Nvidia Market Capitalisation: भारताच्या अर्थव्यवस्थेइतके एकट्या Nvidia कंपनीचे बाजार भांडवल! 'इतके' ट्रिलियन डॉलर्सपर्यंत कंपनीचे बाजार भांडवल

प्रतिनिधी: एनवीडिया (Nvidia) ही जगातील सर्वाधिक बाजार भांडवल (Market Capitalisation) असणारी कंपनी ठरली आहे. थोडेथोडके नाही तर बाजार भांडवल तब्बल ४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. बातमीनंतर एनवीडिया (Nvidia) कंपनीचा समभाग (Share) २.८% युएस बाजारात उसळला होता. उसळत असलेल्या आयटी निर्देशांकाबरोबरच वाढत असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढणारा वापर पाहता कंपनीच्या उत्पादनांना अन्यनसाधारण महत्व निर्माण झाल्याने ही वाढ झाली आहे. काल अखेरीस कंपनीचा समभाग १.८० वर स्थिरावला ज्याने कंपनीने बाजार भांडवल ३.९७ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे.


गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या बाजार भांडवलात १५००% वाढ झाली आहे. एनवीडीयानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचा दुसरा क्रमांक लागतो. कंपनीच्या समभागात गेल्या दोन वर्षांत लक्षणीय वाढ झाली होती. आर्थिक वर्ष २०२१ पूर्वी ५०० बिलियन डॉलर्स होते जे २०२५ जुलैपर्यंत जवळपास ४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचले. गेल्या एप्रिलमध्ये कंपनीच्या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले होते. मात्र त्यानंतर बाजारातील वृत्तानुसार कंपनीच्या समभागाने ७४% उसळी मारली आहे. कालच्या या वाढीनंतर युएस बाजारातील एस अँड पी ५०० बाजाराने उसळी घेतली. कंपनीचे भागभांडवल एस अँड पी ५०० बाजारच्या एकूण मूल्यांकनापैकी ७.३% आहे याच्यातूनच कंपनीचे मूल्य अधोरेखित होते.


किंबहुना अहवालानुसार, कॅनडा,व मेक्सिकन शेअर बाजाराच्या एकूण मूल्यांकनापेक्षाही एनवीडिया (Nvidia) बाजार भांडवल अधिक आहे. यानंतर क्रमांक दोन व तीनवर मायक्रोसॉफ्ट व अँपलचा नंबर लागतो. पहिल्या तिमाहीत कंपनीला एकूण ४४.१ अब्ज डॉलर्सचा महसूल मिळाला होता. २७ ऑगस्टपर्यंत कंपनीचा दुसऱ्या तिमाहीचा निकाल अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार, भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन सध्या $४.२ ट्रिलियन इतके आहे,२०२५ च्या अखेरीस ते ४.२७ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे असे असताना भारताच्या अर्थव्यवस्थेइतके बाजार मूल्य एनवीडीयाचे झाले आहे. आकडेवारीनुसार, जागतिक ब्राउझर मार्केटमध्ये ६८% हिस्सा असलेल्या गुगल क्रोमला ट क्कर देण्याचे उद्दिष्ट असलेल्या AI-सक्षम वेब ब्राउझर कॉमेटचा परप्लेक्सिटी एआयने खुलासा केल्यानंतर एनव्हीडियाच्या बाजार भांडवल भांडवलात (मार्केटकॅप) मध्ये ही वाढ झाली आहे.

Comments
Add Comment

पावसामुळे पाचवा सामना रद्द, भारताने टी-२० मालिका २-१ ने जिंकली

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या

Mumbai : विकेंड प्लॅन तयार करा! शहरात लवकरच सुरू होणार एक नवं पर्यटन स्थळ; पण कधी? जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मुंबईच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या गर्दीतून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात शांततेत वेळ घालवू

मोठी बातमी: लाखो लोकांसाठी सेबीकडून मोठी सूचना ! खबरदार...डिजिटल सोन्यात गुंतवणूक करताना 'ही' काळजी घ्या

मोहित सोमण:सेबीने एक मोठी घोषणा केली आहे. सेबीने केवळ आणि केवळ सेबी अधिकृत सोने गुंतवणूकीत पैसे गुंतवण्याचा

AIF Investment SEBI: पर्यायी गुंतवणूक निधी गुंतवणूकीबाबत सेबीचे लोकांना 'हे' आवाहन सेबीकडून नवे परिपत्रक जाहीर

गुंतवणूकदारांच्या अधिकारांबाबत SEBI ने मसुदा परिपत्रक प्रसिद्ध केले प्रतिनिधी:एआयएफ (पर्यायी गुंतवणूक निधी Alternative

ब्रिटिश कंपनी मिनीकडून ऑल इलेक्ट्रिक कंट्रिमन एस ई ऑल ४ कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतात लॉन्च

प्रतिनिधी: ब्रिटिश ऑटोमोटिव्ह ब्रँड मिनी (MINI) कंपनीकडून भारतात ऑल-इलेक्ट्रिक कंट्रीमन SE All4 ही चारचाकी लाँच केली

HKSTP EPIC 2025: केवळ युए युके नाही तर सिंगापूर आणि कॅनडामधील हजारो स्टार्टअप भारतात गुंतवणूकीसाठी इच्छूक!

प्रतिनिधी: वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सिंगापूर आणि कॅनडामधील अनेक आंतरराष्ट्रीय स्टार्टअप्सनी