देवळाली स्थानकावर गाड्यांना थांबा द्या, अन्यथा आंदोलन

  34

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, सेनेची मागणी; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचे आश्वासन


दे. कॅम्प :कोरोना काळापूर्वी देवळाली रेल्वे स्थानकावर २२ गाड्या थांबत होत्या, परंतु कोरोनानंतर त्यांची संख्या कमी झाली असून, रेल्वे स्थानकावर फक्त काही ठराविक गाड्या थांबत आहेत. या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासावर कोट्यावधीचा खर्च झाला आहे.या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन, रेल्वे राज्यमंत्री आणि रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदन देऊनही आजपर्यंत त्यावर विचार झालेला नाही. याबाबत त्वरीत कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना कडून रेल्वे प्रशासनास देण्यात आला.


दरम्यान , कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या रेल्वे स्थानकावर गाड्या थांबणार नाहीत, तर स्थानकाच्या पुनर्विकासावर पैसे का खर्च केले जात आहेत? तो खर्च फक्त दिखाव्यासाठी आहे का? असा मोठा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचारी असून, इतर स्थानकांप्रमाणेच या रेल्वे स्थानकावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत.


तरीही, जर या स्थानकांवर रेल्वे गाड्या थांबत नसतील, तर रेल्वे प्रशासन इतका खर्च का आणि कशासाठी करत आहे? हा प्रश्न आजपर्यंत अनुत्तरित आहे. येत्या काही दिवसांत जर गाड्या थांबवल्या नाहीत तर आम्ही जनआंदोलन सुरू करू , असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख, सिंधी समाज सेल रतन चावला,शिवसेनेचे अरुण जाधव, पोपटराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष ॲड बाळासाहेब आडके, बाळासाहेब गोडसे,,खंडू मेढे उपस्थित होते.

Comments
Add Comment

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका तयारीला

इगतपुरीतील तीनलकडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त

इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील तीनलकडी पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावर मोठ्या

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक