शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंधनकारक : शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील अपात्र शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांची नावे शालार्थ प्रणालीत नियमबाह्य समाविष्ट केल्याच्या प्रकरणी एस्आयटीद्वारे (विशेष अन्वेषण पथक) चौकशी केली जाईल. जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात केली.
उल्हास आणि वालधुनी नदीतील अतिक्रमणासाठी १० कोटींचा दंड मुंबई : आज विधानपरिषदेत अनिल परब यांनी बदलापूरजवळील उल्हास आणि वालधुनी नदीपात्रातील ...
आमदार प्रवीण तायडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडतांना सांगितले की, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी भरतीत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार होत आहे. काही राजकीय व्यक्ती, माजी राज्यमंत्री यामध्ये सहभागी आहेत. बोगस शिक्षकांना थकित वेतनही देण्यात आले आहे. शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली जाते. याविषयी शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, शिक्षक भरती गुणवत्तापूर्ण व्हावी, ही शासनाची भूमिका आहे. १९ सहस्र उमेदवारांची भरती झाली असून १० सहस्र जागांवर प्रगतीपथावर आहे. अल्पसंख्यांक विकास विभागाद्वारे शाळांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते. अल्पसंख्यांक दर्जा मिळवून देण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी होत आहे, याविषयी तक्रार प्राप्त नाही.