निफाड होरायझनच्या विद्यार्थ्याची पंढरपूर सायकलवारी

३५० किमी अंतर दोन दिवसांत पूर्ण


नाशिक : निफाड सायकलिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या पंढरपूर सायकल वारीमध्ये निफाड येथील होरायझन अकॅडमीतील इयत्ता नववीच्या अथर्व नकाते या विद्यार्थ्याने निफाड ते पंढरपूर हे जवळपास ३५० किमी अंतर अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करत एक अनोखा विक्रम केला आहे.


पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वारीमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी सहभाग घेतला, ज्यामुळे निफाड शहरात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले.


वारीमध्ये सहभागी नागरिकांनी सायकल चालवण्याचे फायदे आणि पर्यावरणावर होणारे सकारात्मक परिणाम याबद्दल आपले अनुभव सांगितले. अनेक नागरिकांनी नमूद केले की, सायकल चालवणे आरोग्यासाठी चांगले आहे आणि शहरांमध्ये सायकलचा वापर वाढल्यास वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.


एका सहभागी नागरिकाने सांगितले की, "शहरात सायकल चालवण्यासाठी चांगले रस्ते आणि सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यास, अधिक लोक सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहित होतील.


" या सायकलवारीच्या आयोजकांनी सांगितले की, "येत्या काळात शहरात सायकल चालवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणखी उपक्रम राबवण्यात येतील." या सायकलवारीमुळे शहरात सायकलिंगबद्दल जागरूकता वाढली असून, नागरिकांमध्ये पर्यावरण आणि आरोग्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे.


अथर्व नकाते या विद्यार्थ्याच्या या साहसी वृत्तीचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर व इतर पदाधिकारी, शिक्षणाधिकारी डॉ. के. एस. शिंदे, मुख्याध्यापिका स्नेहल सोनवणे आदींनी कौतुक केले आहे.

Comments
Add Comment

जन्मदात्या आईनेच विकले सहा चिमुरडे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे हादरवणारी घटना नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव

मनमाड-कसारा, कसारा-मुंबई मार्गावर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनला केंद्राकडून मंजुरी

तांत्रिक अडथळे दूर होणार; खा. राजाभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश नाशिक : नाशिक तसेच उत्तर

सप्तशृंगगड घाटात इनोव्हा कार ७०० फूट दरीत कोसळली; सहाजण ठार

सप्तशृंगगड : नांदुरी ते श्री सप्तशृंगगड घाटरस्त्यावर रविवारी ( दि.७) संध्याकाळी भाविकांची इनोव्हा कार सुमारे ७००

सप्तशृंगी गडाच्या मार्गावर अपघात, दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू

नाशिक : सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात इनोव्हा कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. सुमारे १००० ते १२०० फूट खोल

नाशिक जिल्ह्यातील ११ नगर परिषदांसाठी आज होणार मतदान

नगरसेवक पदासाठी १०२८, तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार आखाड्यात नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ११

कुंभमेळा आरक्षित क्षेत्राचे संपादन न करता कारवाई रद्द करावी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधूग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे ३७७ एकर