ऑनलाइन गेममध्ये हरल्याने, १६ वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

  29

नाशिक: ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने १६ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना नाशिक रोड परिसरामध्ये घडली आहे. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की ,नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड, डायना नगर येथे राहणाऱ्या १६ वर्षीय सम्राट भालेराव गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल गेमच्या आहारी गेला होता.  सातत्याने घरच्यांनी विरोध केल्यानंतरही तो ऑनलाइन गेम खेळत होता, अखेर सोमवारी रात्री ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्यानंतर त्याला नैराश्य येऊन त्याने राहत्या घरी गळफास घेतला.   सकाळी कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून, त्याच्या पश्चात आई आणि दोन लहान बहिणी आहेत. नाशिक रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.


दुसरीकडे, कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात ऑनलाइन गेममुळे एका शेतकऱ्याचे ५ लाख रुपये बुडाले. शेतकऱ्याने म्हशी खरेदीसाठी बँक खात्यात ७ लाख रुपये साठवले होते. मात्र, त्यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाने ‘फ्री फायर’ गेम खेळताना अ‍ॅप डाउनलोड केले आणि काही क्षणातच खात्यातील ५ लाख रुपये गायब झाले. सायबर पोलिसांनी ट्रान्झेक्शन आयडीच्या आधारे तपास केला. यापूर्वी कोल्हापुरात डिजिटल अरेस्टमुळे साडेतीन कोटी आणि आठ कोटींची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनांमुळे पालकांना मुलांना मोबाईल देताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा मिळाला आहे.

Comments
Add Comment

इस्रायलचे अधिकाऱ्यांसह सैनिकांना कुराण आणि अरबी भाषा शिकण्याचे आदेश

जेरुसलेम : इस्रायलकडून मोसादचे अधिकारी आणि आपल्या सैनिकांसाठी एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता

आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी नदी स्वच्छतेसह रस्ते पुलांची कामे नियोजित वेळेत करण्यात यावी: पंकज भुजबळ

पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना आमदार पंकज भुजबळ यांची सभागृहात मागणी  मुंबई: नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या

'निस्तार' भारतीय नौदलात दाखल, पहिले स्वदेशी पाण्याखालील मदतकार्य करणारे जहाज

विशाखापट्टणम : 'निस्तार' हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली उतरून मदतकार्य करणारे पहिलेच जहाज

मुंबईला पाणीपुरवठा करणारा मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

सर्व ७ तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या ७२.६१ टक्के जलसाठा मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा

OnePlus Nord 5 विरुद्ध Poco F7 5G: मिड-रेंज फ्लॅगशिपची सविस्तर तुलना

मुंबई : आज लाँच झालेला OnePlus Nord 5 आणि जून २०२५ मध्ये बाजारात आलेला Poco F7 5G या दोन शक्तिशाली स्मार्टफोनमुळे भारतातील

घाटात प्रेत फेकणाऱ्यांचा पर्दाफाश; एका महिलेसह तिघांना बेड्या!

पोलादपूर: आंबेनळी आणि कशेडी घाटरस्त्यांवर मृतदेह टाकून पळून जाण्याच्या घटनांना आता चाप