EX Dividend Today: आज 'या' कंपन्यांच्या Ex Dividend साठी उरले काही तास ! लाभांश मिळवायचा आहे? मग त्वरा करा !

प्रतिनिधी: आज काही कंपन्यांच्या समभागावर लाभांश मिळवण्यासाठी अखेरचा दिवस ठरणार आहे. Mphasis, Pfizer, Hitachi, SML Isuzu, Sundaram Finance या समभागात आजच गुंतवणूक केल्यास त्याचा एक्स लाभांश (Ex Dividend) मिळणार आहे. हे शेअर्स उद्या खरेदी केल्यास मात्र संबंधित गुंतवणूकदारांना त्याचा परतावा मिळणार नाही.


Ex Dividend: आज कुठल्या समभागाचा शेवटचा दिवस 


१) Mphasis- कंपनीने ३१ मार्च २०२५ पर्यंत ५७ रूपये प्रति समभागावर लाभांश सुचवला आहे. दर्शनी मूल्य (Face Value) १० रूपये असलेल्या या समभागावर (Stocks) वर हा परतावा मिळणार आहे. कंपनीची अंतिम घोषणा आगामी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत होऊ शकते. अंतिम निर्णय संचालक मंडळ घेणार आहे.


२) Hitachi Air Conditioning - Johnson स्थापित हिताची एअर कंडिशनिंग कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना अंतरिम लाभांश (Interim Dividend) ३६ रूपये प्रति समभाग जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी हा परतावा असणार आहे.


३) Sundaram Finance- मार्च २०२५ पर्यंत कंपनीने विशेषतः संचालक मंडळाच्या बैठकीत पेडअप कॅपिटल असलेल्या २१० कोटींवर २१ रुपये प्रति समभाग लाभांश जाहीर केला. म्हणजेच कंपनीला मार्च २०२५ पर्यंत एकूण ३५ रुपये प्रति समभाग मिळणार आहे.


४) SML ISUZU Limited - कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी १८ रूपयाचा लाभांश जाहीर केला आहे.


५) Pfizer Limited - कंपनीच्या संचालक मंडळाने ३५ रूपयांचा लाभांश सूचवला आहे. याशिवाय कंपनीच्या ७५ व्यख वर्धापनदिनानिमित्त विशेष १०० रूपये प्रति समभाग लाभांश मिळू शकतो.


६) Elegant Marbles and Grani Industries - कंपनीने एकूण १ रूपयांचा प्रति समभाग घोषित केला.


७) Kabra Extrusion Technik - कंपनीने एकूण २.५० रूपये प्रति समभाग निश्चित केला होता.


आज या शेअर्समध्ये काय परिस्थिती?


सकाळच्या सत्रात Mphasi शेअर्समध्ये १.२२% घसरण झाली होती. Hitachi Energy कंपनीच्या समभागात १.७५% वाढ झाली आहे. Sundaram Finance शेअर्समध्ये १.९९% घसरण झाली आहे. SML ISUZU Limited शेअर्समध्ये ३.०२% वाढ झाली आहे. Pfizer Limited शेअर्समध्ये १.५१% वाढ झाली आहे. Elegant Marbles शेअर्समध्ये ०.८०% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment

मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह राज्यातील

रेडी रेकनर दर 'जैसे थे', फडणवीस सरकारचा घर खरेदीदारांना दिलासा

मुंबई : नवीन घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना राज्य सरकारने एक अत्यंत सुखद वार्ता दिली आहे. २०२६-२७ या

अश्विनी भिडेंनी BMC आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला

मुंबई : ज्येष्ठ सनदी अधिकारी अश्विनी भिडे यांनी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते

राज्यात १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत राज्य सरकारने आज, मंगळवारी एकाचवेळी १० वरिष्ठ सनदी

Donald Trump : फ्लोरिडातील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टला आता डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव

वॉशिंग्टन : अमेरिकेतील फ्लोरिडा येथील पाम बीच इंटरनॅशनल एअरपोर्टचे नाव बदलून आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

आयकर कायद्यामुळे पगारात घट, तर पीएफ निधीत वाढ, एक एप्रिलपासून पगार, ओव्हरटाईम आणि कामाच्या नियमात बदल

मुंबई : केंद्र सरकारने चार नवीन कामगार संहिता पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी नियम जवळजवळ अंतिम केले आहेत. यामुळे