दिल्ली एनसीआर आणि हरियाणात भूकंप

नवी दिल्ली :  दिल्ली एनसीआरमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाच्या काही भागांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी नऊ वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. दिल्ली एनसीआरला ४.४ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपामुळे जमिनीखाली १० किमी. आतपर्यंत जमीन हादरल्याची नोंद भूकंपमापन केंद्राने केली आहे. संपूर्ण दिल्ली एनसीआर तसेच हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद भूकंपमापन केंद्राने केली. अनेक ठिकाणी दहा सेकंद जमीन हादरत होती. भूकंप झाल्यावर काही ठिकाणी नागरिक खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमधून बाहेर मोकळ्या जागेत आले होते.
Comments
Add Comment

पाणीपुरी खाल्ली आणि वाचा गेली, महिलेचा जबडा सरकला

ओरैया : उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. पाणीपुरी खाल्ल्यामुळे एका महिलेची वाचा गेली.

दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ): दिल्लीसह अनेक प्रमुख विमानतळांवरील जीपीएस स्पूफिंगच्या डेटामध्ये छेडछाड करण्यात

Para-athlete...लग्नातील किरकोळ वादातून हरियाणातील पॅरा-अ‍ॅथलिटची निर्घृण हत्या

हरियाणा : रोहतक येथे एका राष्ट्रीय स्तरावरील पॅरा-अ‍ॅथलिटवर झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात

जागतिक एड्स दिन २०२५ : एड्स इन्फेक्शन कशामुळे पसरतो? एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी!

जगभरात आज, १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन (World AIDS Day) साजरा केला जातो. हा दिवस एड्ससारख्या (AIDS) अतिशय धोकादायक

आजपासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडणार तीन महत्त्वाची विधेयकं, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान चालेल ज्यात

Parliament Winter Session : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन! पान मसाला, सिगारेट, तंबाखू महागणार, अर्थमंत्री सीतारामन आज विधेयक सादर करणार

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकार