मुंबई : बॉलीवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आपल्या क्लासी आणि हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. करीनाच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिची पर्सनल लाईफसुध्या नेहमीच चर्चेत असते. सध्या बेबो व्हेकेशनवर असून आपले काही हॉट फोटो ती सोशल मीडियावर शेअर करतेय. या फोटोंमध्ये करिनानं मोनोकनी घातली आहे. सोशल मीडियावर करीनाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. मात्र, चर्चा फक्त करीनाच्या फोटोचीचं नाहीतर ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे.
नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली अहमदाबाद : गुजरातमध्ये पूल ...
करीना कपूर खान प्रेग्नंट?
सोशल मीडियावर करीनानं जे फोटो शेअर केलेत, त्यामध्ये ती स्किन आणि ब्लॅक कलरच्या मोनोकनीमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. फोटोमध्ये करिनाचं पोट पाहून नेटकऱ्यांना ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याची शंका आली आहे. तेव्हापासूनच करिना कपूर प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका युजर्सनं लिहिलंय की, ही प्रेग्नंट वाटतेय. तर, दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, खरंच ही तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे? अशा अनेक कमेंट्स करीना कपूरच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून केले जात आहेत.
मोनोकनीमध्ये बेबोचा सेक्सी लूक
करीना कपूरनं अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं. या दोघांना दोघांना दोन मुलं आहेत. एक तैमूर आणि दुसरा जेह अली खान. तैमूर आणि जेह सोशल मिडिया सेंसेशन आहे. दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. करीना कपूरच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचं झालं तर, करिना सर्वात शेवटी सिंघम अगेनमध्ये दिसलेली. या फिल्ममध्ये तो अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली. या सिनेमात तिनं अवनी सिंघमची भूमिका साकारलेली. 'सिंघम अगेन' २०२४ मध्ये रिलीज झालेला.