सर्वात मोठी Tariff बातमी: युएसकडून भारतावर २० टक्क्याखाली टेरिफ लावण्याचा निर्णय? पडद्यामागे 'या' हालचाली

प्रतिनिधी: अर्थविश्वातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.ज्याची प्रतिक्षा भारतीयांना व भारतीय गुंतवणूकदार, शेअर बाजारातील गुंतवणूकदार सगळ्यांना आहे त्यासंबंधी मोठी अपडेट आली आहे. भारत युएस यांच्यातील बोलणी जव ळपास मार्गी लागण्याची शक्यता आहे.सुत्रांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार,टेरिफ दर २०% पेक्षा कमी लावावा अशी गळ भारताने अमेरिकेला घातली आहे. गेल्या दोन आठवड्यात चर्चेला वेग आला असून यावर अंतिम निर्णय घेत ला जाऊ शकतो. मात्र या आठवड्यात तरी भारताला टेरिफदराचे पत्र मिळेल अशी शक्यता कमीच आहे असेही सुत्रांनी म्हटले आहे.


भारतीय शिष्टमंडळ या आठवड्यात युएस वॉशिंग्टन येथे चर्चेसाठी जाणार अशी चर्चा होती.सुत्रांच्या माहितीप्रमाणे या चर्चेला वेग आला आहे. युएसही यावर सकारात्मक विचार करत आहे. मात्र अजूनही ट्रम्प प्रशासन यावर अंतिम निर्णयावर पोहोचलेले नाही. बेसलाईन टेरिफ २०% पेक्षा कमी असाव असे भारतीय शिष्टमंडळाने सुचवले आहे. मात्र शेतकी तसेच कुक्कुटपालन,व संवेदनशील या क्षेत्रातील गुंतवणूकीला परवानगी द्यावी ही अट युएस यापूर्वी घालत होती.यावर हे डील प्रामुख्याने अडकले होते.


आता मात्र यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.अमेरिकेने आतापर्यंत २० देशाहून अधिक देशांना पत्र पाठवून टेरिफ दर कळवले आहेत.चीन १४५%,कॅनडासारख्या देशावर २५%,बांगलादेश ३७%,कंबोडिया ४९%,युरोपियन युनियन २० %, भारत २६% इतका बेसलाईन टेरिफ कर ट्रम्प प्रशासनाने फेब्रुवारी २०२५ पासून लागू केला होता.मात्र जगभरातील दबावाने तो पुढे ढकलून ९ जुलै करण्यात आला होता.आता टेरिफचे नव्याने दर टप्याटप्याने ट्रम्प प्रशासन घोषित करत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या घोषणेत ब्राझील ५०%,जपान २५%,कझाकस्तान २५%, मलेशिया २५%, दक्षिण आफ्रिका ३०% एवढ्या मोठ्या संख्येने वाढ झाल्यानंतर आता भारतावर किती दर युएस लावू शकतो त्याची अजूनही शाश्वती नाही.


यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात भारतावर अमेरिकेने २६% कर लावला होता.नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांना घेरण्याचा प्रयत्न केला होता.ट्रम्प यांनी भारतासह ब्रिक्स राष्ट्रांना अतिरिक्त १०% कर लावण्याची धमकी दिली होती. प्रामुख्याने ती 'अमेरिकन डॉलर' विरोधात, डॉलर घसरवण्यासाठी ब्रिक्स राष्ट्र जबाबदार आहेत असे विधान ट्रम्प यांनी केले होते. त्यामुळेच टेरिफवरचा पडदा अजूनही उठलेला नाही.


तथापि,व्हिएतनाम देशावर फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेने ४०% आयात कर (Tariff)लावला होता.मात्र हा निर्णय बदलून अनपेक्षितपणे केवळ २०% कर लादण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने लागू केला होता.व्हिएतनाम त्या दरामुळे खूष होऊन अजूनही तो कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.ट्रम्पने व्यापार कराराची घोषणा केलेला युके हा एकमेव देश आहे. उर्वरित राष्ट्रांना केवळ पत्रव्यवहारातून कळवले आहे.आगामी काळात सविस्तर चर्चेतूनच तोडगा निघणार आहे. यावर्षी व्यापार चर्चेसाठी व्हाईट हाऊसशी संपर्क साधणाऱ्या पहिल्या देशांपैकी भारत हा प्रमुख देश होता परंतु अलीकडच्या आठवड्यात तणावाचे संकेत दिसून आले आहेत. ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, भारतासोबत करार जवळ आला आहे.'परंतु त्यांनी ब्रिक्स गटात देशाच्या सहभागावर अतिरिक्त शुल्क आकारण्याची धमकी देखील दिली आहे.चर्चा पुढे नेण्यासाठी भारतीय वाटाघाटीकर्त्यांचे एक पथक लवकरच वॉशिंग्टनला भेट देऊ शकते.

Comments
Add Comment

विरोध डावलून सात वर्षांपूर्वीच बांधलेला उड्डाणपूल पाडण्यास बीएमसीची मंजूरी

मुंबई: बीएमसीने गोरेगावमधील वीर सावरकर (एमटीएनएल) उड्डाणपूल पाडण्यासाठी तत्त्वतः परवानगी दिली आहे. सात

आता ओबीसींचा महामोर्चा मुंबईकडे, दसऱ्यानंतर रंगणार निर्णायक लढा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मराठा समाजाने आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं बेमुदत

कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरांचा धुमाकूळ

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनवर चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे, ज्यात दोन प्रवाशांकडून एकूण

भारताचा अमेरिकेला दणका, मॉरिशससोबत स्थानिक चलनात होणार व्यापार

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय व्यापार, प्रामुख्याने तेलाशी संबंधित व्यापार अमेरिकन डॉलरमध्ये होत होता. पण भारताने

ठाणे जिल्हा परिषदेची 'डोअरस्टेप डिलिव्हरी' योजना आहे तरी काय?

ठाणे: ठाणे जिल्हा परिषदेने 'डोअरस्टेप डिलिव्हरी' (Doorstep Delivery) नावाची नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामुळे जिल्ह्यातील

जगातील पहिले महिला नौकायन अभियान मुंबईत सुरू

मुंबई: ११ सप्टेंबर २०२५ रोजी इतिहासाची नोंद झाली, जेव्हा जगातील पहिले त्रि-सेवा सर्व-महिला नौकायन अभियान, "समुद्र