कॅनडामध्ये कपिल शर्माच्यावर कॅफेवर हल्ल्याची जबाबादीर खालिस्तानी दहशतवादी हरजीत सिंह लड्डीने घेतली आहे. हरजीत सिंह लड्डी हा एनआयएच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक आहे.
सोशल मीडियावर या हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात स्पष्ट दिसत आहे की एक व्यक्ती रात्रीच्या अंधारात कॅफेवर गोळीबार करत आहे. ही व्यक्ती कारमध्ये बसून अंदाधुंद गोळीबार करताना दिसत आहे.
कपिल शर्माकडून कोणतेही विधान नाही
दरम्यान, या प्रकरणी कपिल शर्मा अथवा त्याच्या टीमकडून कोणतेही विधान समोर आलेले नाही. दरम्यान, पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या प्रकरणाची चौकशी करत आहे. कपिलच्या कॅफेवर अनेक राऊंड गोळीबार झाले. कॅफेमध्ये गोळ्यांचे निशाणही आहेत. परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.