येमेनमधून मोठी बातमी! केरळमधील परिचारिका निमिषा प्रियाची फाशी टळली

  146

सना: येमेनी नागरिक तलाल अब्दो महदीची हत्या केल्याप्रकरणी केरळमधील परिचारिका निमिषा प्रियाला येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यानुसार निमिषाला १६ जुलै रोजी फाशी दिली जाणार होती. मात्र, आता नव्या माहितीनुसार निमिषाची फाशी तूर्तास टळली आहे.

भारतीय वंशाच्या निमिषाला वाचविण्यासाठी भारत सरकारकडून अनेक प्रयत्न केले गेले, मात्र ते निष्फळ ठरल्याने तिला वाचवणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे, फाशी पुढे ढकलण्यात आली असल्याच्या बातमीने भारताला तसेच तिच्या कुटुंबियांना मोठा दिलासा दिला आहे.

फाशीची शिक्षा पुढे ढकलली


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निमिषाची फाशी रद्द झाली नसून, ती काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. भारत सरकार निमिषा प्रियाला फाशीपासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते. असे म्हटले जात होते की प्रकरणाचे गांभीर्य पाहता तिला वाचवणे कठीण आहे. निमिषाने आपला पासपोर्ट परत घेण्यासाठी महदीला भुलीचे इंजेक्शन दिल्याचा आरोप तिच्यावर होता, परंतु या इंजेक्शनमुळे महदीचा मृत्यू झाला. ज्यामुळे येमेन न्यायालयाने निमिषाला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.

२०१७ पासून येमेनच्या तुरुंगात निमिषा प्रिया


येमेन न्यायालयाने निमिषा प्रियाला एका खून प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. ती २०१७ पासून येमेनच्या तुरुंगात आहे. केरळमधील पलक्कड येथील नर्स निमिषा गेल्या दशकापासून तिच्या पती आणि मुलीसह येमेनमध्ये कामानिमित्त राहत होती. २०१६ मध्ये येमेनमध्ये झालेल्या गृहयुद्धामुळे देशाबाहेर प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु त्यापूर्वीच, २०१४ मध्ये तिचा पती आणि मुलगी भारतात परतले होते. मात्र निमिषा परत येऊ शकली नाही.

काय आहे नेमकं प्रकरण?


येमेनच्या कायद्यानुसार परदेशी नागरिकांना क्लिनिक सुरू करण्यासाठी स्थानिक पार्टनर असणं बंधनकारक होतं. म्हणूनच निमिषाने तलाल अब्दो महदी या येमेनी नागरिकाला पार्टनर केलं. पण काही महिन्यांनी दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि तलालने तिच्यावर दबाव आणायला सुरुवात केली. तिचा पासपोर्ट काढून घेतला आणि धमक्या द्यायला लागला. त्यामुळे निमिषाने पोलिसात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली, त्यानंतर तलालला अटकही झाली. पण तो सुटला आणि तिला पुन्हा त्रास द्यायला लागला. या सगळ्या त्रासाला कंटाळून, २०१६ मध्ये निमिषाने तलालला गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याच्याकडून पासपोर्ट मिळवण्याचा प्रयत्न केला. पण औषधाची मात्रा जास्त झाली आणि यात तलालचा मृत्यू झाला. घाबरून निमिषा आणि तिच्या एका साथीदाराने तलालचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. काही दिवसांनी पोलिसांनी दोघांना पकडलं. निमिषावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. २०१८ मध्ये तिच्यावर गुन्हा सिद्ध होऊन, येमेनच्या न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. निमिषाने या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात अपील केलं, पण तिथेही निकाल तिच्या विरोधात लागला.

निमिषाला कोणत्या कायद्यानुसार शिक्षा झाली?


येमेनमध्ये शरिया कायदा लागू आहे. या कायद्यानुसार, खून झाल्यास मृत्युदंड दिला जातो. येथील कायद्यात गुन्ह्यांचे मुख्यत: तीन प्रकार मानले जातात. ताजीर (किरकोळ गुन्हे), किसास (गंभीर गुन्हे, विशेषतः हत्या किंवा शारीरिक इजा) आणि हद (धर्मविरोधी किंवा अत्यंत गंभीर गुन्हे). हत्येच्या प्रकरणांमध्ये ‘किसास’ आणि ‘दीया’ या दोन प्रमुख शिक्षा पद्धती वापरल्या जातात. ‘किसास’ म्हणजे पीडिताच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आरोपीला मृत्युदंड (फाशी) किंवा त्याच स्वरूपाची शिक्षा. म्हणजेच, ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा, जीवाच्या बदल्यात जीव, रक्ताच्या बदल्यात रक्तच, असा या संकल्पनेचा अर्थ आहे.  न्यायालय किंवा काझी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावू शकतो, पण अंतिम निर्णय पीडिताच्या कुटुंबावर असतो – ते शिक्षा माफ करू शकतात किंवा कायम ठेवू शकतात. ‘दीया’ किंवा ‘ब्लड मनी’ ही दुसरी संकल्पना आहे. यात पीडिताच्या कुटुंबाला ठराविक आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते. जर कुटुंबाने ही नुकसानभरपाई स्वीकारली, तर आरोपीची फाशीची शिक्षा माफ केली जाऊ शकते आणि त्याची सुटका होऊ शकते. ही संकल्पना शरिया कायद्यात गुन्हेगाराला दुसरी संधी देण्याची, आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची आहे.

 ‘दीया’ किंवा ‘ब्लड मनी’ द्वारे वाचवण्याचा प्रयत्न 


येमेनमध्ये निमिषाला मृत्युदंडाची शिक्षा झाल्यानंतर यापासून तिची सुटका करण्यासाठी ‘दीया’ किंवा ‘ब्लड मनी’ संकल्पनेबाबत चर्चा सुरू होती. इस्लामच्या तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ही पद्धत केवळ माफीची संधी देत नाही तर पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक मदतीद्वारे काही प्रमाणात न्याय देखील मिळतो. मात्र, निमिषाच्या प्रकरणामध्ये महदीच्या कुटुंबाने ही मदत नाकारल्याने, निमिषाची यामधून अद्याप तरी सुटका झालेली नाही.
Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

'भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही...' डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो,

२५% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला! एक आठवड्यासाठी दिलासा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १

ट्रम्प यांनी ४१ टक्क्यांपर्यंत लावला टॅरिफ, आदेशावर केली स्वाक्षरी, भारतासह ७० देशांवर होणार परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेताना यांनी अनेक देशांच्या वस्तूंवर १० ते ४१

Ashish Shelar : नेटफ्लिक्सने मराठी कंटेंट क्रिएटर्स व मनोरंजन उद्योगासोबत भागीदारी करावी : मंत्री आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन लॉस एंजेलिस : मनोरंजर