महामुंबई मेट्रो प्रवाशांचा तीन लाखांचा टप्पा पार...!

मुंबई: महामुंबई मेट्रोने ३ लाख प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. हे शक्य करणाऱ्या सर्व मुंबईकरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमच्या समर्पित टीमचेदेखील अभिनंदन करतो, अशा शब्दांत महानगर आयुक्त, एमएमआरडीए आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते पुढे म्हणाले की, दर महिन्याला आमच्या प्रवाशांची संख्या सरासरी ५% ने वाढत आहे. आम्ही मुंबईकरांना अखंड, सुरक्षित, वक्ताशीर आणि पर्यावरणपूरक सेवा देण्यास सदैव कटिबद्ध आहोत. याच दिवशी आम्ही एक नवा हरित विक्रमही केला. एकूण ६२ हजार २८२ प्रवाशांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून, कागदविरहित तिकिटांची निवड केली, जो आजवरचा सर्वाधिक आकडा आहे. व्हॉटस्अॅप आधारित मेट्रो तिकिटिंगमध्ये महामुंबई मेट्रो देशात आघाडीवर आहे. आमच्या एकूण तिकीट विक्रीपैकी २०% बुकिंग व्हॉट्सअॅपवरून होते.

 

 

 

 
Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

कचऱ्यात आढळले मृत नवजात अर्भक

डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील साखरे येथील आश्रमशाळेजवळ बुधवारी पहाटेच्या सुमारास नवजात अर्भक मृतावस्थेत

कोण करणार मराठी बिग बॉस ६ सीझनला होस्ट? सलमान खानने दिली माहिती

मुंबई : हिंदी बिग बॉस संपण्याआधीच सलमान खानने मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनला कोण होस्ट करणार याची माहिती दिली.