Devendra Fadanvis : भोंग्याच्या मुद्द्यावरून सभागृहात फडणवीसांचं कौतुक, अनिल पाटील म्हणाले, सकाळी १०च्या भोंग्याचं काय करायचं? मुख्यमंत्र्यांचं मिश्किल उत्तर!

मुंबई : राज्यात काही काळाआधी मशिदींवरील भोंग्यांवरून मोठं राजकारण पेटलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला अल्टिमेटम देत मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती. याच मुद्द्यावर भाजप सत्ताधारी असलेल्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारनेही ठोस पावले उचलून कारवाई केली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई करत शहरातील विविध धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईमुळे मुंबई शहर भोंग्यांपासून पूर्णपणे मुक्त झालंय. हा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. भोंग्याच्या मुद्द्यावरुन ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कौतुक केलं. तर मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी दहाच्या भोंग्याचं (संजय राऊत) काय करायचं? असा सवाल उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हसत खेळत उत्तर दिले आहे.



भोंगे दिसले तर परिसरातील पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ३३६७ धार्मिक स्थाळांवरील भोंगे हटवले आहे. महाराष्ट्राने एसोपी केली आहे. ⁠मुंबई पोलिसांनी १६२१ भोंगे हटवले आहेत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. ⁠भोंगेमुक्त मुंबई करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. त्यामुळे आता यासंदर्भात प्रश्न उपस्थित होणार नाही. ⁠कारण आता भोंगे नाहीत. ⁠जर असे भोंगे दिसले तर त्या परिसरातील पोलिस अधिकाऱ्यांची जबाबदारी असेल. या प्रकरणात ⁠जो दंड लावला जाईल त्यातला अर्धा दंड तक्रारदारांना दिला जाईल, असे त्यांनी म्हटले.




आदित्य ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक


यानंतर भोंग्याच्या मुद्द्यावरुन ठाकरेंच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की, त्यांनी सगळ्यांशी चर्चा करून सगळे भोंगे काढलेले आहेत. मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो, त्यात काही दुमत नाही. पण, आता गणपतीचा सण येत आहे. नवरात्रीचा सण येत आहे. दहीहंडी देखील आहे. या काळात मिरवणुका निघतात. अनेकदा स्थानिक पोलीस स्टेशनमधून तिकडच्या मंडळांना परवानग्या असून देखील सतावले जाते. जर मंडळांकडे सर्व परवानगी असतील आणि जे पोलीस या मंडळांना सतावतील त्यांच्यावर कारवाई होणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.



मुख्यमंत्र्यांचं मिश्किल उत्तर!


यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांच्या सवालावर उत्तर देण्यासाठी सभागृहात उभे राहिले. त्यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी म्हटले की, मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडून इतकं चांगलं काम होतं. पण, त्या सकाळच्या १०च्या भोंग्याची देखील माझी तक्रार आहे. याचा देखील तुम्ही विचार करा, असे त्यांनी म्हटले. अनिल पाटील यांनी असे म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याचे हसत खेळत उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की, आता ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात आपल्याकडे कायदा आहे. पण, विचाराच्या प्रदूषणाविरोधातला कायदा आपल्याकडे व्हायचा आहे. तो कायदा झाला की, त्याचा आपण विचार नक्कीचं करू, असं त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका