Proptiger report real estate marathi: जून तिमाहीत घरांची विक्री मंदावली

घर परवडण्याबाबतच्या चिंता कायम: प्रॉपटायगर डॉटकॉम


मुंबई: डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्झॅक्शन ॲडव्हाईजरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉम च्या अलीकडच्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या किंमतींबाबत चिंता करणाऱ्या खरेदीदारांनी थोडे थांबून वाट बघण्याचा दृष्टिकोन अंगिकारला, ज्यामुळे या तिमाहीत भारतातील ८ प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये घरांची विक्री वार्षिक १४% ने कमी झाली आहे. हाऊसिंग डॉटकॉमचे स्वामित्व ज्यांच्याकडे आहे त्या आरईए इंडियाचाच एक भाग असलेल्या प्रॉपटायगर डॉटकॉमने सादर केलेल्या रिअल इनसाइट रेसिडेन्शि यल- एप्रिल-जून २०२५ अनुसार बंगळूर, चेन्नई आणि कोलकाता वगळता सर्व शहरांमध्ये घरांच्या विक्रीचे प्रमाण कमी झाले.


या तिमाहीत सर्वात तीव्र घट दिसून आली ती एमएमआर (-३२%) आणि पुणे (-२७%) येथे. क्रमिक आधारावर एकंदरीत विक्री स्थिर रा हिली तर काही बाजारपेठांमध्ये वृद्धी देखील दिसली. एमएमआर (२७%) आणि पुणे व बंगळूर (प्रत्येकी १६%) यांचे त्रिमासिक विक्रीत सर्वाधिक योगदान होते. एकंदर आकडेवारीत त्यांचा एकत्रित वाटा ५९% होता.


प्रॉपटायगर डॉटकॉमचे हेड ऑफ सेल्स श्रीधर श्रीनिवासन म्हणाले,'घरांच्या विक्रीत आणि नवीन लॉन्च मध्ये थोड्या काळासाठी झालेली ही घसरण मागणी कमी झाल्याची सूचक नसून ते पुनःअंशन (Resurgence) आहे. खास करून बजेट आणि मध्यम –उत्पन्न असलेल्या सेगमेन्टमध्ये 'आपल्याला घर परवडणार का’ या दबावामुळे खरेदीदार अधिक सावध झाले आहेत. तथापि मुळाशी असलेली मागणी मात्र तशीच आहे, ज्याचा पुरावा काही शहरांमधील क्रमिक वृद्धीमधून तसेच एमएमआर, पुणे आणि बंगळूरसारख्या मुख्य बाजारांच्या निरंतर प्रभुत्वामधून मिळतो.”


श्रीनिवासन पुढे म्हणाले,' २०२५ मधील पहिल्या सहामाहीत धोरणात्मक जमीन अधिग्रहणाच्या लाटेत विकासकांची गुंतवणूक चालू ठेवण्याची (विशेषतः प्रीमियम ऑफरिंग्जमध्ये) इच्छा देखील स्पष्ट दिसत आहे. यातून भारताच्या हाऊसिंग बाजारात दीर्घकालीन वि श्वासाचा संकेत मिळतो.


मागणीतील मंदीमुळे नवीन लॉन्चची संख्या कमी झाली


या अहवालात दिसून येते की, दुसऱ्या तिमाहीत जिओपॉलिटिकल कारकांचा प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे नवीन घरांचा पुरवठा मागील तिमाहीच्या आणि मागील वर्षाच्या तुलनेत देखील कमी झाला आहे. या तिमाहीतच भारत आणि शेजारी देश पाकिस्तान यांच्या तील सीमा संघर्ष टोकाला गेला होता, आणि दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केला होता. शहर-निहाय विश्लेषणात वेगवेगळे ट्रेंड दिसतात. एमएमआर, पुणे आणि अहमदाबाद येथे नवीन लॉन्चमध्ये घसरण झालेली दिसते तर इतर बाजारपेठांमध्ये वाढ झालेलीही दिसते. कोलकातामध्ये जून तिमाहीत लॉन्चचे प्रमाण तिपटीने वाढलेले दिसते, ज्याचे कारण प्रामुख्याने त्यांचा बेस कमी असणे हा होता.

Comments
Add Comment

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

हिंदूंना एकत्र करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी पदयात्रा: धीरेंद्र शास्त्री

आग्रा (उत्तर प्रदेश) : आध्यात्मिक नेते धीरेंद्र शास्त्री यांनी आज सांगितले की, हिंदूंना एकत्र करण्यासाठी, हिंदू

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार 'SIR': निवडणूक आयोगाची दिल्लीत महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चेत आलेल्या एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीचा आता संपूर्ण देशभरात एकाच

भारताच्या विरोधात कट? अमेरिकेचे लष्करी विमान थेट पाकिस्तानमध्ये उतरल्याने खळबळ

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण असतानाच, अमेरिकन हवाई दलाचे एक मोठे लष्करी विमान थेट

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.