Tuesday, July 8, 2025

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबर अखेरीस टेक ऑफ,उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबर अखेरीस टेक ऑफ,उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा
मुंबई (विशेष प्रतिनिधी): सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे उद्द्घाटन येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधानसभेत केली. हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे विमानतळ असून एकाचवेळी ३५० विमाने या विमानतळावर उभी करता येतील एवढी क्षमता याची आहे. तसेच वर्षाला सुमारे ९ कोटी प्रवासी हवाई वाहतुकीचा आनंद यामुळे घेऊ शकतील, अशी माहितीही त्यांनी मावेळी दिली. या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असून त्याचे उ‌द्घाटन सप्टेंबरअखेरीस केले जाणार आहे.

नवी मुंबई विमानतळ नेमके कधी सुरू होणार? याबद्दल प्रश्न विचारले जात होते. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली की, येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस नवी मुंबई विमानतळ प्रवासी वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहे. या विमानतळाचा पहिला टप्पा एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण होणार होता. बहुतांश कामे पूर्ण झाली असून किरकोळ कामे येत्या दोन महिन्यात अंतिम केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर २०२९ पर्यंत दुसरा टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर, तिसरा टप्पा २०३२ पर्यंत आणि चौथा टप्पा २०३६ पर्यंत पूर्ण होईल, असे बोलले जात आहे.

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ महाराष्ट्रात उभारले जात आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दुसऱ्या क्रमांकांचे विमानतळ उभारले जात आहे. नवी मुंबई विमानतळ थेट मेट्रोने बोडले जाणार आहे. नवी मुंबई विमानतळ जगातील प्रमुख शहरांशी जोडले जाणार आहे. तसंच, नवी मुंबईच्या विमानतळाला मेट्रो, लोकल, बस आणि खासगी वाहनांसोबत जोडण्यात येईल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा