मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

सर्व ७ तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या ७२.६१ टक्के जलसाठा


मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव आज (९ जुलै) सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाचा एक दरवाजा १ फूट उघडण्यात आला असून १०२२ क्युसेक प्रति सेकंद वेगाने विसर्ग सुरु आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.


मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ जलाशयांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ दिनांक ७ जुलै २०२५ रोजी सुमारे ९० टक्‍के भरले आहे. या धरणाचे ३ दरवाजे उघडण्‍यात आले आहेत.


आज सकाळी ओसंडून वाहू लागलेल्या मोडक सागर तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १२८९२.५ कोटी लीटर (१२८,९२५ दशलक्ष लीटर) आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अर्थात सन २०२४ मध्ये दिनांक २५ जुलै रोजी, सन २०२३ मध्ये २७ जुलै रोजी तलाव ओसंडून भरून वाहू लागला होता.


मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून १०५०९१.२ कोटी लीटर (१०,५०,९१२ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठ्याच्या अर्थात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत ७२.६१ टक्के इतका आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

सातही धरणांमध्ये वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणे भरल्याने

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती - मुख्यमंत्री

मुंबई : देशात उद्या, दि. 22 सप्टेंबर पासून दुसऱ्या टप्प्याचे वस्तू व सेवा कर सुधारणा लागू होत असून, या सुधारणा

नवरात्रोत्सवासाठी मुंबादेवी मंदिर सज्ज

मुंबई : मुंबईचे नाव ज्या मुंबादेवीमुळे पडले, त्या मुंबादेवी मातेचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह इतर राज्यांतूनही

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण राज्यातील अकरावीची अर्थात FYJC ची

आता नरिमन पॉईंट ते मिरा-भाईंदर केवळ अर्ध्या तासात

मुंबई: दक्षिण मुंबई आणि मुंबई उपनगरला जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसरकारने

नवरात्रोत्सवात मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मुंबई : उद्यापासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. संपूर्ण मुंबईत सणाची तयारी जोरात सुरू आहे. शहरभर मंडप,