बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं

  58


पाटणा : बिहारच्या विधानसभेचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदारयादीची सखोल तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत धक्कादायक माहिती हाती आली आहे. बिहारच्या मतदारयादीत बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं आढळली आहेत. ही नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यादीतील या गंभीर चुकांसाठी निवडणूक आयोगाने ३५ बीएलओ आणि २६ सुपरवायझर यांचे वेतन स्थगित केले आहे. या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.


निवडणूक अधिकारी बिहारमध्ये घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करत आहेत. ही तपासणी सुरू असतानाच बनावट कागदपत्रांच्या मदतीने अनेक विदेशी नागरिकांनी यादीत नावाचा समावेश करुन घेतल्याचे आढळले आहे. ही माहिती मिळताच निवडणूक आयोगाने मतदारयादीत घुसखोरी करणाऱ्या बांगलादेश, म्यानमार, नेपाळच्या नागरिकांची नावं यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक आयोगाची धडक कारवाई सुरू झाल्यापासून विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता दिसत आहे. काँग्रेसचे नेते निवडणूक आयोगाची कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण न्यायालयीन पातळीवर त्यांना पुरते अपयश आल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग ३० सप्टेंबर २०२५ रोजी बिहारच्या मतदारांची सुधारित यादी प्रसिद्ध करणार आहे. ही यादी प्रसिद्ध करण्याआधी बोगस मतदारांची नावं वगळण्याचे काम सुरू आहे.


बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार आहे. याआधी निवडणूक घेऊन निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. यामुळे बिहारमध्ये मतदार यादीच्या छाननीचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. पण या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच मतदार यादी छाननीच्या प्रक्रियेमुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसत आहे. आसाम, पद्दुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथे २०२६ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे बिहार पाठापोठ या राज्यांमध्येही मतदार यादीच्या छाननीचे काम सुरू केले जाणार आहे.


विरोधकांनी ९ जुलै रोजी बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या कामाला विरोध म्हणून बंद पुकारला होता. हे आंदोलन झाले तरी निवडणूक आयोगाचे काम थांबलेले दिसत नाही. आयोगाच्या कामामुळे सत्ताधाऱ्यांऐवजी विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.


Comments
Add Comment

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा