share market marathi: 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजारात सातत्याने घसरण सुरूच ! सेन्सेक्स व निफ्टीसह बँक निर्देशांकही घसरला, ट्रम्पग्रस्त दबाव हा कायम राहणार? जाणून घ्या सविस्तर...

  29

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर मोठी घसरण अपेक्षितच होती ती खरी ठरल्याने अखेरच्या सत्रात सेन्सेक्स ६८९.८१ अंकाने घसरत ८२५००.४७ पातळीवर पोहोचला तर निफ्टी ५० निर्देशांकात २०५.४० अंकांनी घसरत निर्देशांक २५१४९.८६ पातळीवर पोहोचला आहे. आज खूप दिवसानंतर निफ्टी पातळी २५३०० पार केली तरी दुपारी १२ वाजेपर्यंत झालेल्या मोठ्या चढउतारामुळे निफ्टी सतत घसरत गेला. से न्सेक्स बँक निर्देशांकात १५९.९० अंकाने घसरण होत निर्देशांक ६३५९९.०३ अंकावर स्थिरावला व बँक निफ्टी २०१.३० अंकाने घसरत ५६७५४.७० पातळीवर स्थिरावला आहे.


सेन्सेक्स मिडकॅपमध्ये व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.६५%,०.७०% घसरण झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८८%, १.०२% घसरण झाली. आज तुलनात्मकदृष्ट्या दोन्ही निर्देशांकात वाढ जरी झाली असली तरी गुंतवणू कदारांचा दबाव पाहता घसरण झाली. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये आज सकाळप्रमाणेच संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ एफएमसीजी (०.५१%), (०.६८%), मिडस्मॉल हेल्थ केअर (०.४३%) समभागात झाली आहे. सर्वाधिक घसरण मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.४६%), तेल व गॅस (१.२६%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.९७%), ऑटो (१.७७%), मिडिया (१.६०%), समभागात झाली.


अखेरच्या सत्रापर्यंत अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) पातळीत १.२४% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप सिलेक्ट (Nifty Midcap Select) निर्देशांकात १.३९% घसरण झाल्याने बाजाराला सपोर्ट लेवल राखण्यास मदत झाली नाही. याशिवाय आज ब्लू चिप्स कंपन्यांतही संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हेवीवेट एचडीएफसी बँक (१.१६%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.४६%), आयसीआयसीआय बँक (०.१५%) समभागात घसरण झाल्याने निर्देशांकात घसरण झाली.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ ग्लेनमार्क फार्मास्युटिकल (१४.५५%), नेटवेब टेक्नॉलॉजी (७.४३%), पिरामल एंटरप्राईजेस (४.६९%), आनंद राठी वेल्थ (४.३३%), आरबीएल बँक (३.७३%), जिलेट इंडिया (२.९४%),एसईएमई सोलार (२. ८९%), जेपी पॉवर वेंचर (२.६१%), सारडा एनर्जी (२.५४%), विशाल मेगामार्ट (२.३५%), वन ९७ (१.१३%), आयसीआयसीआय लोमबार्ड (०.८८%), एक्सिस बँक (०.८१%), एसबीआय (०.०८%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (४.६२%), डाबर इं डिया (१.६२%), सिमेन्स एनर्जी इंडिया (१.१६%), वेदांता (०.८१%), सनफार्मा (०.५७%), होंडाई मोटर्स इंडिया (०.४२%), पंजाब नॅशनल बँक (०.४१%), नेस्ले इंडिया (०.०८%) समभागात झाली.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण इंडियन रिन्यूऐबल (५.६८%), मेट्रोपॉलिस हेल्थकेअर (४.५३%), बीएसई (३.५६%), अंबर एंटरप्राईजेस (३.०७%), टीसीएस (३.४३%), गोदरेज इंडस्ट्रीज (३.४३%), रामकृष्ण फोर्ज (३.१६%), एमसीएक्स (३.०४%), झी एंटरटेनमेंट (३.५२%), किर्लोस्कर ब्रदर्स (२.८३%), होनसा कंज्युमर (२.३७%), टीव्हीएस (३.४३%), एव्हेन्यू सुपरमार्ट (२.५१%), हिरो मोटोकॉर्प (२.३७%), सिमेन्स (२.३२%), अदानी एनर्जी (१.९१%), युनायटेड स्पिरीटस (१.९१%) समभागात झाली आहे.


आज अखेरच्या सत्रापर्यंत बाजार पातळीवर दबाव कायम होता. भारताबाबत युएस काय टेरिफ निर्णय घेईल याच प्रश्नाने बाजाराला ग्रासले आहे. काल कॅनडावरही ३५% टेरिफ घोषित केल्यानंतर आशियाई बाजारात दबाव निर्माण झाला हो ता. आज अमेरिकन बाजारातील सुरुवातीच्या कलात डाऊ जोन्स (०.६५%) मध्ये घसरण झाल्यानंतर एस अँड पी ५०० (०.२७%), नासडाक (०.०९%) वाढ झाली आहे. कॅनडाचा बातमीचा फटका युरोपियन बाजारातही बसला. सुरुवातीच्या कलात युरोपियन बाजारातील एफटीएसई (०.६०%), सीएसी (१.०२%), डीएक्स (१.०६%) या तिन्ही बाजारात घसरण झाली आहे. आशियाई बाजारातील निकेयी (०.१९%), कोसपी (०.२३%) बाजारात घसरण झाली तरी इतर बाजारात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ ही स्ट्रेट टाईम्स (०.३०%), हेंगसेंग (०.४६%), सेट कंपोझिट (०.९६%), जकार्ता कंपोझिट (०.६०%) बाजारात झाली. काल टीसीएसने आपले तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर बाजारातील गुंतवणूकदारांची काही प्रमाणात निराशा झाली होती. याचमुळे आज आयटी समभागात मोठी पडझड झाली होती. टीसीएस, टाटा इलेक्सीचे शेअरही आज कोसळलेले पाहिला मिळाले. तिमाही निकाल बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत.आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनीचा हा सलग तिसरा तिमाही होता ज्यामध्ये त्याचे उत्पन्न कमी झाले होते.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी कॅनडामधून आयात होणाऱ्या वस्तूंवर १ ऑगस्टपासून ३५ टक्के कर दर जाहीर केल्यानंतर अर्थविश्वातील व्यापारी शीतयुद्ध ट्रम्प यांनी आणखी वाढवले आहे. शिवाय,ज्या देशांना कर (Tariff) पत्रे मिळत नाहीत त्यांच्यासाठी बेसलाइन कर दर १५ टक्के किंवा २० टक्के निश्चित केले जाऊ शकतात, जे सध्याच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना धाकधूक कायम होती. अखेरच्या सत्रात अनपेक्षितरित्या तिमाही निकाल पार्श्वभूमीवर बँक व फायनान्स निर्देशांकात घसरण झाली ज्यामुळे मिडकॅप व स्मॉलकॅप फायनाशिंयल सर्विसेस समभागांना (Stocks) त्याचा फटका बसला आहे.


दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत वाढ झाली आहे. गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.९१% वाढ झाली आहे. प्रामुख्याने कॅनडा, ब्राझील यांना ३५ ते ५०% लावलेल्या टेरिफमुळे सोन्यात मोठी मागणी निर्माण झाली अंतिमतः भाववाढ झाली आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. WTI Futures निर्देशांकात ०.५६% वाढ संध्याकाळपर्यंत झाली होती. ही वाढ प्रामुख्याने जगभरातील युएसकडून होणारी अतिरिक्त टेरिफ वाढी मुळे होत आहे.जागतिक स्तरावर पुरवण्यापेक्षा मागणीत वाढ झाल्याने दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र चीनकडे असलेल्या मुबलक तेलाच्या साठ्यामुळे काही प्रमाणात कच्च्या तेलाच्या निर्देशांकाला सपोर्ट लेवल राखणे शक्य झाले आहे.बहुराष्ट्रीय आयात टेरिफ शुल्कवाढींतर अमेरिकेच्या महसूलात चांगली वाढ होण्याची शक्यता असल्याने आज बाजारातील डॉलरला महत्व प्राप्त झाले. परिणामी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी रोख खरेदीपेक्षा रोख विक्री वाढवल्याची अधिक शक्यता आहे.


मागील महिन्यातच भारत सरकारने भारतीय जीडीपी ६.५% राहू शकतो असे म्हटले होते. याधर्तीवर आता युएसचेही जीडीपी आकडेवारी शुक्रवारी जाहीर होणार आहेत त्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली आहे. याशिवाय काल निफ्टी एक्सपायरीला इंडेक्स ऑप्शन्स व्यवहारात २१% घसरण झाल्याने बाजारातील अस्थिरतेचे वातावरण अधोरेखित झाले. टीसीएस,महिंद्रा अँड महिंद्रा, हिरो मोटरकॉर्प, बजाज ऑटो,विप्रो,अपोलो हॉस्पिटल, टाटा मोटर्स हे निफ्टी ५० मध्ये हे महत्वाचे शेअर्स सर्वाधिक तोट्यात आले होते. मात्र ग्लेनमार्क फार्मास्युटिकल लिमिटेडचा समभाग नव्या आंतरराष्ट्रीय केलेल्या करारामुळे आज १५% पर्यंत उसळला होता. एकूणच बाजारातील सपोर्ट लेवलला आज धक्का बसला होता. रशियन बाजारातून कच्चे तेल खरेदी केल्यास युएस तेल आयातीत ५००% टेरिफ लावण्याच्या विचारात आहे त्याचेही बाजारात धोक्याचे सावट आहे. सोन्याच्या पर्याय म्हणून असलेल्या चांदीच्या औद्योगिक उत्पादनातील मागणीही वाढ ल्याने चांदी महागली जाण्याची शक्यता बाजारात वर्तवली जात आहे.


एकूणच बाजारातील फंडांमेंटल मजबूत असले एकप्रकारे टेक्निकलला धक्का लागल्यामुळे गेले ३ दिवस बाजारात घसरण होत आहे. आज बीएसईत (BSE) एकूण ४१६५ समभागापैकी १५५१ समभागात वाढ झाली आहे तर १५५१ समभागा त घसरण झाली आहे. दुसरीकडे एनएसईत ३०१२ समभागातील १०३० समभागात वाढ झाली असून १८९१ समभागात घसरण झाली आहे  तरीदेखील ब्रिक्स राष्ट्रांवर ट्रम्प यांनी १०% अतिरिक्त शुल्क आकारणी करण्याची धमकी दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय वातावरण ढवळून निघाले आहे.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,' आज आठवड्याचा शेवटचा दिवस त्यामुळे आज मोठ्या पोझिशनपुढे नेण्यापेक्षा आजच सेटलमेंट करून बरेच मोठे फंड शनि वार रविवार काही टेरिफ संबधीत घोषणा होईल या भीतीने पोझिशन क्लीअर करताना आढलले. ब्रिक्स देशांवर १०%+ २६ =३६% टेरिफ भारतावर अपेक्षित आहे.भारत या सगळ्यातून बाहेर पडेल.पण तात्पुरता बाजार खाली येणं अपेक्षित आहेच.तसा तो आज आला. अनिश्चित वातावरणात फार अपेक्षा बाजारा कडुन ठेउ शकत नाही.तसा हा काहीसा काल आहे.इतर देशांची टेरिफप्रमाणे कोणत्या उत्पादनावर आपल्याला कमी टेरिफ असावे या सर्व गोष्टींचा अभ्यास सरकार मधील उच्च पदावरील अधिकारी नक्कीच करत असतील. सुदैवाने विदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री बऱ्यापैकी कमी झाली आहे.पण आपले टेरिफचे आकडे जाहीर झाल्यानंतर काय होईल हे पहाणे महत्वाचे आहे. 'सो फार सो गुड ' अशी परिस्थिती आहे. आता खरा आपल्याला आपल्या म्युचल फंडांचा आधार असणार आहे. काही काल बाजार स्थिर रहाण्याकरीता एसआयपी बंद न करीता लोकांनी सहकार्य करीत रहावे लागेल. त्यामुळे आज अपेक्षेनुसार बाजार खाली आला आहे.पुढील आठवड्यात काही सकारात्मक बातम्यांवर बाजार अबलंबून आहे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'शुक्रवार, ११ जुलै रोजी भारतीय इक्विटी बेंचमार्क्स मंदावलेल्या स्थितीत उघडले आणि संपूर्ण सत्रात तोटा वाढला, कारण व्यापक नफा बुकिंगने बाजाराला वेठीस धरले. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या निराशाजनक तिमाही कामगिरी आणि सावध व्यवस्थापन भाष्य यामुळे वाढलेल्या पहिल्या तिमाहीच्या उत्पन्न हंगामाच्या मंदावलेल्या चिंतांमुळे भावना जोखीम प्रतिरो धक बनल्या. निफ्टी ५० निर्देशांक २०५.४० अंकांनी किंवा ०.८१% ने घसरून २५,१४९.८५ वर बंद झाला. व्यापक बाजारपेठांमध्ये कमकुवतपणा दिसून आला, निफ्टी मिडकॅप १०० ०.८% ने घसरला आणि निफ्टी स्मॉलकॅप १०० जवळजवळ १% ने घसरला, जो बाजार भांडवलात जोखीम-ऑफचा प्रभाव दर्शवितो.


