Marathi Movie: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झळकणार एकत्र

  68

‘परिणती- बदल स्वतःसाठी’ १ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला


Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत आजवर आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष आता प्रथमच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा त्यांचा आगामी चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बाळसराफ दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती पराग मेहता आणि हर्ष नरूला यांनी केली आहे.

या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये दोन स्त्रिया दिसत असून एक रंगीबेरंगी पारंपरिक पोशाखात, चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि एक वेगळा आकर्षक बाणेदारपणा तर दुसरी साधेपणात गुंतलेली, कुशीत विसावलेली. त्यांच्या वेगवेगळ्या पार्श्वभूमी आणि भावविश्वाचा संगम चित्रपटाच्या आशयाची झलक देतो. सन्मान, अस्तित्व आणि मुक्ततेसाठी लढणाऱ्या दोन स्त्रियांची ही कहाणी आहे, त्यांच्या लढ्याची कारणं वेगळी आहेत, परंतु दोघींचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे स्वतःसाठी बदल घडवणे.

या चित्रपटाविषयी लेखक-दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, ‘‘परिणती’ या चित्रपटात मी अशा दोन स्त्रियांना एकत्र आणलं आहे, ज्यांची एका वळणावर मैत्री होते आणि त्यातून त्यांचे आयुष्य बदलते. सोनाली आणि अमृता यांनी या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे. ‘परिणती’ ही त्यांच्या वाटचालीची, बंडाची, आणि स्वतःला सापडण्याची कहाणी आहे. ‘परिणती’ प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच देणार नाही, तर विचारही करण्यास भाग पाडेल.’
Comments
Add Comment

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या आयुष्यात झाली 'ती'ची एन्ट्री

मुंबई : गणेशोत्सव सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या नव्या

‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा वाद वाढतच चालला आहे. जॉली एलएलबी

गणरायाच्या आगमनाचा ‘कुली’ चित्रपटाला फायदा

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त तीन चित्रपट उत्तम कमाई करत आहेत. एकीकडे ‘कुली’ आणि ‘वॉर २’ हे दोन मोठे चित्रपट चांगली

पार्थ पवार-जॅकलिन जोडीने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी विविध

‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

वडापाव म्हटले की जिभेला पाणी सुटते. वडा जसा तिखट-चुरचुरीत असतो तसेच नात्यांमध्येही गोडवा आणि तिखटपणा असला तरच ती

‘जटाधारा’ या चित्रपटात शिल्पा शिरोडकरची एन्ट्री

सोनाक्षी सिन्हा आणि सुधीर बाबू यांच्या बहुप्रतिक्षित ‘जटाधारा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर