Sunday, August 24, 2025

राज्य सरकारच्या योजनांची माहिती, सेवा मिळणार एकाच पोर्टलवर

राज्य सरकारच्या योजनांची माहिती, सेवा मिळणार एकाच पोर्टलवर

योजनांच्या अंमलबजावणीमधील एकसूत्रतेसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : शासनाच्या विविध खात्यांच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईटवर, पोर्टलवर जाण्याचा त्रास आता संपुष्टात येणार आहे. योजनांचा लाभघेऊ इच्छिणाऱ्यांचा त्रास कमी व्हावा यासाठी राज्यातील सर्व सामाजिक महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये एकसूत्रता असावी, मासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्वच संवर्गातील अथवा स्तरातील लाभार्थ्यांना सरकारच्या योजनांची माहिती, सेवा एकाच 'ऑनलाईल पोर्टल'वर मिळणार आहे.

या पोर्टलची माहिती लाभार्थ्यांना मिळावी यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व महामंडळांसाठी सामाईक मार्गदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे. हे मार्गदर्शन केंद्र संबधित महामंडळ विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून चालविण्यात येणार आहे. राज्यातील समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी, कृषी या विभागांसह इतर सामाजिक सर्व विभागांच्या वतीने विविध संवर्गातील नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत, यासाठी शासनाच्यावतीने या विभागांच्या अंतर्गत असलेल्या महामंडळांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात.

अशा आहेत मार्गदर्शक बाबी

  • शासनाच्यावतीने नव्याने स्थापन होणारी सर्व महामंडळाची माहिती देखील या पोर्टलमध्ये समाविष्ट केली जाणार आहे.
  • सध्या अस्तित्वात असलेल्या महामंडळाच्या प्रशासकीय संरचनेत कोणताही बदल न करता त्यांना या पोर्टलचा लाभ घेता येणार आहे.
  • सर्व महामंडळाच्या संकेतस्थळामध्ये एकसंधता राखता येणार आहे.
  • या पोर्टलचे कामकाज कसे सुरू आहे, याचा आढावा घेऊन त्यामध्ये काही। बदल करावयाचे असल्यास शासनाने एक समिती नियुक्त केली आहे.
Comments
Add Comment