स्मशानभूमीतील 'त्या' गूढ तरुणीचे रहस्य काय?

अमरावती : हिंदू स्मशानभूमीत एकाकी बसलेली तरुणी आणि तिच्या मंत्रोच्चारामुळे रिद्धपूर परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. शेतातून परतणाऱ्या तीन तरुणांनी ही घटना पाहिल्यानंतर गावात माहिती दिली, परंतु ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेपर्यंत ती तरुणी अंधारात नाहीशी झाली होती.


‘आषाढ कृष्ण’ अर्थात १२ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास तिघे तरुण स्मशानभूमीजवळून जात असताना त्यांना प्रवेशद्वारावर एक दिवा जळताना दिसला. या दृश्याने आधीच धास्तावलेल्या तरुणांना एक तरुण स्त्री आगीसमोर बसून मंत्रोच्चार करताना दिसली, ज्यामुळे त्यांची पाचावर धारण बसली. ती नेमके काय बोलत होती, हे त्यांना समजू शकले नाही.



या अनपेक्षित आणि भयावह अनुभवानंतर त्यांनी तातडीने गाव गाठले आणि अनेकांना फोन करून माहिती दिली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच सुमारे २० तरुण स्मशानाकडे निघाले.


तरुणांचा जमाव आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून ती तथाकथित मांत्रिक महिला अंधाराचा फायदा घेऊन पसार झाली. मोबाईल आणि टॉर्चच्या मदतीने एक तासभर तिचा शोध घेण्यात आला, परंतु नदीपात्र, उंचसखल शेतशिवार आणि झुडुपे यामुळे तिचा थांगप लागला नाही.


अखेर शोधमोहीम थांबवून सर्वजण घरी परतले. या संदर्भात जिल्हा परिषदेचे माजी सभापती तात्यासाहेब मेश्राम यांनी सांगितले की, ती तरुणी कदाचित आत्म्याला जागृत करण्यासाठी तांत्रिक साधना करत असावी. तिला कुणीतरी यासाठी सुपारी दिली असावी, अशा चर्चा गावात सुरू आहेत.


तथापि, कुणीही निश्चितपणे काहीही सांगायला तयार नाही. त्यांनी हे सर्व अंधश्रद्धा असल्याचे स्पष्ट केले आणि भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले. ती महिला जर सशक्त असती, तर तिला पळून जाण्याची गरज नव्हती, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या

मराठा आरक्षण - मृतांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता ज्यांनी आत्महत्या केली किंवा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला. अशा

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून