मोहित सोमण
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आशियातील सर्वात जुना शेअर बाजार! आयुष्य हे सुंदर आहे अस म्हणतात काही म्हणतात वैकुंठातून स्वर्गात जाता येते. स्पष्ट सरळसोटपणे सांगायचे झाले तर आजच्या जगात बँक बॅलन्स व सुरक्षित भविष्य या मुळे समाजात स्थानही मिळते प्रतिष्ठा मिळते व स्वर्गही मिळतो. ज्याला मुंबईचा स्वर्ग म्हणतात तेच हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. १८७५ साली या शेअर बाजाराची सुरूवात झाली. एका पिंपळाच्या झाडाखाली एका गुजराती व पारशी व्यक्तीने एक त्र जमून या बाजाराचा पाया रचला. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सातासमुद्रापार भरारी घेत बाजाराची झेप गिफ्ट निफ्टी स्थापन करण्यापर्यंत गेली आहे. बाजाराच्या संस्थापकांचे नाव प्रेमचंद रायचंद. एका बनिया वैश्य जैन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. किशोरवयात असतानाच वडिलांबरोबर त्यांनी मुंबईला स्थलांतर केले.
महाराष्ट्राच्या भूमीला पदस्पर्श केल्याने या पिंपळाच्या झाडाने अर्थव्यवस्थेला आज नव्या शिखरावर नेले. सतत बदलत्या जागांतून व्यवहार करण्यासाठी अखेरीस १८७४ साली आजच्या दलाल स्ट्रीटला शेअर बाजारासाठी कायमची जागा मिळा ली. सुरवातीला मोठी आव्हाने होती. त्यातील सर्वात मोठी समस्या लोकांचा विश्वास जिंकणे, नुकत्याच झालेल्या औद्योगिक क्रांतीचे लोण जगभर पसरले होते. त्यामधून रामचंद यांनी साथीदारासह भागभांडवल हिस्सा व्यापार करण्यास सुरुवात केली. 'नेटिव्ह शेअर अँड स्टॉक एक्सचेंज इनिशिएटिव' या नावाने संस्था सुरू केली. सुरूवातीला छोट्या छोट्या प्रमाणात असलेले आज व्यवहार आज लाखो कोटींच्या घरात गेले. आजही वयाच्या ६० पेक्षा अधिक असलेल्या गुंतवणूकदारांनी फिजिकल कागदपत्रे असलेले शेअर्स पाहिले असतील. आज डीमॅटचा जमान्यात हे फिजिकल शेअर नवीन 'जेन झी' पीढीला पाहणे हे अतुलनीय ठरेल.
शेअर बाजाराने त्यांच्या कार्यकाळात अनेक चढउतार पाहिले अनेक उच्चांक पाहिले अनेक निचांक पाहिले. वाढत्या मागणीमुळे बीएसईचा सेन्सेक्स (Sensex) ८० दशकाच्या उत्तरार्धात आला. नव्वदीच्या दशकात याची घौडदौड सुरु झाली. आज अगदी कमोडिटी बाजारापासून करन्सी ट्रेडिंग, एफ अँड ओ पर्यंत बाजार अगदी हाताच्या बोटावरील अँपवर आला आहे. अनेक लोकांना या शेअर बाजाराने करोडपती केले तर काहींना बरबादही केले. अनेकदा सर्वसामान्य नागरिकां नी बाजारात घिसडघाईत कमावणारा जुगार समजण्याची चूकही केली हे आपण प्रांजळपणे कबूल केले पाहिजे.
आजही बाजारात लक फॅक्टर महत्वाचा मानला जातो. भारतीय बाजार भावनांवर चालतो फंडामेटंलपेक्षा भावनांवर का चालतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला शेअर बाजाराच्या फ्लॅशबॅकमध्ये जावे लागेल. बाजारात अनेक चढउतार आले पूर्वी तंत्रज्ञानही प्रगत नव्हते. ब्रोकरकडून सगळी गुंतवणूक केली जाई. उत्तरार्धातील सुरुवातीला जसे चढ पाहिले तसे १९९०-१९९३ या काळात बाजाराने टक्के टोणपे पण खाल्ले. याला बाजारापेक्षा घटना जबाबदार होत्या. मुंबईतील दंगली नंतर झालेले साखळी बॉम्बस्फोट याने बाजार हालवून सोडला. तत्पूर्वी पहिला धक्का हर्षद शांतिलाल मेहताने केलेला घोटाळा बाजारातील पुनर्रचना करण्यास कारणीभूत ठरला. १९८९ साली स्थापन झालेली सेबी (सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) नावापुरती अस्तिवात होती. मात्र हर्षद मेहता या भारतातील सर्वात मोठ्या घोटाळ्यानंतर सरकारचे डोळे खाडकन उघडले व सेबीला संसदीय ताकद पुरवून बाजाराला सावरण्याचे काम झाले. याचकाळात अनेक घटना घडल्या. १९९६ वर्षाच्या सुरुवातीला आयटीची क्रांती जगभरात सुरू झालेली होती. मोटोरोलाने जगातील पहिला मोबाईल बनवल्यानंतर संपर्क माध्यमे बदलली. तशीही जागतिक अर्थव्यवस्था बदलत होती. युरोपियन बाजारातील वर्चस्व आता संपूर्णपणे अमेरिकेकडे सरकले होते.
इथे मुंबई शेअर बाजारही स्थित्यंतरांतून जात होता. असे असताना फिजिकल शेअर्सचे २००० दशकाच्या सुरुवातीला यांचे रूपांतर डी मॅट मध्ये होण्यास सुरुवात झाली होती. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कॅपिटल अर्थातच भांडवलाची गरज भासू लागली. या भांडवलाला चालना देण्याचे काम कॅपिटल मार्केटने केले. असे होतानाच २००० सालाच्या मध्यावर डेरिएटिव कमोडिटी बाजारही वाढत होता. १९९१ सालच्या जागतिकीकरणानंतर रूपयाला हळूहळू महत्व आले होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी भारताचे दालन खुले झाले. ते खुले होतानाच २० व्या शतकातला केतन पारेख, अब्दुल करीम तेलगीसारखा मुद्रांक घोटाळ्याने अक्षरशः बाजाराला पोखरले.
याउलट अमेरिकन बाजारात लेमन ब्रदरसारखे आर्थिक नाडीवर आधारित धक्के तिकडच्या शेअर बाजारात बसले. भारतीय बाजारातील मुख्यतः धक्के हे एकतर आर्थिक व्यवहारावर अथवा घोटाळ्यांवर आधारलेले होते. याची परिणती भार तीय शेअर बाजारात भावनात्मक होण्यास कारणीभूत ठरली.
आज बीएसईचा १५० वा वर्धापन दिन आहे. याच बाजाराने सामान्य माणसाला गुंतवणूक करण्याची संधी दिली. याच बाजाराने गुंतवणूकीला आपले द्वार खुले केले. मुदत ठेवीवर १% का ०.५०% अधिक व्याज मिळेल यावर खूष होणारी जनता अधिक परतावा मिळवू लागली. यात जोखीम असली तरी बँकेच्या मक्तेदारीला पहिले आव्हान बाजारानेच दिले. टाटा,रिलायन्स इंडस्ट्रीज स्थापन केलेल्या प्रवर्तकांना याच बाजारातून आर्थिक शक्ती मिळाली. भांडवलातूनच समृद्धी होते. नेम के हेच सलाईन बाजार देत आहे.
बदलत्या परिस्थितीत बाजारही बदलले. मात्र आजही आशा आहे. वेळोवेळी होणारी विविध चर्चा काहीही असली तर आजही बाजार थाटात उभा आहे. लोक येतील लोक जातील पण बाजार आपल्या पायावर मजबूत उभा आहे. मुळात बाजार अभ्यासाचा विषय आहे. थोड्या परताव्यासाठी बाजारात दाखल होत असलेल्या गुंतवणूकदाराची कमी नाही. मात्र नैतिकतेने शेअर बाजाराला काळानुसार सुसंगत राखणे हे प्रत्येक मुंबईकराचे कर्तव्य आहे. आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी होण्यात शेअर बाजाराचा अनन्यसाधारण वाटा आहे तो आपण मान्यच केले पाहिजे.
जागतिक अर्थव्यवस्थेत प्रगत असलेल्या देशांकडून विविध ठिकाणी शेअर बाजार उघडले. बीएसईने केवळ शेअर बाजाराचे नाही तर अगदी मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतासह अनेक अर्थव्यवस्थेचे सिद्धांत सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यास मदत केली. मुंबईचा अर्थव्यवस्थेत बीएसईचा सिंहाचा वाटा आहे. सेबीसारख्या नियामक मंडळामुळे आज सामान्य माणसाचा बाजारातवरील विश्वास वाढला आहे. अनेक उद्योजक आपले उद्योग सूचीबद्ध करत आहेत. कोणी आपल्या पोर्टफो लिओत वाढ करत आहे. कोणी शेअर बाजारातील गुंतवणूकदार बनले आहे.
या बाजाराने कुणाला नव्या शिखरावर पोहोचले तर तर कोणाला विविध रोजगाराच्या संधी मिळाल्या. अजूनही अनेक क्षेत्रातील फलश्रुती याच बाजाराने दिली. अभ्यास हा फंडामेंटलचा पाया आहे. काही सामान्य नागरिकांना नफा मिळवून देणारा बीएसईचा कल्पवृक्ष आजही डौलाने उभा आहे. मागील वर्षाच्या अदानी समुहावर हिंडनबर्ग केलेल्या आरोपानंतर तसेच नुकत्याच झालेल्या वेदान्ता या अनिल अग्रवाल यांच्या कंपनीचा समावेश आहे. दिवस येतात दिवस जातात पण हा बाजार टिकला पाहिजे.
पिंपळाच्या झाडाने पावन झालेल्या बीएसईचा एप्रिलमध्ये १५० इंडेक्स काढण्यापर्यंतह ही मजल असामान्य आहे. मुंबई शेअर बाजाराची ही असामान्य वाढ प्रेरणादायकही आहे. बोलावे तितके कमी आहे. किंबहुना शेअर बाजाराला पुढील एआय तंत्रज्ञानामुळे चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. दुसरे महायुद्धानंतर सहकाराची भूमिका महत्वाची ठरली. काही काळ कम्युनिस्टांनी गाजवल्यानंतर आता जगभर भांडवलशाहीची मेघ आहे. उलट साम्यवादी देशच अधिक भांडवलवादी झाले आहेत.
भविष्यातील तरतूद म्हणून शेअर बाजार मोठी भूमिका बजावणार आहे. ही क्रांतीची मशाल आज १५० वर्ष जूनी झाली. मुलभूत प्रश्न इतकाच उरला आहे तो म्हणजे अर्थकारणाचे एकत्रित समावेशन. आर्थिक शिक्षणाला अन्यनसाधारण महत्व आहे. बीएसई व एनएसईने आज विद्यार्थ्यासाठी विविध कोर्सेस उपलब्ध करुन दिले आहेत. मुलांनी त्याचा पुरेपूर फायदा घेण्याची आवश्यकता आहे. जर सामान्य परिस्थितीमध्ये किंवा सामान्य परिवारातला व्यक्ती जर शेअर बाजारात चांगले कमावू शकतो तर पौगंडावस्थेतच निर्माण झालेली गोडी अधिक उपयोगी पडू शकते. बीएससीने गुंतवणूकदारांना खूप काही दिले. याशिवाय प्रामुख्याने अर्थकारणात जात, धर्म, पंथ यांची पर्वा न करता प्रत्येक व्यक्तीला स्वतः चार बुद्धीवर, स्वतः चा सदसदविवेकबुद्धीवर, हुशारीवर, अभ्यासावर चांगले पैसे कमावण्यासाठी बाजाराने संधी दिली.
काल याच बीएसईचा वर्धापनदिन झाला. यावेळी केवळ कौतुकाचे सोहळे न करता भारताला प्रगत अर्थव्यवस्था बनवण्यासाठी प्रथम भारतातील प्रत्येक तरूणाचा शेअर पोर्टफोलिओ अथवा किमान म्युचल फंड गुंतवणूक असणे आवश्यक आहे. आज साधनांची कमी नाही. सहजपणे ज्ञानार्जन करणे सहज शक्य आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग उन्नतीसाठी करणे हे उपयुक्त ठरेल. देशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्येक व्यक्तीचे योगदान प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे असते. बीएसईसारखे शेअर बाजार कंपनीच्या वाढीसोबत आपल्या आर्थिक व मानसिक उन्नतीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात. आशियातील सर्वात जुन्या बाजाराचा भारतीय अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान आहे जे कोणीच नाकारू शकत नाही. अशा या बीएसईचा वर्धापनदिनानिमित्त सर्व वयोगटातील सर्व गुंतवणूकदारांना मनःपूर्वक व हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारत चिरतरूण व निरंतर अर्थ समृद्ध राहो हीच बीएसईसाठी प्रार्थना! आशा आहे भारत लवकरच दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल.