पोलादपूर महाबळेश्वर आंबेनळी घाटरस्त्यावर दरड कोसळली! भोर-आंबेनळी घाटबंदीमुळे पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क लांबला

पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरून पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यानचा आंबेनळी घाटात गुरूवारी पोलादपूर तालुक्यातील पायटा येथे दरड कोसळली. यामुळे भोर पाठोपाठ आंबेनळी घाटबंदीमुळे पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क लांबला असून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने आंबेनळी घाट वाहतूकबंदीची अधिसूचना जारी केली आहे.


पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याच्या सुधारणेचे काम कंत्राटदार आरपीपी-एसआयपीएल (४) यांच्यामार्फत हाती घेण्यात आले असून सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातून जात असून पायटा गावापासुन महाबळेश्वरकडे जाताना १ कि.मी. अंतरावर दरडप्रवण क्षेत्रात गुरूवारी जोराचा पाऊस पडल्यामुळे डोंगरावरील दगड गोठे व माती रस्त्यावर आली. याठिकाणचे माती व दगड गोटे जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे काम कंत्राटदारांमार्फत प्राधान्याने चालू आहे. या दरडप्रवण क्षेत्रामध्ये अजून माती व दगड येण्याची शक्यता असून ते काढण्यास ४ ते ५ दिवस लागणार असल्याने पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे यांनी महाबळेश्वरचे तहसिलदार सचिन मस्के यांना दूरध्वनीद्वारे वाहतुकीसाठी महाबळेश्वर ते पोलादपूर रस्ता बंद ठेवण्याची सूचना केली.



यादरम्यान गुरुवारी दुपारनंतर पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक आनंद रावडे आणि तहसिलदार घोरपडे यांनी कर्मचाऱ्यांसमवेत दरडप्रवण क्षेत्रामध्ये वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहनचालकांना मार्गदर्शन केले. पोलादपूर तहसिलदार घोरपडे यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहनांकरिता मनाई करणे, तसेच हलक्या वाहनांना रेड अलर्ट परिस्थितीमध्ये व शनिवारी व रविवारी वीक एन्डला प्रवेश बंदी करणे आवश्यक असून घाटरस्त्यावर पर्यटक गर्दी करीत असल्याने अपघात टाळण्याकरिता पर्यटक वाहनांना आंबेनळी घाटरस्त्यावर मनाई करण्यासाठी पोलादपूर महाबळेश्वर मार्ग सर्व वाहनांस ४ दिवस वाहतुकीसाठी पुर्ण बंद होण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्याची विनंती केली.


रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयानेही रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलादपूर महाबळेश्वर या आंबेनळी घाटरस्त्यावर डोंगरावरुन आलेले दगड, गोटे व माती काढण्याच्या कामाकरीता ४ दिवस लागणार असल्याने १४ जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आदेश काढण्यासाठी तसेच या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून होण्यासाठी प्रस्ताव दिला.


त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पोलादपूर महाबळेश्वर हा आंबेनळी घाटरस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करण्यासह या कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूर-माणगाव ताम्हाणी मार्गे-पुणे-सातारा व पोलादपूर-चिपळूण-पाटण-सातारा-कोल्हापुर अशी वाहतुक करण्याचे आदेश जारी केले आहेत.


महाड तालुक्यातील वरंध-भोर घाटरस्ता वाहतुकीस बंद केल्यानंतर आता पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटरस्तादेखील वाहतुकीसाठी बंद झाला असून कशेडी घाटातील जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याला भेगा पडल्यामुळे भोगाव दत्तवाडी व कातळी बंगला येथील वाहतूकदेखील नवीन भुयारी मार्गावरील पर्यायी वाहतुकीनंतर दूर्लक्षित झाली आहे. यामुळे पोलादपूर तालुक्यातील प्रवासी जनतेला वाई, महाबळेश्वर, भोर, सातारा व पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाणांशी संपर्क घाटबंदीमुळे संपर्क दूरावला आहे.

Comments
Add Comment

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

सुदानमध्ये ७७ लाख लोक करतायत उपासमारीचा सामना, लाखो मुलांना कुपोषणाचा धोका

सुदान (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान सध्या भयंकर संकटाचा सामना करत आहेत. तेथे आलेल्या