हिरवा निसर्ग, झाडांचा गारवा, पक्ष्यांचा मंजुळ किलबिलाट, या सौंदर्यात कुणीतरी विषारी कालवलंय. हो खरं आहे. मिरा-भाईंदरमध्ये एका झाडाची हत्या करण्यात आलीय. तीही फक्त एका जाहिरातीसाठी. हे झाडाला मोठे होल दिसत आहेत. यातून या झाडाला विष पाजण्यात आलं.
महाजनवाडी परिसरात एका आऊटडोर मीडिया कंपनीच्या जाहिरात फलकासमोर गुलमोहर च्या झाडाला केमिकल टाकून सुकवण्यात आलंय . ही बाब पर्यावरणप्रेमींच्या लक्षात आली. पर्यावरणप्रेमींच्या तक्रारीनंतर मिरा-भाईंदर महापालिकेनं पाहणी केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कंपनीविरुद्ध काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
झाडाला विष टाकणं म्हणजे फक्त एका झाडाची हत्या नाही, तर आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासावर घाला आहे. हा फक्त निसर्गावरील हल्ला नाही, तर माणुसकीला लावलेला काळा डाग आहे. जाहिरात फलक चमकावा म्हणून झाडांचा बळी द्यायचा, हा विचार निर्दयीपणाचा आहे. पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवलाय. पोलिसांनी गु्न्हाही दाखल केलाय, मात्र वाट पाहायची आहे ती विष देऊन झाडाची हत्या करणाऱ्यांना शिक्षा काय होणार याची...
माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा.. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद