मेट्रो-३ चा अंतिम टप्प्या ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता

अत्रे चौकापासून कफ परेडपर्यंतच्या टप्प्यातील कामे वेगात


मुंबई (प्रतिनिधी): मेट्रो विस्तार आणि स्मार्ट वाहतूक यंत्रणेला गती देण्यासाठी १९ महत्त्वाच्या कंत्राटांना २४ जूनला मंजुरी दिली असतानाच आता - दुसरीकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरशन - लिमिटेडकडून भुयारी मेट्रो-३ मार्गिकेच्या कामांना देखील गती मिळत आहे.


ही मेट्रो आरे-जेव्हीएलआरपासून अत्रे चौकापर्यंत धावत असून, अत्रे -चौकापासून कफ परेडपर्यंतचा टप्पा - ऑगस्टपर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे. या मार्गात मंत्रालयासह महत्त्वाची कार्यालये असून, लोकलसह उर्वरित प्रवासी साधनांनी - धावपळ करत ही ठिकाणे गाठणाऱ्या प्रवाशांना भुयारी मेट्रो वरदान ठरणार आहे. विमानतळासोबत पाटकोपर - अंधेरी-वर्सोवा या मेट्रो १ ला देखील मेट्रो ३ जोडली आहे. शिवाय मेट्रो २ व देखील बीकेसीमध्ये मेट्रो ३ ने जोडण्यात येणार असून, मेट्रो-६ ला देखील आरे येथे मेट्रो ३ ची जोडणी दिली जाणार आहे.


मुंबई महानगर मेट्रो लाईन-३ चे उद्दिष्ट म्हणजे मुंबईच्या अपुरी उपनगरी रेल्वे प्रणालीला पूरक, असा एक मोठ्या प्रमाणावर जलद वाहतूक प्रणाली पुरवणे, ज्यामुळे मेट्रो लोकांच्या दाराशी आणली जात आहे. एमएमएल-३ च्या संपूर्ण कार्यान्वयनानंतर, शहरातील वाहतुकीच्या प्रमाणात लक्षणीय घट होईल आणि स्थानिक परिवहन व्यवस्थेला चालना मिळेल, असा दावा मुंबई मेट्रो रेल कॉरिशन लिमिटेडने केला आहे.
२४ जूनला मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएकडून १२ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरांतील मेट्रो प्रवाशांना सेवा देणार असतानाच ठाणे आणि नवी मुंबईमधील मेट्रो सेवाही मुंबईशी जोडण्याचे नियोजन झाले आहे. परिणामी २०३० पर्यंत मेट्रो महामुंबई सहजरित्या जोडली जाईल.


एमएमआरडीएच्या किलोमीटर लांबीच्या मेट्रो नेटवर्कचा एक महत्त्वाचा घटक असलेला मेट्रो मार्ग ९ हा दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरदरम्यान जोडणारा असून, सध्या या मार्गाचे काम वेगाने प्रगतिपथावर आहे. हा डेपो मेट्रो ४, ४ अ, १०, ११ या मार्गिकांसाठी केंद्रीय संचालन व देखभाल केंद्र असेल. सीएसएमटी ते मीरा रोडदरम्यान ५५.९९ किमीच्या मेट्रो मार्गाचे संचालन येथून होईल.

Comments
Add Comment

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव

बोगस आधार कार्ड प्रकरणी आ. रोहित पवारांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे बोगस आधार कार्ड तयार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी

मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक

मुंबईतील खासगी कोचिंग क्लासना लावणार चाप! तपासणीसाठी समिती गठित

मुंबई : मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित

शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत अचानक बिघडली, लीलावती रुग्णालयात दाखल...

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टी यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईच्या लीलावती