‘श्श…... घाबरायचं नाही’ नाटकाचा ३१ जुलैला शुभारंभ

  72

मराठी साहित्य, रंगभूमी आणि सिनेविश्वातील एक तेजस्वी, अष्टपैलू नाव म्हणजे रत्नाकर मतकरी. लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, निर्माता अशा विविध रुपांत त्यांनी मराठी सृजनविश्व समृद्ध केले. विशेषतः गूढकथेच्या प्रकारात त्यांनी एक स्वतंत्र, ठसठशीत वाट निर्माण केली. त्यांच्या कथा केवळ भयाच्या सीमित व्याख्येत अडकत नाहीत, तर मानवी मनोव्यापाराचा अचूक अभ्यास, सूक्ष्म सामाजिक निरीक्षण आणि अंतर्मुख करणारी शैली यांचे प्रभावी मिश्रण त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवते.


त्यांच्या याच बहुआयामी लेखनशैलीला आणि स्मृतीला सलामी देण्यासाठी बदाम राजा प्रॉडक्शन सादर करत आहे-‘श्श… घाबरायचं नाही.’ या विशेष नाट्यपूर्ण सादरीकरणात ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या रत्नाकर मतकरी लिखित दोन गूढ कथांचे रंगमंचीय सजीव रूप प्रेक्षकांसमोर उभे राहणार आहे. या कथा वाचनापुरत्या किंवा केवळ ऐकण्यापुरत्या न राहता, अभिनय, आवाज, प्रकाशयोजना आणि दृश्य सादरीकरणाच्या माध्यमातून एक थेट अनुभव देणाऱ्या रूपात साकारल्या जाणार आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बुधवार, दि. ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता ओपेरा हाऊस, मुंबई येथे सादर होणार आहे.


या नाट्यपूर्ण सादरीकरणाचे दिग्दर्शन ज्येष्ठ आणि कसलेल्या दिग्दर्शक विजय केंकरे करत आहेत. केंकरे यांचे दिग्दर्शन म्हणजे तांत्रिक सफाईसोबतच कथेमागील सूक्ष्म भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची एक सर्जनशील प्रक्रिया. त्यांच्या दिग्दर्शनामुळे मतकरींच्या कथा केवळ ऐकण्यापुरत्याच न राहता, अंतर्मनात थेट पोहोचणाऱ्या दृश्य अनुभवात परिवर्तित होतात.


कलाकार मंडळीदेखील यथायोग्य. पुष्कर श्रोत्री-अभिनय, दिग्दर्शन आणि आवाज अशा तीनही पातळ्यांवर ठसा उमटवणारा बहुआयामी कलाकार. डॉ. श्वेता पेंडसे, जी प्रगल्भ अभिनय आणि आवाजातील भावनिक सूक्ष्मता सहजतेने साकारते आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गिरीश ओक, जे रंगभूमीवरच्या त्यांच्याच सहजतेने आजही समोरचे चित्र भारून टाकतात.


या सादरीकरणाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे-
डॉ. गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे दोघेही पुन्हा एकत्र रंगभूमीवर झळकणार आहेत. त्यांच्या आवाजात, त्यांच्या अस्तित्वात एक वेगळीच रसायनं आहे, जी प्रेक्षकांना त्या गूढ कथांच्या थेट केंद्रबिंदूवर नेते. दोन्ही कलाकार आपल्या या नव्या कलाकृतीसाठी आणि एका वेगळ्या प्रयोगासाठी फार उत्सुक आहेत.

Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा