आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याप्रकरणी कंत्राटदाराला १० लाखांचा दंड

निष्काळजीपणा, नियोजनातील त्रुटीमुळं डोगस-सोमा जेव्ही या कंत्राटी कंपनीला भुर्दंड  


मुंबई:  मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात वेळेपूर्वी हजेरी लावणाऱ्या मान्सूनने मुंबईकरांची चंगलीच भंबेरी उडवली होती, यादरम्यान मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साठले होते. इतकेच नव्हे तर मुंबईचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला आणि काही दिवसांपूर्वीच सेवेसाठी उघडण्यात आलेल्या मेट्रो लाईन ३ मार्गिकेच्या उर्वरित भागांमधील आचार्य अत्रे चौक स्थानकामध्ये ही पाणी शिरलं. त्यामुळे विरोधी पक्षांकडून मेट्रोच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. तसेच सरकारवर मेट्रो स्टेशनच्या कामावरुन टीका करण्यात आली होती. आता त्या घटनेप्रकरणी कंत्राटदाराला दोषी धरण्यात आले असून,  त्यासंबंधीत डोगस-सोमा जेव्ही (DOGUS-SOMA JV) या कंपनीला १० लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.


२६ मे रोजी आलेल्या पावसामुळे आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकावर पाणी शिरण्यास कारणीभूत असलेल्या प्रत्येक घटकांची सरकारकडून कसून चौकशी करण्यात आली.  या चौकशीत निष्काळजीपणा आणि नियोजनातील त्रुटी आढळल्याने कंत्राटदाराला दंड करण्यात आला आहे.



मेट्रो स्थानकात पाणी शिरण्याचे कारण आलं समोर


मेट्रो स्थानकात पाणी शिरण्याची घटना मुख्यत्वे B2 एंट्री/एक्झिट इंटरफेसवर बसवलेल्या तात्पुरत्या फायर बॅरियर सिमेंट प्रीकास्ट पॅनेल वॉलमध्ये बिघाड झाल्यामुळे घडल्याच समोर आलं आहे.  बॅरिअर फुटल्यामुळे पावसाचे पाणी आणि कचरा स्टेशन बॉक्समध्ये प्रवेशला, ज्यामुळे चिखल साचला आणि पाण्याचा प्रवाह प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स, अंडर क्रॉफ्ट लेव्हल, AFC सिस्टम, सिग्नलिंग, टेलिकॉम, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि कंट्रोल रूम पर्यंत पोहोचला.



घटनेच्या वेळी डिवॉटरिंग सिस्टीम अपयशी ठरली


या पाण्यामुळे स्टेशनवरील आर्किटेक्चरल डिझाइन/सजावटीचे नुकसान झाले आणि प्रवासी सुविधांवर प्रतिकूल परिणाम झाला त्यामुळे तात्काळ सेवा बंद करावी लागली होती. मेट्रोच्या कंत्राटदार कंपनीने पूर्वी EE-B3 वर एक समर्पित डिवॉटरिंग सिस्टीम बसवलेली होती. यामध्ये अनेक पंप होते, जे नियमित पाणी गळती व पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी सक्षम होते. मात्र, घटनेच्या वेळी कंत्राटदाराचा ऑपरेटर पाणी शिरत असल्यावर वेळेवर कृती करण्यात अपयशी ठरला. पंप वेळेवर सुरु न झाल्यामुळे पाणी संपूर्ण स्टेशनमध्ये पसरले या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत सीजी/चीफ प्रोजेक्ट मॅनेजर -१ राजेश कुमार मित्तल यांनी कंत्राटदार डोगस-सोमा जेव्हीला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या कंपनीचा दोष निश्चित झाल्यानंतर ₹१० लाखांचा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती