"बेघर होऊ देणार नाही! : "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना ग्वाही

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले आहेत. आर्थिक अडचणी आणि घराच्या वादामुळे व्यथित होऊन इच्छामरणाची मागणी करणाऱ्या महिमकर यांना शिंदे यांनी "आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असून काहीही झाले तरीही तुम्हाला बेघर होऊ देणार नाही," अशी आश्वासन दिली.


मनमोहन महिमकर यांनी दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्यांना काम मिळेनासे झाल्याने आर्थिक परिस्थिती खालावली होती. त्यातच, गिरगावातील त्यांच्या पागडीवरील इमारतीच्या पुनर्विकासाचा निर्णय मालकाने घेतला. ही बाब समजताच, त्यांच्याच नातेवाईकांनी घरावर दावा सांगितला. यामुळे विकासकाकडून मिळणारे भाडेही बंद झाले आणि महिमकर अधिकच आर्थिक संकटात सापडले. या सर्व त्रासाला कंटाळून त्यांनी राज्यपालांकडे इच्छामरणासाठी अर्ज केला होता.


या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव सुशांत शेलार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी महिमकर यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'मुक्तागिरी' येथील निवासस्थानी घडवून आणली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महिमकर यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. त्यानंतर, त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून महिमकर यांना त्यांचे घर मिळवून देण्याचे निर्देश दिले.


उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल आणि शिवसेना चित्रपट सेनेने केलेल्या मदतीबद्दल मनमोहन महिमकर यांनी आभार मानले. सुशांत शेलार यांनी यावेळी सांगितले की, महिमकर यांच्या घराचा प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळायला हवा, ही त्यांची प्रामाणिक भूमिका होती. टीव्ही आणि वृत्तपत्रांतील बातम्यांची दखल घेऊन चित्रपट सेनेने हा पुढाकार घेतला. शेलार यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील स्वभावाची प्रशंसा करत मराठी कलाकारांच्या मदतीसाठी ते नेहमीच तत्पर असतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे नमूद केले.

Comments
Add Comment

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई

मोनोरेल, मेट्रो सेवांसाठीचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा...

जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या दिल्या अशा सूचना मुंबई (खास प्रतिनिधी) : सार्वजनिक वाहतूक

जागतिक तणावाच्या काळात भारत जगासाठी दीपस्तंभाची भूमिका बजावेल!

मुंबईत पंतप्रधान मोदींचे जागतिक सीईओ फोरममध्ये प्रतिपादन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवारी)

तुम्हाला वारंवार Spam कॉल येतात का? तर आता नो टेन्शन कारण...

आता अनोळखी नंबरसह मोबाईलवर दिसेल कॉल करणाऱ्याचं नाव मुंबई : दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल होत

स्टारलिंकची भारतात एंट्री, मुंबईत होणार डेमो रन

मुंबई : एलॉन मस्क यांच्या मालकीची स्टारलिंक कंपनी भारतात सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ३०

देशभरात १ नोव्हेंबरपासून आधार, बँकिंग व एलपीजीवर नवे नियम होतील लागू

मुंबई : देशभरात १ नोव्हेंबरपासून अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन