Beed Crime: बीडमध्ये निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून अमानुष मारहाण, तोंडावर केली लघुशंका

बीड येथील माजलगावमध्ये निवृत्त पोलिस फौजदाराला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. दहा ते पंधरा लोकांनी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला खोलीत डांबले आणि दोन तास बेदम चोप दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका निवृत्त सहाय्यक पोलिस फौजदाराकडे असलेल्या सालगड्याचे फक्त बाराशे रुपयांसाठी अपहरण करण्यात आले. आणि त्याच्याकडून दीड लाख रुपये उकळण्यात आले. निवृत्त पोलिस अधिकारी जेव्हा सालगड्याला सोडविण्यासाठी गेले असता त्यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली. आणि यानंतर त्यांना एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. दरम्यान त्यांनी पाणी मागितले असता आरोपी पैकी तीन जणांनी त्यांच्या तोंडावर लघुशंका केली.

या मारहाणीत निवृत्त फौजदाराला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी माजलगाव पोलिस ठाण्यात १० ते १२  जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
Comments
Add Comment

हॉलतिकीट नाही म्हणून परीक्षा नाही, विद्यार्थी गेले थेट पोलीस ठाण्यात ; धक्कादायक परीक्षा व्यवस्थापन

छत्रपती संभाजीनगर : मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या (एमसीए) विद्यार्थ्यांना हॉलिकीट मिळाले नाही. यामुळे हे

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल