मुंबईकरांच्या स्वप्नातील सुंदर व मोठ्या घराचे स्वप्न साकार होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वयंपुनर्विकासंबंधीचा दरेकर अभ्यासगटाचा अहवाल शासनाला सादर


मुंबई: विधानभवन येथे सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास - समुह स्वयंपुनर्विकास संबंधीचा दरेकर अभ्यासगटाचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान, "अभ्यासगटाने स्वीकार केलेल्या निर्णयांबाबतीत शासन निर्णय लवकरच निर्गमित करुन आगामी अधिवेशनात याबाबत झालेल्या कामाचा अहवाल सादर करण्यात येईल. यातील महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे राज्यातील प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांना गती मिळून मुंबईकरांच्या स्वप्नातील सुंदर व  मोठ्या घरांचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


२०१९ मध्ये शासनाने शासन निर्णय काढून विकासाला सवलती जाहीर केल्या होत्या परंतु तांत्रिक कारणामुळे काही सवलतींची अंमलबजावणी झाली नव्हती. दरेकर अभ्यास गटाने तांत्रिक आणि कायदेशीर बाजू तपासून आकडेवारीसह व पुराव्यासह शिफारशी मुदतीपूर्वीच सादर केल्याने मुख्यमंत्र्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. सदर बैठकीला विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रविण दरेकर, सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास - समुह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे सदस्य उपस्थित होते.




गृहनिर्माण संस्थाची पुनर्विकास करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय


मुख्यमंत्री  म्हणाले की, गृहनिर्माण संस्थाची पुनर्विकास करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. सन २०१९ मध्ये स्वयंपुनर्विकास ही संकल्पना मांडली गेली. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पार पडलेल्या संमेलनात मी स्वत: सहभागी झालो होतो, या संमेलनात जवळपास १९ मागण्या मांडल्या होत्या त्यातील १८ मागण्या पूर्ण करून गृहनिर्माण संस्थाची पुनर्विकासासाठी एक शासन निर्णय काढण्यात आला. यामध्ये अजून अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात आले. त्यामुळे २४ एप्रिल २०२५ ला आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट निर्माण केला. या अभ्यासगटाने सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास - समुह स्वयंपुनर्विकासासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण शिफारशी केल्या आहेत.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई जिल्हा बँकेने उत्स्फूर्तपणे सहकारी गृहनिर्माण संस्थांचा विकास केला. पण १,६०० सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुनर्विकासासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे यांचा विकास करण्यासाठी पतपुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेऊन पतपुरवठ्यासाठी देखील या अभ्यासगटाने शिफारशी केल्या आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या सभासदांसाठी मार्गदर्शक सूचना देखील आहेत. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, सेस व नॉन सेसच्या इमारतींचा विकास देखील यामध्ये करावा, विमानपत्तनचे नियम, डीम्ड कन्वेयन्स मध्ये सुधारणा करणे, याची शिफारस अभ्यासगटाने केली आहे. स्वयंपुनर्विकास - समुह स्वयंपुनर्विकासासाठी पतपुरवठा मिळावा यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे राष्ट्रीय सहकारी विकास निगम कडून निधी प्राप्त व्हावा अशी शिफारस करण्यात आली आहे. ही मदत देखील केंद्र सरकारकडून मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


स्वयंपुनर्विकास अभियान जनआंदोलन म्हणून उभे राहिलेय




प्रवीण दरेकर म्हणाले की, स्वयंपुनर्विकास अभियान जन आंदोलन म्हणून गृहनिर्माण क्षेत्रात उभे राहिलेय. मुख्यमंत्री व सरकारने माझ्या शिफारशी स्वीकारल्या आहेत. सुदैवाने नगरविकास व गृहनिर्माण खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्यांनी सांगितले की मी माझ्या खात्याच्या सर्व शिफारशी अमलात आणेन व कृतीत उतरवेन. सहकारमंत्र्यांनाही सूचना दिल्या आहेत. या योजनेतून मध्यम वर्गीय माणसाला सातशे, आठशे, बाराशे स्क्वे फुटाचे घर मिळणार आहे. त्यामुळे गृहनिर्माणसाठी क्रांतिकारी असा अभ्यास गटाचा अहवाल असल्याचे दरेकर म्हणाले.



Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)