Maharashtra Legislative Council: उरण फाटा येथील पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी करण्यात येईल- मंत्री उदय सामंत

मुंबई: नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे पारसिक हिलवर वृक्षतोडीबाबत पाहणी करण्यात आली आहे. पारसिक हिल ठिकाणी उच्च विद्युत वाहिनी पॉवर कॉरिडॉर असून वृक्षामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी फक्त झुडुपाची छाटणी केली आहे. येथे वृक्षतोड झाली आहे का, याबाबत चौकशी केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

विधानपरिषद सदस्य भाई जगताप, शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.  ते म्हणाले की, आजबाजूच्या परिसरात बांधकाम चालू करण्यासाठी अनधिकृत जंगलतोड होत असेल, तर याची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यावर कठोर कार्यवाही केली जाईल.
Comments
Add Comment

तणाव वाढला, तैवान जवळ पोहोचला चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा

तैपेई : चीन आणि तैवान यांच्यातील तणाव वाढू लागला आहे. चिनी विमानांचा आणि जहाजांचा ताफा तैवान जवळ पोहोचू लागला

ठाणे पोलिसांनी ज्येष्ठांसाठी विकसित केला ‘आधारवड’ मोबाइल अॅप

ठाणे : ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या

सुबोध भावे साकारणार निम करोली बाबा

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता सुबोध भावे आता हिंदी सिनेसृष्टीत एक मोठी झेप घेत आहे. तो लवकरच येणाऱ्या

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...!

५८ दिवसांच्या स्मरणकोषाचे नाट्य...! महाभारत या महाकाव्याच्या संदर्भाने सांगायचे तर, दक्षिणायन व उत्तरायण यात

सोलापूर विभागात पहिली ‘कवच’ चाचणी यशस्वी

मुंबई : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी रविवारी सोलापूर विभागात ‘कवच’ प्रणालीच्या यशस्वी लोको

शेअर बाजारातील प्राथमिक मार्केट...

डॉ. सर्वेश सुहास सोमण आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खासगीरीत्या आयोजित