प्रतिनिधी:जेन स्ट्रीट प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात शेअर बाजरात वादंग निर्माण झाला. यामुळे बाजारातील अहवालानुसार, बीएसई (Bombay Stock Exchange BSE), एनएसई (National Stock Exchange NSE) या दोन्ही बाजारात गुंतवणूकदारांचे १.४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतीय शेअर बाजारातील इतिहासातील हा एक मोठा घोटाळा मानल जाऊ शकतो. सेबीने जेन स्ट्रीटवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवून ऑप्शन्स ट्रेडिंग कंपनी जेन स्ट्रीटवर मोठी कारवाई करत कंपनीच्या ४८४० कोटींची मालमत्ता जप्त केली होती.
या मोठ्या नुकसानानंतर अनेकांनी बाजारातील विश्वासाहर्तेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी अनेक समभागांना 'डाऊन रेटिंग' दिल्याने बाजाराला यांचा फटका बसला आहे. प्रामुख्याने छोट्या मध्यम भागभांडवल असलेल्या (Midcap, Smallcap) कंपन्यांना याचा विशेष फटका बसला. याशिवाय नुकतीच सेबीने पंप व डंप (Pump and Dump) घोटाळ्याचाही भांडाफोड केला होता. त्यानुसार सेबीने देशातील ८० ठिकाणी छापेमारी केली होती. सेबीचे अध्यक्ष तुहीन कांता पांडे यांनी घोटा ळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले होते.
जेन स्ट्रीटवर बाजारातील ट्रेडिंगवर बंदी घातल्याने जेन स्ट्रीटने आपण निर्दोष असल्याचे वेळोवेळी वक्तव्यांनी संकेत दिले होते. आता मात्र जेन स्ट्रीटने आपण ४८४३.५८ कोटी रूपयांची बाजारातील नियामक (SEBI) कडे भरपाई करू मात्र आमच्यावरील बंदी मागे घ्यावी अशा प्रकारची विनंती सेबीकडे केली आहे. 'जेन स्ट्रीटने सेबीला विनंती केली आहे की, सेबीच्या निर्देशांचे पालन करून हे एस्क्रो खाते तयार केल्यानंतर, अंतरिम आदेशानुसार लादलेले काही सशर्त निर्बंध उठवावेत आणि सेबीने या संदर्भात योग्य निर्देश जारी करावेत' असे नेमके सेबीने याविषयी आपल्या एका निवेदनात म्हटले आहे. सेबीने म्हटल्याप्रमाणे, नियामक मंडळ या प्रकारांची सखोल चौकशी करत आहे. ' आम्ही बाजाराची अखंडता व पारदर्शकता टिकवण्यासाठी कटीबद्ध आहोत ' अशी प्रतिक्रिया सेबीने दिली.
याआधी जेन स्ट्रीटवर सेबीने गंभीर आरोप केले होते. बाजारातील शेअर्सच्या किंमतीतील फेरफारसहीत निफ्टी निर्देशांकात कंपनीने गैहहाताळणी (Manipulation) केल्याने अनधिकृतपणे नफा कमावला व यातून इतर छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. असे सेबीने आपल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले होते.सेबीला आढळले की जेन स्ट्रीट 'एफ अँड ओ' (F&0) मध्ये 'कॅश इक्वेल्युएबल' दृष्टीने सर्वात मोठे जोखीम सातत्याने चालवत आहे, विशेषतः इंडेक्स ऑप्शन एक्सपायरी डेजवर हा प्रकार चालला. याशिवाय नियामकाने नमूद केले की 'जेएस ग्रुपच्या ट्रेडिंग पॅटर्नला प्रथमदर्शनी हेरफेर म्हणून वेगळे करणारी गोष्ट म्हणजे अंतर्निहित घटक समभाग (Underlying Component Stock) आणि फ्युचर्स मार्केटमध्ये त्यांच्या हस्तक्षेपाची तीव्रता आणि प्रमाणही होते. सेबीचा मतानुसार एकूणच कथित गैरप्रकारात जेन स्ट्रीट प्रकरणात, कंपनीने गैहहाताळणी करत ३६५०० कोटीचा नफा कमावला होता. याचाच फटका ऑप्शन्स बाजाराला बसल्याने बाजारातील आर्थिक उलाढाल २१% पेक्षा अधिक टक्क्याने घसरली आहे ज्याची अंतिम परिणती म्हणून बाजाराची उलाढाल ६०१.२ लाख कोटीवरून २१% घसरत ४७२.५ कोटींवर गेली आहे.