लंडन : पोलंडच्या इगा स्वाएटेक या २४ वर्षीय खेळाडूने महिला एकेरी या प्रकारात विम्बल्डन २०२५ ही टेनिस स्पर्धा जिंकली. पोलंडच्या महिला खेळाडूने विम्बल्डन जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वाएटेकचे हे कारकिर्दीतील सहावे ग्रँडस्लॅम आणि पहिले विम्बल्डन आहे. स्वाएटेकने विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवाला सलग सेटमध्ये ६-०, ६-० असे हरवले. आतापर्यंत स्वाएटेकने चार वेळा फ्रेंच ओपन आणि एकदा यूएस ओपन स्पर्धा जिंकली आहे.
विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात स्वाएटेकने पहिला सेट फक्त २६ मिनिटांत जिंकला होता. तिने सलग दुसरा सेट जिंकत विम्बल्डन २०२५ ही टेनिस स्पर्धा जिंकली. इगा स्वाएटेकने आतापर्यंत सहा ग्रँडस्लॅम फायनल खेळून त्या सर्व जिंकल्या आहेत. यामुळे ग्रँडस्लॅम फायनलमध्ये तिची कामगिरी १०० टक्के यशाची आहे.