अभिनेत्री आलिया भटला असिस्टंटने लावला ७७ लाखांचा चूना


मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश शेट्टी हिला जुहू पोलिसांनी बंगळुरूहून अटक केली आहे. वेदिकावर आलियाची प्रोडक्शन कंपनी इटरनल सनशाइन प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या पर्सनल अकाऊंटमधून तब्बल ७६,९०,८९२ चा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप आहे. मे २०२२ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली.


मिळालेल्या माहितीनुसार, आलियाची आई आणि प्रोडक्शन हाऊसच्या संचालक सोनी राजदान यांनी २३ जानेवारी २०२५ रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टीने २०२१ मध्ये आलिया भटची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि २०२४ पर्यंत या पदावर राहिली. या काळात तिला आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक अधिकार देण्यात आले होते.


पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, वेदिकाने बनावट बिलं बनवली आणि आलियाला त्यावर स्वाक्षरी करायला लावली. हे खर्च आलियाच्या प्रवास, मीटिंग्स आणि इतर कार्यक्रमांशी संबंधित आहेत असं खोटं सांगून ती अभिनेत्रीची सतत दिशाभूल करायची.


तिने ऑनलाईन टूल्सचा वापर करून प्रोफेशनलपणे ही बिलं डिझाईन केली, जेणेकरून ती खरी वाटतील. आलियाने या बिलांवर स्वाक्षरी केल्यानंतर, संबंधित रक्कम एका जवळच्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर केली जायची. मित्र नंतर सर्व पैसे वेदिकाला परत करायचा. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर, वेदिका शेट्टी फरार झाली आणि सतत तिचं लोकेशन बदलत राहिली. ती सर्वात आधी राजस्थान, नंतर कर्नाटकमध्ये, नंतर पुणे आणि शेवटी बंगळुरूला पोहोचली. जुहू पोलीस पथकाने तिला बंगळुरूहून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत बेस्ट पुरवणार 'बेस्ट सेवा'

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर डॉ.

'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची अर्थात 'नीट पीजी'च्या पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. या

मुंबईतल्या दुबार मतदारांचा फुगा फुटणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - दुबार मतदारांचा फुगा आता फुटला जाणार असून महापालिकेच्या पहिल्या प्रयोगातच हा फुगा

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब