Stock Market marathi : 'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात डोनाल्ड ट्रम्प यांचा अलार्म ! सेन्सेक्स निफ्टी कोसळला 'ही' कारणे जबाबदार! जाणून घ्या विस्तृत विश्लेषण VIX ३ टक्क्यांवर

  25

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. गिफ्ट निफ्टीतील घसरणीनंतर आज बाजारातील घसरणीचे संकेत मिळाले होते. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या भारतासह ब्रिक्स राष्ट्रांवर अतिरिक्त १०% टेरिफ वाढ करण्याच्या निर्णयानंतर बाजारातील दबाव पातळीत वाढ झाली. ज्यांची परिणती निर्देशांकातील घसरणीमुळे झाली आहेत. सेन्सेक्स १७६.४३ अंकाने घसरत ८३५३६.०८ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशां कातही ४६.४० अंकांने घसरण होत निफ्टी पातळी २५४७६.१० पातळीवर स्थिरावला.


आज सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीत दोन्हीमध्ये घसरण झाली आहे. बँक सेन्सेक्स ६७.६७ अंकांने घसरण ६३९६९.१५ पातळीवर व बँक निफ्टी ४२.७५ अंकांने घसरत ५७२१३.५५ पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स मिडकॅपमध्ये ०.०५% घसरण व स्मॉलकॅपमध्ये ०.४५% वाढ झाली आहे. मिडकॅपमध्ये झालेली ही सलग तिसऱ्यांदा घसरण आहे.जेन स्ट्रीट प्रकरणानंतर मिडकॅपमध्ये सातत्याने घसरण होत असल्याचे पहायला मिळाले होते. निफ्टी मिडकॅपमध्ये ०.१३% घसरण व स्मॉलकॅपमध्ये ०.५९% वाढ झाली आहे.


निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये आजही संमिश्र प्रतिसाद मिळाला. अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एफएमसीजी (०.८०%), ऑटो (०.३८%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.४८%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (०. ५८%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.१५%) समभागात झाली आहे. अखेरीस सर्वाधिक घसरण सकाळप्रमाणेच रिअल्टी (१.४९%) समभागात कायम राहिली असून त्याखालोखाल आयटी (०.७८%), मेटल (१.४०%), पीएसयु बँक (०.४३%), तेल व गॅस (१.२५%ध, हेल्थकेअर (०.३६%), खाजगी बँक (०.०२%) समभागात झाली.


आज अखेरच्या सत्रापर्यंत वीआयएक्स (२.०९%) मोठ्या प्रमाणात सक्रीय राहिला. परिणामी बाजारातील निर्देशांकात घसरण होण्यास कारणीभूत ठरला. ट्रम्प यांच्या टेरिफ वाढीच्या निर्णयानंतरही बाजारातील फंडामेंटल मजबूत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच टेरिफ वाढ सवलतीला १ ऑगस्टपर्यंत मुदत दिल्याने बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला. याशिवाय फार्मा समभागावर आगामी काळात घोषणा होण्याची शक्यता असल्याने फार्मा समभाग घसरले. कॉपरवर ५०% अधिकचे टेरिफ जाहीर केल्यानंतर मेटल समभागातही मोठा दबाव निर्माण झाला होता.


मिडकॅपमध्ये गेले दोन दिवस घसरण होत आहे जी प्रामुख्याने जेन स्ट्रीट प्रकरणानंतर झाली. दुसरीकडे मात्र स्मॉलकॅपमध्ये फंडांमेंटल मजबूत असल्याबरोबरच अनेक अहवालातील अपेक्षित कामगिरीमुळे या छोट्या कंपनीच्या समभागला पाठिंबा दिसला आहे. कालपासून पुन्हा बँक निर्देशांकाने नकारात्मक कामगिरी केली होती. प्रामुख्याने आगामी तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर हा निर्देशांक कोसळला. याशिवाय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगली होती. परिणामी आज परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) यांच्याशिवाय घरगुती गुंतवणूकदार (DII) यांनी बाजारातील रोख विक्री अधिक प्रमाणात केल्याची शक्यता आहे.


रिलायन्स इंडस्ट्रीज,आयसीआयसीआय बँक यांसारख्या ब्लू चिप्स कंपन्यांमध्ये आज नका बुकिंग (Profit Booking) झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय उद्या टीसीएस (TCS) सारख्या कंपन्या आपला तिमाही निकाल जाहीर करतील ज्याच्या भावनेभोवतीही बाजार खेळत होते. व्हाइसरॉय रिसर्चने वेदान्ता कंपनीवर केलेल्या गंभीर आरोपांचा फटकाही बाजारात दिसत आहे. दरम्यान, पीएसबीने आर्थिक वर्ष २५ च्या पहिल्या तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर यु नियन बँकेचे शेअर्स ४% ने घसरले. आज आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यावर दबाव निर्माण झाल्याने आज सोन्यात घसरण झाली होती. दुपारपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.४४% घसरण झाली. प्रामुख्याने डॉलर वधारल्याने तसेच घटलेल्या मागणीमुळे सोने घसरले. चांदीतही गेल्या ४ दिवसांमध्ये कुठलाही बदल झालेला नाही.आज कच्च्या तेलाच्या (Crude Oil) निर्देशांकातही वाढ झाली आहे. दुपारपर्यंत कच्च्या तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०?३१% वाढ झाली आहे. Brent Future निर्देशांकात ०.१९% वाढ झाली आहे.


बुधवारी WTI कच्च्या तेलाच्या वायद्यांचा भाव प्रति बॅरल 69 डॉलरवर पोहोचला, निर्देशांकाने दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळात आज उच्चांक गाठला. पुरवठा खंडित होण्याचे धोके आणि अमेरिकेच्या उत्पादन अंदाजात घट झाल्यामुळे तसेच लाल समुद्रातील जहाजांवर हुथींच्या नव्या हल्ल्यांमुळे पुरवठ्यात अडचणी येण्याची भीती निर्माण झाली, कारण मध्यपूर्वेकडून युरोप आणि आशियामध्ये कच्च्या तेलाच्या शिपमेंटसाठी समुद्री इनलेट हा एक महत्त्वाचा मार्ग आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ मेट्रोपोलिस हेल्थकेअर (१०.२८%), स्टर्लिंग विल्सन (८.५५%), निवा बुपा हेल्थ (६.४१%), इमामी (६.२%), सायरमा एसजीसटेक (५.६१%), गार्डन रिच (५.०२%), आरबीएल बँक (४.२६%), एमआरएफ (३.९८%), कोरोमंडलम इंटरनॅशनल (४.२९%), हिताची एनर्जी (३.९२%), चोलामंडलम फायनान्स (२.७२%), सिमेन्स एनर्जी (२.६१%), आयसीआयसीआय प्रोडुंशियल (२.३८%), श्रीराम फायनान्स (१.८१%), डाबर इंडिया (१.७६%), वरूण बेवरेजेस (१.६६%), इंडियन हॉटेल्स कंपनी (१.४७%), बजाज फायनान्स (१.४०%), गोदरेज कंज्युमर प्रोडक्ट (१.२८%), एचडीएफसी बँक (०.४९%), जियो फायनांशियल सर्विसेस (०.३०%) समभागात झाली आहे.


अखेरच्या सत्रात सर्वाधिक घसरण जेल इंडिया (३.९५%), युनियन बँक (३.७७%), वेदान्ता (३.४१%), हिंदुस्थान कॉपर (३.२९%), सुंदरम फायनान्स (२.८१%), इंद्रप्रस्थ गॅस (२.५२%), सिमेन्स (२.३८%), भारत फोर्ज (१.३१%), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (२.३२%), भारत पेट्रोलियम (२.००%), डीएलएफ (१.५७%), अपोलो (१.२७%), डॉ रेड्डीज (१.१२%), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स (०.९९%), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.२१%), आयसीआयसीआय लोमबार्ड (०.८२%), ग्रासीम इंडस्ट्रीज (०.८१%) समभागात झाली आहे.


आज युएस शेअर बाजारातील सुरूवातीच्या कलात संमिश्र प्रतिसाद आला. डाऊ जोन्स (०.२४%), नासडाक (०.०५%) वाढ झाली आहे तर एस अँड पी ५०० (०.०७%) घसरण झाली आहे. युरोपियन बाजारातही एफटीएसई (०.३६%), सीएससी (१.२६%) व डीएक्स (१.०४%) समभागात वाढ झाली आहे. युकेशी झालेल्या यशस्वी करारानंतर युरोपियन बाजाराचा कौल डौलदार आहे. आशियाई बाजारातील संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. गिफ्ट निफ्टीत संध्याकाळपर्यंत (०.११%) वाढ झाली असून निकेयी २२५ (०.३३%), स्ट्रेट टाईम्स (०.२५%), जकार्ता कंपोझिट (०.५७%), कोसपी (०.६०%) बाजारात वाढ झाली आहे तर नुकसान शांघाई कंपोझिट (०.१३%), हेगसेंग (१.०७%), सेट कंपोझिट (०.४७%) बाजारात झाले.


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,' संपूर्ण जगाच्या व्यापाराची उलथापालथ होईल असं एकंदरीत चित्र दिसत आहे.२५%ते ५०% ड्युटी -आयात कर हा अमेरीकन नागरिक सहन करू शकतील का ? प्रत्येक देशाला स्वताच्या देशात उत्पादने कशी विक्री होतील. या समस्येवर काय तोडगा निघेल? अमेरीकेशी हळूहळू व्यापार अनेक देश कमी करतील. ज्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे अमेरिकेच्या निर्यातीवर बऱ्यापैकी अवलंबून आहे असा देश म्हणजे चीन.सगळ्यात या टेरिफची आग चीनची अर्थव्यवस्थेची वाट लावणार हे निश्चित.तसेच अनेक छोटे देश जे अमेरिकेच्या आयातीवर अवलंबून आहेत. तसेच अनेक भारतीय कंपन्या ज्या अमेरिकेवर अवलंबून आहेत उदा.जेम ज्वेलरी,कृशी उत्पादने,ऑटो स्पेयर पार्ट,रेडीमेड कपडे.आजही फार्माबद्दल काहीही चर्चा अमेरीकेतुन येत नाही, सॉफ्टवेअर उत्पादनांवर काय परीणाम होईल? अशा अनेक विषयांवर आज तरी भारतात साशंकता आहेच.


आज १४ देशांना २५ ते ५०% या प्रमाणे टैरिफ १ ऑगस्ट पासुन लागु केलं आहे. गॅट (GATT) एग्रीमेंटप्रमाणे हे सर्व जर योग्य असेल तर ठीक होतं पण एकंदरीत याविरोधात ट्रेड काउंसिलकडे दाद मागणे गरजेचे आहे. किंवा अमेरीका, सोमा लिया यांना एकाच कॅटेगरी मधे बसवा.आणि डेवलपिंग अंडर डेव्हलपिंग,व डेवलप ही बिरूद काढुन टाकावीत.आता सगळे देश एक समान झाल्यासारखे भासत आहेत. अमेरिका जगातील अफ्रीकन देशांप्रमाणे भासत आहे.अमेरिकेचे उत्प न्न वाढविण्यासाठी केविलवाणे प्रयत्न करताना दिसत आहे. या स्वताची चुक सुधारण्याच्या नादात किती देशांचं वाटोळं होणार ते दिसेलचं.याचा प्रत्येक देशावर व त्यातील अनेक छोट्यामोठया कंपन्यांवर व त्या अनुषंगाने कामगार,अधिकारी, उत्पादन,उत्पन्न, महसुल,जीडीपीवरही नक्की परिणाम होणारच.


अमेरिकेला जर आर्थिक संकटातुन बाहेर पडायचं असेल तर असे कठोर निर्णय घेणे भागच आहे.पण ते हळूहळू घेणे अपेक्षित होते.आज संपूर्ण जग अमेरिकेसह या डोनाल्ड ट्रम्प महाशयांनी वेठीस धरलेले आहे. अमेरिकेतुनही या सगळ्याला विरोध होत आहे. सगळ्यात महत्त्वाचे किती टेरिफ ग्राहकांच्या माथी मारता येऊ शकेल तेवढेच मारता येईल. मागील तीन महिन्यांपासुन अनेक वस्तुंचा तुटवडा अमेरिकेतील माॅल मधे आहेच. तो अजुन तीव्र होईल. या सगळ्यातून चीनला मोठा फटका बसणार असे आज तरी जाणवत आहे .मेक्सिको हा देश ही ७६ ते ८०% अमेरिकेतील निर्यातीवर अवलंबून आहे.तेथील अनेक कंपन्यां चायनीज आहेत. म्हणजेच थोडक्यात सांगायचे तर चायनीज वरचष्मा अमेरिकेला कमी करायचा तर आहेच पण त्या बरोबर अमेरिकेचं उत्पन्न वाढवण्याचे घिसाडघाई प्रयत्न, ते कितपत यशस्वी होतात का ट्रम्प सरकार कोसळतय हे पहायचे. तोपर्यंत बाजार स्थिर राहतील ही अपेक्षा करणं ही चुकीच होईल.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीचे तांत्रिक व डेरिएटिव विश्लेषक सुंदर केवात म्हणाले की,' जागतिक स्तरावर अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, निफ्टी २५,५१४ वर स्थिर स्थितीत उघडला, जो दिवसाच्या अंतर्गत नीचांकी २५,४७२ आणि उच्चांक २५,५४८ वर पोहोचला. निर्देशांक एका मर्यादित श्रेणीत व्यवहार करत राहिला, जो संपूर्ण सत्रात एका बाजूला असलेल्या मार्गाचे प्रतिबिंब आहे. क्षेत्रानुसार ग्राहकोपयोगी वस्तू,ऑटोमोबाई ल्स, उपभोग आणि वित्तीय सेवांमध्ये ताकद दिसून आली, तर धातू, रिअल्टी आणि आयटी समभागांमध्ये कमकुवतपणा कायम राहिला. भारत-अमेरिका टॅरिफ वाटाघाटींमधील घडामोडींवर सहभागींनी बारकाईने लक्ष ठेवल्याने बाजारातील भावना सावध राहिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्टपासून टॅरिफ लागू करण्याची घोषणा केल्यानंतर, आणखी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही अशी घोषणा केल्यानंतर हे घडले. या घोषणेचा सर्वाधिक फटका धातू क्षेत्राला बसला, विशेषतः अमेरिकेने नवीन टॅरिफ लादण्याची योजना जाहीर केल्यानंतर. ट्रम्प यांनी ५०% टॅरिफची मागणी केल्याने बाजाराच्या मूडवर आणखी परिणाम झाला.


डेरिव्हेटिव्ह्ज विभागात, मॅनकाइंड फार्मा, हिंदुस्तान कॉपर, वेदांत, केन्स टेक्नॉलॉजी आणि फिनिक्स मिल्स सारख्या समभागांमध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट अँडिशन्स दिसून आल्या.निर्देशांकाच्या बाबतीत, या आठवड्यात निफ्टीसाठी सर्वाधिक ओपन इंटरेस्ट बिल्ड-अप २५,६०० आणि २६,००० च्या कॉल साईडवर दिसून आला, तर पुट साईडवर २५,५०० आणि २५,४०० च्या पातळीवर सपोर्ट दिसून आला. पुट-कॉल रेशो (पीसीआर) सध्या ०.८१ वर आहे, जो बाजारातील सहभागींमध्ये सावधगिरीची भावना दर्शवितो.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'भारत-अमेरिका व्यापार करार आणि पहिल्या तिमाहीच्या उत्पन्न हंगामाच्या सुरुवातीबद्दलच्या चिंतेमुळे बाजारातील भावना मंदावल्याने बुधवारी इक्विटी बेंचमार्क निर्देशांक किंचित कमी झाले. निफ्टी ५० निर्देशांक मंदावला आणि संपूर्ण सत्रात एका मर्यादित श्रेणीत व्यवहार करत होता, ज्यामध्ये दिवसभर एकत्रीकरणाचे सत्र सुरू झाले. तथापि, उच्च पातळीवर विक्रीचा दबाव निर्माण झाला, ज्यामुळे नफा बुकिंग सुरू झाली ज्यामुळे निर्देशांक ४६ अंकांनी किंवा ०.१८% ने खाली आला आणि २५,४७६.१० वर बंद झाला.


क्षेत्रीय आघाडीवर, सर्वत्र कामगिरी संमिश्र होती. निवडक उपभोग-केंद्रित काउंटरमधील ताकदीमुळे निफ्टी एफएमसीजी ०.८% ने वाढून टॉप गेनर म्हणून उदयास आला. निफ्टी ऑटोने ०.३८% वाढ केली, तर निफ्टी फार्मानेही किरकोळ वाढ नोंदवत हिरव्या रंगात बंद झाला. उलट, जागतिक समकक्षांकडून आलेल्या कमकुवत संकेतांमुळे निफ्टी आयटीला अडचणींचा सामना करावा लागला आणि ०.७८% ने घसरण झाली. निफ्टी मेटल आणि निफ्टी रियल्टी यांना विक्रीचा फटका बसला, अनुक्रमे १.४०% आणि १.४९% ने घसरले, ज्यामुळे ते दिवसातील सर्वात मोठे पिछाडीवर पडले. निफ्टी एनर्जी आणि निफ्टी इन्फ्रा देखील दबावाखाली आले, १% पर्यंत घसरले. व्यापक बाजारपेठेत, निफ्टी मिडकॅप निर्देशांक मोठ्या प्रमाणात रेंज-बाउंड राहिला आणि सत्रात ०.१३% ने किंचित कमी झाला. दरम्यान, निफ्टी स्मॉलकॅप १०० ने बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली, ०.५९% वाढ नोंदवली, जी व्यापक विश्वात निवडक खरेदीची आवड दर्शवते.'


आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे,' निर्देशांकाने एका लहान बेअर कॅन्डलची निर्मिती केली ज्याच्या दोन्ही दिशेने लहान सावल्या होत्या आणि गेल्या सत्राच्या किंमत क्रियेत बंद राहिल्याने सलग चौथ्या सत्रात एकत्रीकरण सुरू राहिल्याचे संकेत मिळत होते. पुढे जाऊन, आम्हाला अपेक्षा आहे की निफ्टी हळूहळू २५,६०० वर असलेल्या तात्काळ प्रतिकाराकडे जाईल. या पातळीपेक्षा जास्त ब्रेकआउट २५८०० च्या वरच्या दिशेने आणखी वर जाऊ शकते. तथापि, २५,६०० च्या वर टिकून राहण्यात अपयश आल्यास २५६००-२५३३० श्रेणीतील चालू एकत्रीकरण लांबू शकते. संरचनात्मकदृष्ट्या, व्यापक कल सकारात्मक राहतो आणि नजीकच्या काळात निर्देशांक २५, २००-२५,८०० बँडमध्ये व्यापार करण्याची शक्यता आहे.प्रमुख स्थितीत्मक आधार २५२००- २५००० वर ठेवण्यात आला आहे, जो २०-दिवसांच्या EMA (Exponential Moving Average EMA)आणि मागील एकत्रीकरण क्षेत्रावरच्या का ठाशी (२५,२००-२४,५००) जुळतो. जोपर्यंत निर्देशांक या गंभीर समर्थन क्षेत्राच्या वर राहील तोपर्यंत आम्ही खरेदी-ऑन-डिप्स धोरण राखतो.'


आजच्या बाजारातील बँक निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे,' बँक निफ्टीने डोजी कॅंडलस्टिक पॅटर्न (Dozy Candle Pattern) तयार केला जो मागील सत्राच्या किंमत श्रेणीमध्ये बंद राहिला आणि सलग चौथ्या सत्रात सकारात्मक पूर्वाग्रहासह एकत्रीकरणाचे संकेत देत होता. आम्हाला अपेक्षा आहे की येत्या सत्रांमध्ये निर्देशांक ५६५००-५७६०० च्या श्रेणीत एकत्रीकरण वाढवेल. येत्या आठवड्यात फक्त ५७६०० च्या वरची हालचाल ५८२०० -५८,५०० पातळींकडे आणखी वर उघडेल. प्रमुख आधार (Support Level)  ५६,०००-५५,५०० क्षेत्रावर ठेवण्यात आला आहे, जो प्रमुख तांत्रिक निर्देशकांचा संगम (Consolidation) दर्शवितो - ज्यामध्ये ५०-दिवसांचा EMA आणि अलीकडील रॅलीचा ६१.८% फिबोनाची रिट्रेसमेंट (५५१४९-५७६१४) समाविष्ट आहे. व्यापक कल सकारात्मक राहतो आणि कोणत्याही घसरणीकडे खरेदीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.'


बाजारातील निफ्टी हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तंत्रज्ञान विश्लेषक रूपक डे म्हणाले,' निफ्टीने जोरदार वरच्या हालचालीनंतर रेंज-बाउंड हालचाल पाहिली, २५५००-२५५५० च्या आसपास कडक प्रतिकाराचा सामना करावा लागला. तासिक (Hour) चार्टवर, निर्देशांक ५०-तासांच्या साध्या मूव्हिंग सरासरीच्या खाली घसरला आहे, तर आरएसआय देखील ५० च्या खाली गेला आहे, जो कमकुवत गती दर्शवितो. तथापि तो २५२०० -२५,२५० च्या ब्रेकआउट झोनच्या वर कायम आहे, जो अल्पावधीत तात्काळ आधार म्हणून काम करू शकतो. जोपर्यंत ही पातळी टिकून राहते तोपर्यंत व्यापक कल सकारात्मक राहतो. २५५५० च्या वर सतत हालचाल केल्यास नवीन चढउतार होऊ शकतात.'


आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,' भारतीय प्रमुख निर्देशांक मोठ्या प्रमाणात श्रेणीबद्ध राहिले, तर देशांतर्गत वापराच्या थीम गुंतव णूकदारांच्या भावनांवर भर देत राहिले. एफएमसीजी आणि विवेकाधीन खेळाडूंच्या सुरुवातीच्या भाष्यातून पुनर्प्राप्तीचे हिरवे अंकुर सूचित होतात, ज्याला महागाई कमी होणे, निरोगी मान्सून आणि वाढती ग्रामीण मागणी यामुळे पाठिंबा मिळा ला आहे. जागतिक व्यापार तणाव आणि कमोडिटी टॅरिफ असूनही, गुंतवणूकदारांचे लक्ष देशांतर्गत उत्पन्न आणि संरचनात्मक वाढीच्या चालकांकडे वाढत आहे, ज्यामध्ये शहरी मागणीत अनुक्रमिक पुनर्प्राप्ती आणि पायाभूत सुविधांवर आधा रित खर्चात वाढ यांचा समावेश आहे.'


आजच्या बाजारातील सोन्यावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले,' भारतीय प्रमुख निर्देशांक मोठ्या प्रमाणात श्रेणीबद्ध राहिले, तर देशांतर्गत वापराच्या थीम गुंतवणूकदारांच्या भावनांवर भर देत राहिले. एफएमसीजी आणि विवेकाधीन खेळाडूंच्या सुरुवातीच्या भाष्यातून पुनर्प्राप्तीचे हिरवे अंकुर सूचित होतात, ज्याला महागाई कमी होणे, निरोगी मान्सून आणि वाढती ग्रामीण मागणी यामुळे पाठिंबा मिळाला आहे. जा गतिक व्यापार तणाव आणि कमोडिटी टॅरिफ असूनही, गुंतवणूकदारांचे लक्ष देशांतर्गत उत्पन्न आणि संरचनात्मक वाढीच्या चालकांकडे वाढत आहे, ज्यामध्ये शहरी मागणीत अनुक्रमिक पुनर्प्राप्ती आणि पायाभूत सुविधांवर आधारित खर्चात वाढ यांचा समावेश आहे.'


आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,'डॉलरच्या तुलनेत रुपया ८५.९० च्या जवळ कमकुवत झाला परंतु सुरुवाती च्या तोट्यानंतर थोडासा सावरला. चालू व्यापार करार वाटाघाटी आणि शुल्क विलंब वाढवल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला, ज्यामुळे रुपया स्थिर होण्यास मदत झाली आणि ८६.०० च्या जवळ आणखी घसरण मर्यादित झाली. रुपया ८५.३० ते ८६.२० च्या श्रेणीत व्यापार करेल अशी अपेक्षा आहे.'

Comments
Add Comment

मीरा भाईंदर पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली, मोर्चा प्रकरण भोवलं

मिरा भाईंदर: मिरा भाईंदरमध्ये काल (८ जुलै) संपन्न झालेला  मराठी भाषिक मोर्चा होऊ न देण्यासाठी पोलिसांनी सर्वात

AMFI Mutual Fund marathi news: म्युच्यल फंड गुंतवणूकीत जून महिन्यात रेकॉर्डब्रेक वाढ ! SIP गुंतवणूकीत नवा उच्चांक! जूनमधील Inflow ' इतक्या ' कोटींवर

प्रतिनिधी:असोसिएशन ऑफ म्युचल फंड फंड ऑफ इंडिया (The Association of Mutual Fund AMFI) या मंडळाने आज म्युचल फंडाने जून महिन्यातील

Ashish Shelar : शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेत पारदर्शकता आणू : मंत्री आशिष शेलार

मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रतिपुर्ती योजनेची प्रक्रिया आँनलाईन व

घाटात प्रेत फेकणाऱ्यांचा पर्दाफाश; एका महिलेसह तिघांना बेड्या!

पोलादपूर: आंबेनळी आणि कशेडी घाटरस्त्यांवर मृतदेह टाकून पळून जाण्याच्या घटनांना आता चाप

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

Dada Bhuse : खोट्या माहितीच्या आधारे ‘अल्पसंख्यांक’ दर्जा मिळवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई होणार : शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई : राज्यातील काही शाळांनी शासकीय लाभ आणि विशेष सवलती मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर करून ‘अल्पसंख्यांक’