क्षेत्रीयदृष्ट्या, विक्रीचा जोर व्यापक होता. TCS निकालांनंतर टेक क्षेत्रावरील गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झाल्यामुळे निफ्टी आयटी सर्वात जास्त फटका बसला, १.८% ने घसरला.निफ्टी मीडिया १.६% ने घसरला, तर निफ्टी ऑटो १.७% मागे पडला. निफ्टी रिअल्टी आणि निफ्टी इन्फ्रा सारख्या रेट-सेन्सिटिव्ह सेक्टरवरही दबाव आला आणि त्यांनी प्रत्येकी १% घसरण केली. दुसरीकडे, बचावात्मक कंपन्यांनी खरेदीची आवड दाखवली. निफ्टी फार्माने चांगली कामगिरी केली, ०.७% वाढ केली, तर निफ्टी एफएमसीजी ०.५% वाढीसह बंद झाला, ज्यामुळे बाजारातील घसरणीला काही प्रमाणात दिलासा मिळाला.'


बाजारातील निफ्टीतील हालचालीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,' निर्देशांकाने मोठ्या प्रमाणात मंदीचा कँडल बनवला, ज्यामध्ये सलग तिसऱ्या सत्रात सुधारात्मक घसरणीचे संकेत कमी उच्च आणि कमी कमी होते. बाजारातील क्रियाकलाप मोठ्या प्रमाणात स्टॉक-विशिष्ट होते, मॅक्रो आणि मायक्रो दोन्ही आघाड्यांवर ठोस संकेतांची वाट पाहत होते. दैनिक चार्टवरील महत्त्वाचे निरीक्षण असे आहे की निर्देशांकाने मागील 11 सत्रांच्या वरच्या हालचालींपैकी फक्त ३८.२% (२४४७३-२५६६९) मागे घेण्यासाठी आधीच १० सत्रे घेतली आहेत. उथळ रिट्रेसमेंट सकारात्मक रचना आणि संभाव्य उच्च तळाच्या निर्मितीचे संकेत देते. निफ्टीमध्ये २४९००- २५१०० दरम्यान एक महत्त्वाचा आधार क्षेत्र आहे, जो ५० दिवसांच्या EMA (Exponential Moving Average EMA) मागील ब्रेकआउट क्षेत्र आणि अलीकडील अपट्रेंडच्या प्रमुख रिट्रेसमेंट पातळीच्या संगमाने चिन्हांकित आहे. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक या आधार क्षेत्राच्या वर राहील आणि येत्या आठवड्यात २५५०- २५६०० श्रेणीकडे जाईल. म्हणून आम्ही सध्याच्या घसरणीला खरेदीची संधी म्हणून पाहतो.'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की, 'बँक निफ्टीने सलग दुसऱ्या सत्रात कमी उच्च,कमी निम्न पातळीसह सुधारात्मक घसरणीचे संकेत देत मंदीचा कँडल (BearCandle) तयार केला. गेल्या सहा सत्रांमध्ये अपेक्षित रेषांवर निर्देशांक ५६,५००-५७,६०० च्या श्रेणीत एकत्रित होताना दिसत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की निर्देशांक असाच विस्तार करेल.फक्त ५६,५०० च्या खाली गेल्यास ५६,०००-५५,५०० च्या प्रमुख समर्थन क्षेत्राकडे (Support Level) सुधारात्मक घसरणीचा विस्तार होईल.प्रमुख अल्पकालीन समर्थन ५६,०००-५५,५०० क्षेत्रावर ठेवण्यात आले आहे, जे ५०-दिवसांच्या EMA आणि प्रमुख रिट्रेसमेंट पातळीचे संगम दर्शवते. व्यापक कल सकारात्मक राहतो आणि कोणत्याही घसरणीकडे खरेदीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' पहिल्या तिमाहीच्या उत्पन्न हंगामाची सुरुवात मंदावल्याने आणि अमेरिकेने कॅनडावर ३५% कर लादण्या च्या टॅरिफ धमकीत वाढ केल्याने देशांतर्गत बाजाराला नकारात्मक बंदचा अनुभव आला. गुंतवणूकदार बाय-ऑन-डिप्स धोरणासाठी तिमाही उत्पन्नावर लक्ष केंद्रित करू शकतात; तथापि, नजीकच्या काळात, सध्याचे प्रीमियम मू ल्यांकन आणि कमी खर्च आणि टॅरिफ अनिश्चितता यासारख्या जागतिक अडचणी नवीन आवक (Inflow) रोखू शकतात. ऑर्डरमध्ये विलंब आणि नवीन गुंतवणुकीमुळे आयटी निर्देशांक कमी कामगिरी करत आहे ज्यामुळे आर्थिक वर्ष २६ च्या उत्पन्नाच्या अंदाजांवर परिणाम होऊ शकतो.'


आजच्या निफ्टीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले की,' ताशी चार्टवर निर्देशांक मागील स्विंग नीचांकी पातळीपेक्षा खाली घसरल्याने निफ्टी अजूनही कमकुवत आहे. याव्यतिरिक्त, तो दैनंदिन वेळेनुसार २१ EMA च्या खाली घसरला आहे. अल्पावधीतही गती कमकुवत राहते, RSI (Relative Strength Index) नकारात्मक क्रॉसओवरमध्ये आहे. तथापि, अलिकडच्या घसरणीनंतर, निर्देशांक २००-ताशी मूव्हिंग सरासरी च्या समर्थनाजवळ पोहोचला आहे. सुरुवातीच्या ट्रेडिंग तासात २५१५०-२५१६० च्या वर गेल्यास २५२५० आणि २५४०० च्या दिशेने वाढ होऊ शकते. नकारात्मक बाजूने, समर्थन २५०९० आणि २४९०० वर ठेवले आहे.'


आजच्या रूपयांच्या झालेल्या घसरणीवर बोलताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'भांडवल बाजारातील कमकुवतपणा, सोन्या-चांदीच्या वाढत्या किमती आणि कमकुवत जागतिक संकेत यामुळे भावनेवर परिणाम झाला. अमेरिकेकडून ब्राझील आणि कॅनडावर कर वाढल्याने अनिश्चितता वाढली आहे आणि रचनात्मक व्यापार चर्चा होईपर्यंत बाजार सावध राहतील. याव्यतिरिक्त, डॉलर निर्देशांकात सुधारणा दिसून आली आहे, जो ९६.५० वरून ९७.७५ पर्यंत वाढला आहे, ज्यामुळे उदयोन्मुख बाजारातील चलनांवर दबाव वाढला आहे. रुपया ८५.२५ ते ८६.२० च्या श्रेणीत व्यापार करेल अशी अपेक्षा आहे.'


आजच्या बाजारातील सोन्याच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'सोन्याच्या किमती मजबूत राहिल्या, ७०० रुपयांनी वाढून ९७३७५ रुपयांवर पोहोचल्या, तर ०.७०% वाढून व्यापारी करवाढीच्या भीतीने सोन्याला पाठिंबा दिला. अमेरिकेने कॅनडा आणि ब्राझीलवर नवीन कर लादल्याने, नव्याने व्यापारी तणावाच्या प्रतिकूल परिणामांमध्ये बाजारपेठांनी किंमती निश्चित करण्यास सुरुवात केली आहे परिणामी अनिश्चिततेमुळे पुन्हा एकदा सोन्याच्या बाजूने भावना निर्माण झाली आहे. विशेषतः मध्य पूर्वेतील घटीमुळे अलिकडच्या काळात किमतीत सुधारणा झाल्यानंतर. सोन्याला ९५०००-९५५०० रुपयांच्या आसपास चांगला आधार मिळाला आहे, तर प्रतिकार ९९५०० रुपयांच्या आसपास दिसून येत आहे.'


यामुळे आगामी तिमाही निकाल, आयटीतील नवी धोरणे, ट्रम्प प्रशासनाची नवी टेरिफवरील वक्तव्य यांचा एकत्रित परिणाम सोमवारी बाजारात होऊ शकतो असा कयास आहे.

Comments
Add Comment

Jane Street: बाजाराला आणखी एक खळबळजनक पाचर ! जेन स्ट्रीट प्रकरण आणखी गुंतवणूकदारांचे नुकसान करणार? काय आहे नवी घडामोड जाणून घ्या

प्रतिनिधी: बाजारातील गुंतवणूकदार पुन्हा एकदा दबावाखाली येऊ शकतो. जेन स्ट्रीट प्रकरणानंतर संपूर्ण बाजार ढवळून

gold silver marathi news: सोन्यात सलग तिसऱ्यांदा वाढ ! चांदीत तीन आठवड्यानंतर मोठी उसळी! 'ही' आहेत वाढीमागील कारणे !

प्रतिनिधी: सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या दरात तुफानी आली आहे. विशेष म्हणजे चांदीच्या दरातही जबरदस्त वाढ झाली आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या नुकसानाचा पुरावा दाखवा! अजित डोवाल यांचे विदेशी माध्यमांना खुले आव्हान

चेन्नई : पाकिस्तानच्या विरोधातील ऑपरेश सिंदूर दरम्यान भारताच्या कुठल्या भागात नुकसान झाले याचा एक तरी फोटो

Eknath Shinde : उदय सामंत म्हणतात, 'मुख्यमंत्री व्हायला कुवत अन् धमक लागते', तर खासदार म्हस्के म्हणाले राऊतांना मेंटल हॉस्पिटलमध्ये... राऊतांच्या गौप्यस्फोटावर शिंदेंच्या नेत्यांची तिखट प्रतिक्रिया

मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुपचूप दिल्ली दौरा करून

नवी मुंबईत पुनर्विकासाला मोठा दिलासा: धोकादायक इमारतींचा मार्ग मोकळा!

नवी मुंबईतील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प आता मार्गी लागणार, विकासकांना हमीपत्र देऊन करता येणार पुनर्विकास नवी

पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाटरस्त्यावर दरड कोसळली! भोर-आंबेनळी घाटबंदीमुळे पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क लांबला

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यानचा आंबेनळी घाटात