इंग्लंडच्या मैदानात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या स्थानावर

  45

लंडन : भारत -इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहने दुसऱ्या दिवशी अचूक टप्प्यावर भेदक मारा करत २ षटकात ३ विकेट्स मिळवत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. या कामगिरीसह बुमराहने भारतीय जलदगती गोलंदाजानं कपिल पाजींचा विक्रमही मोडीत काढला आहे.इंग्लंडच्या मैदानात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता बुमराह दुसऱ्या स्थानावर विराजमान झालाय. आता त्याच्या नजरा नंबर वनचा डाव साधण्यावर असतील.


इंग्लंडच्या मैदानात कपिल देव यांनी १३ कसोटी सामन्यात ४३ विकेट्स घेतल्या आहेत. यात १२५ धावांत ५ विकेट्स ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं बेन स्टोक्सची विकेट घेताच कपिल पाजींचा हा विक्रम मागे टाकला. दुसऱ्या दिवशी दोन षटकातील ३ विकेट्स घेत बुमराहनं इंग्लंडच्या मैदानातील कसोटी सामन्यात ४६ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.


इंग्लंडच्या मैदानात भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत इशांत शर्मा सर्वात आघाडीवर आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५१ विकेट्स घेतल्या आहेत. त्याला मागे टाकण्यासाठी जसप्रीत बुमराहला आणखी ६ विकेट्सची आवश्यकता आहे. लॉर्ड्सच्या मैदानात पहिल्या डावातील दमदार कामगिरीनंतर दुसऱ्या डावातही त्याला हा डाव साधण्याची संधी आहे. जसप्रीत बुमराह याने इंग्लंडच्या मैदानात फक्त ९ सामन्यात ४२ विकेट्स घेतल्या होत्या. १० व्या सामन्यातच अर्धशतकी टप्पा पार करत तो टॉपर होऊ शकतो. जसप्रीत बुमराहनं तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात नंबर वन बॅटर हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड केले होते. इंग्लंड कॅप्टनचाही त्याने त्रिफळा उडवला. एवढेच नाही तर शतकवीर जो रुटलाही त्याने अचून टप्प्यावर त्रिफळाचित केल्याचे पाहायला मिळाले.

Comments
Add Comment

IND vs ENG: दुसऱ्या दिवसअखेर भारत ३ बाद १४५ धावांवर, अद्याप २४२ धावांनी पिछाडीवर

लॉर्ड्स: भारत आणि इंग्ंलंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. यात दुसऱ्या

IND vs ENG: लॉर्ड्समध्ये चेंडूच्या आकारावरून गोंधळ, कर्णधार शुभमन गिल पंचांवर संतापला...

IND vs ENG: भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडचा

लॉर्ड्सच्या एमसीसी संग्रहालयात सचिन तेंडुलकरला मानाचे स्थान!

लॉर्ड्समध्ये सचिन तेंडुलकरच्या चित्राचे अनावरण लॉर्ड्स: इंग्लंड विरुद्ध भारत टेस्ट मॅचच्या पहिल्या

उत्तेजक चाचणीत दोषी : रौप्यपदक विजेती कुस्तीपटू रितिका हुडा चार वर्षांसाठी निलंबित

नवी दिल्ली : आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारी आणि २३ वर्षांख

भारतीय महिला संघाचा इंग्लंडमध्ये इतिहास: पहिल्यांदाच जिंकली टी-२० मालिका!

लंडन: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या भूमीवर एक नवा अध्याय लिहिला आहे. चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडला

IND vs ENG : आजपासून तिसऱ्या कसोटीला सुरूवात, कोण घेणार आघाडी?

लॉर्ड्स: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात