Silver Rate: चांदीच्या दरात आज जबरदस्त वाढ 'हे' कारण वाढीस जबाबदार!

मुंबई:सोन्यापाठोपाठ चांदीने जबरदस्त उसळी घेतली आहे. चांदीच्या दरात पश्चिमेकडील अस्थिरतेचे लोण दिसत आहेत. त्यामुळे अखेर चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. कालच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा चांदीत वाढ झाली. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहि तीनुसार, चांदीच्या दरात प्रति ग्रॅम ४ रुपयांनी वाढ झाल्याने चांदीचे प्रति ग्रॅम दर १९१ रूपयावर गेले आहेत. तर एकूण चांदीच्या एक किलो दरात तब्बल ४००० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति किलो चांदी दर ११९००० रूपयांवर गेले आहेत.


आज भारतीय बाजारात चांदीच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रामुख्याने औद्योगिक वापरात चांदीचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने ही वाढ प्रामुख्याने झाली. बिटकॉईन व सोन्यात भरघोस वाढ होत असल्याने चांदीचा गुंतवणूक पर्याय म्हणून अस्थिरतेत अनेकांनी चांदीत गुंतवणूक सुरू केल्याने वाढ होत आहे. विशेषतः प्रत्यक्ष चांदीपेक्षा चांदीच्या ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) मध्ये वाढ झाल्याने ही वाढ आणखी होत आहे.


मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांत सरासरी चांदीचे प्रति ग्रॅम दर ११९ रुपयांवर आहेत. तर १ किलो चांदीचे दर ११९००० रूपयांवर पोहोचले आहेत. चांदीच्या एमसीएक्स (Multi Commodity Exchange MCX) यामध्ये दुपारपर्यंत ०.१०% घसरण झाल्याने चांदीची दरपातळी ११२८२५ रूपयांवर गेली आहे. सोन्याच्या जागतिक सिल्वर फ्युचर निर्देशांकात ०.१९% घसरण झाली. चांदीच्या दरात रूपयांच्या घसरणीचा फटकाही बसला.

Comments
Add Comment

भारताच्या विरोधात कट? अमेरिकेचे लष्करी विमान थेट पाकिस्तानमध्ये उतरल्याने खळबळ

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण असतानाच, अमेरिकन हवाई दलाचे एक मोठे लष्करी विमान थेट

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या

पेट्रोल पंपाच्या कंपाऊंडची संरक्षण भिंत कोसळल्याने गणेशोत्सवात सीएनजीचा पुरवठा बंद; वाहनचालकांची धावपळ

मंडणगड: गणेशोत्सवादरम्यान मंडणगडमधील एकमेव सीएनजी पंप बंद झाल्याने स्थानिक वाहनचालक आणि गणेशभक्तांची मोठी