये आहे. बुकिंगसाठी २२ हजार २०० रुपये देणे आवश्यक आहे. बुकिंग केल्यापासून एक आठवड्याच्या आत तीन लाख रुपये जमा करण्याचे बंधन आहे.


रंग : भारतात टेक्ला वाय कार अल्ट्रा रेड, डीप ब्ल्यू मेटॅलिक, क्विक सिल्व्हर, पर्ल व्हाईट, डायमंड ब्लॅक, स्टील्थ ग्रेया रंगांमध्ये उपलब्ध


कार बुक करणाऱ्यांसाठी ३० दिवसांची प्रीमियम कनेक्टिविटी ट्रायल उपलब्ध


वेग : टेक्ला वाय कार एकदा चार्ज केल्यावर पुन्हा चार्जिंग न करतात सलग ५३३ किमी अंतर पार करू शकते. ही कार फक्त पाच सेकंदात शून्य ते १०० किमी. प्रति तास हा वेग पकडू शकते. कारमध्ये ड्युअल मोटर व्हील ड्राइव सिस्टिम आहे. तसेच कारमध्ये १५ इंचांचा टचस्क्रीन डिसप्ले आहे. या कारमधून वाहनाशी संबंधित सर्व गोष्टी नियंत्रित करणे सोपे आहे. केबिनमध्ये कमी जागेत अनेक आधुनिक गोष्टींची सुरेख मांडणी आहे. रूफ ग्लास हे या कारचे आणखी मोठे वैषिष्ट्य आहे.


कारमधील इतर वैशिष्ट्ये :


लहान टीव्हीसारखी एलईडी टच स्क्रीन
टचस्क्रीनवर ओटीटीपासून लाईव्हपर्यंत सर्व गोष्टींचा आनंद
घेता येणार


पॉवर विंडो स्विच


हवामान नियंत्रण व्हेंट्ससह अ‍ॅक्सेंट लाइट्सने सुसज्ज
कारमध्ये सेंटर कन्सोल आणि ग्लोव्हबॉक्स
मागच्या प्रवाशांच्या मनोरंजनासाठी मागील बाजूस टचस्क्रीन


सीट पॉकेट्स, यूएसबी पोर्टसह मॅन्युअली उघडणारे दरवाजाचे हँडल


दुसऱ्या वाहनाशी समोरून टक्कर टाळणारी संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर सिस्टिम)
ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम
पुढील वहनाच्या वेगाचा अंदाज घेऊन आपल्या वाहनाचा वेग नियंत्रणात राखणारी यंत्रणा


पॅनोरामिक काच


लेन तोडल्यास चालकाला इशारा देणारी यंत्रणा


कारची सिस्टिम ट्रॅफिक सिग्नल वाचते आणि वाहतूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
कारची सिस्टम ट्रॅफिक रोड चिन्हे वाचते आणि ड्रायव्हरला अलर्ट पाठवत राहते.
रात्री कारचे दिवे गरजेनुसार प्रकाशमान होण्यास सक्षम
वाहन चालवण्याचा एक आरामदायी आणि सुरक्षित अनुभव


बाह्य डिझाइनची वैशिष्ट्ये


पॅनोरामिक काच


टेललाइन बार


मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट


फ्रंट सेन्सर्स आणि कॅमेरे


मांस डोल हँडल


१९ इंच जेमिनी-२० इंच इंडक्शन व्हील्स


इंजिन


मॉडेल Y मध्ये ३८४ हॉर्सपॉवरचे शक्तिशाली इंजिन आहे.


त्याचा कमाल वेग ताशी २१७ किलोमीटर आहे.


११ किलोवॅट एसी आणि २५० किलोवॅट डीसी चार्जर आहे.


एअरबॅग


गुडघा आणि सीटवर बसवलेली एअरबॅग सिस्टम आहे.


सीट माउंटेड साइड एअरबॅग सिस्टम देखील आहे.


निवडक छुप्या एअरबॅग समोर तसेच पडद्यामागे


टेस्लाचे सुपरचार्जर स्टेशन


टेस्ला कंपनी मुंबई, पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये सुपरचार्जर स्टेशन तयार करणार




Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

शिंदेंनी शिवसेना का सोडली ? मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा

मुंबई : विधान परिषदेच्या २०२२ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेत दोन गट झाले. हे असे का झाले एकनाथ शिंदे पक्ष नेत्यांशी न

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

'हिंदूंना बदनाम करण्याचा काही राजकारण्यांचा कट'

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांच्या निवडक नेत्यांनी हिंदूंना बदनाम

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची