पंचवटीत भाजपचा जल्लोष

१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने आनंदोत्सव


नाशिक : मराठा मिलिटरी लॅन्डस्केप ऑफ इंडीया या नावाने महाराष्ट्रातील ११ व तामिलनाडूमधील १अशा एकूण १२ किल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने भारतीय जनता पक्ष पंचवटी मंडलाच्यावतीने मालेगांव स्टॅड, पंचवटी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची स्वच्छता करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.



युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, लोहगड, खांदेरी यांसह नाशिक जिल्हयातील साल्हेर किल्याचा व तामिलनाडूमधील जिंजी किल्याचा समावेश आहे. या निर्णयाचे भाजपा पंचवटी मंडलाच्या वतीने स्वागत करत ढोल ताश्याच्या गजरात फटाके फाडून तसेच नागरीकांना पेढे वाटप करून आनंदोत्सव करण्यात आला.


आनंदोत्सवाप्रसंगी भाजपा नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, माजी शहर अध्यक्ष गिरीष पालवे, पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी, अमित घुगे, उत्तम उगले, ज्ञानेश्वर काकड, दिगंबर धुमाळ, प्रभाकर येवले, नरेश उगले, अमोल हिंगमिरे, गिता सामसुका, प्रविण आहेर, शरद काकड, चित्रा तांदळे, गिता वाघमारे, गौरव पलंगे, अनिल धुमणे, केदार जानोरकर, अरुण कुलकर्णी, विजय देवरगांवकर, सौरभ सोनवणे, सागर परदेशी, अनिल मोरे, तुषार सामसुका, गुलाब सय्यद, भुषण सोनवणे, अमोल जोशी, ओम नाईक, रोशन गुजरानी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


भगव्या फेट्यानी वेधले लक्ष 


यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भगवे फेटे परिधान केले होते. युनेस्को हि जागतिक संस्था असून जगातील १४९ देश या संस्थेच सभासद आहेत. हि संस्था ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपणे जसे की जगप्रसिध्द किल्ले, संग्रालय व वारसास्थळे यांचे जतन करते. महाराष्ट्रातील या किल्यांचा समावेश होण्याकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संस्कृती मंत्रालयाच्या प्रभावी सादरीकरणामुळे व सातत्याने घेतलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळू शकले आहे. या निर्णयाचा प्रत्येक शिवप्रेमी नागरीकांना मनस्वी आनंद झालेला आहे.

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना

पोलिसांनी १२ मुलांना भीक मागण्यापासून वाचवले

शिर्डी: साईबाबा मंदिराच्या धार्मिक स्थळांवर भीक मागण्यासाठी जबरदस्तीने लावलेल्या १२ मुलांना शिर्डी पोलिसांनी

शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या