प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवा, राज्य निवडणूक आयुक्तांचे आदेश

मुंबई : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करावीत , असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे दिले.


महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.


श्री. वाघमारे म्हणाले की, राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल. मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींची आपल्या स्तरावरील उपलब्धता लक्षात घ्यावी. मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आवश्यक संख्येचा अंदाज घेता येईल. मनुष्यबळाबाबत विभागीय आयुक्तांनी समन्वयकाची भूमिका घेऊन सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत वेळोवेळी आढावा घ्यावा. सर्व संबंधितांशी समन्वय आणि नियोजनपूर्वक तयारी केल्यास आपल्याला या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडणे सहज शक्य होईल.


श्री. काकाणी म्हणाले की, मतदाराची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांची अचूक संख्या निश्चित करता येईल. त्या आधारे पुढील नियोजन करणे सुलभ होईल. मतदान केंद्राचा अचूक अंदाज आल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या आवश्यकतेबाबतही नियोजन करता येईल. मनुष्यबळाचाही अंदाज येईल. विभागीय आयुक्तांच्या समन्वयातून आजुबाजूच्या जिल्ह्यातील मनुष्यबळ उपलब्ध करून घेता येईल. एकूणच तयारीबाबतची सर्व तपशीलवार व अद्ययावत माहिती तयार ठेवावी. त्याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. त्यावेळी ही माहिती सादर करावी.

Comments
Add Comment

एका खटक्यात दादर पूर्व रेल्वे स्थानक परिसर साफ

चोरबाजारासह अनधिकृत फेरीवाले आणि गर्दुल्ल्यांवर कारवाई मुंबई :  दादर पूर्व रेल्वे स्थानकासमोरील जागेत मागील

Mumbai Pune Expressway Traffic: तब्बल ३२ तासानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत

मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक तब्बल ३२ तासांनंतर पूर्ववत झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत