राज्यात वातावरणात अस्थिरता, पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा

  121

मुंबई : राज्यात हवामानात यंदा मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत असून पूर्वमोसमीपासून ते सध्याच्या मोसमी पावसापर्यंत वातावरणात अस्थिरता जाणवतं आहे. यामुळे पावसाचा अचूक अंदाज बांधणे हवामान खात्यासाठीही कठीण ठरत आहे. अशा पार्श्वभूमीवर मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पुन्हा जोर धरला असून मुंबई, ठाणेसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.


विशेषतः विदर्भ, नागपूर, नाशिक या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून तयार झालेले चक्रीवादळ झारखंड आणि छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रात पोहोचले असून त्याचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला बसला आहे. यासोबतच अरबी समुद्रातून सुमारे ६५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असल्यामुळे राज्यात हवामानात झपाट्याने बदल होत आहेत.



हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार


१३ जुलै रोजी : रत्नागिरी, सातारा, नाशिक घाट प्रदेश, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नगर, पालघर, संभाजीनगर, जालना आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.


१४ जुलै रोजी : तळकोकणासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाथा असलेले पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्हे यलो अलर्टच्या प्रभावाखाली राहतील.


राज्यातील पावसाचा जोर येत्या १५ जुलैपर्यंत कायम राहणार असून सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचे प्रमाण तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे.


तथापि, कोकण आणि मराठवाडा विभागात जोरदार पावसाचा इशारा कायम आहे, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या विस्तृत अंदाजानुसार, जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार असून ७ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत सामान्य पावसाची स्थिती राहणार आहे.


दरम्यान, २२ जुलैपर्यंत पावसामध्ये खंड येण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. त्यानंतर वातावरण अनुकूल झाल्यास पुन्हा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता आहे.बदलत्या हवामानानुसार परिस्थितीत बदल होऊ शकतो.

Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत