Friday, October 24, 2025
Happy Diwali

लांब पल्ल्याच्या रेल्वेतील प्रत्येक डब्यात आता सीसीटीव्ही बसवणार

लांब पल्ल्याच्या रेल्वेतील प्रत्येक  डब्यात आता सीसीटीव्ही बसवणार

चार 'डोम टाईप' कॅमेरे निगराणीसाठी 

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच देशातील सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील ७४ हजार डब्यांमध्ये आणि १५ हजार इंजिनांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. सध्या केवळ वंदे भारत, अमृत भारत आणि वंदे मेट्रो गाड्यांमध्येच सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध आहे, पण लवकरच संपूर्ण देशभरातील सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा लागू होणार आहे. सध्या ही यंत्रणा प्रायोगिक स्वरूपात उत्तर रेल्वेमध्ये वापरली जात होती आणि त्याचे परिणाम सकारात्मक आढळले.

प्रवाशांच्या गोपनीयतेचा विचार करताना, कॅमेरे केवळ डब्यांच्या सामान्य हालचाली क्षेत्रात (दरवाज्याजवळ) लावले जाणार आहेत. यामुळे डब्यांमधील खासगी भाग किंवा शयनक्षेत्र सुरक्षित राहील. रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे की हे सर्व कॅमेरे एसटीक्युसी प्रमाणित असतील आणि कमी प्रकाशातही स्पष्ट चित्रफिती मिळतील. अगदी १०० किमी प्रतितासह वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्येही हे सीसीटीव्ही उत्तमरीत्या काम करू शकतील.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा